भोज्जा

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा

सर्व वाचकांना,१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.

रविवार, १ ऑगस्ट, २०१०

सुदाम्याचे पोहे

मित्रांनो,
आज फ्रेंडशिप डे.म्हणजेच आपल्या भगवान कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीची आठवण करून देणारा.त्या आदर्श आणि अतूट मैत्रीची स्मृती चाळवणारा.काय गम्मत आहे बघा आजच्या ह्या दिवशी ह्या दोघांची आणि त्यांच्या मैत्रीची किती जणांना आठवण झाली असेल ते त्या भगवान कृष्णालाच ठाऊक.

 बदलते पुणे नि पुण्यातील बदल 

मित्रांनो,        
आजचा सकाळ वाचला.कु.दर्शना तोंगारेच्या खुनाची बातमी वाचली आणि मन सुन्न झालं.अहो ह्या आमच्या पुण्याला झालाय तरी काय आणि त्यात चाललाय तरी काय ?एक जेमतेम २२ वर्षाची तरुणी,आपलं शिक्षण पूर्ण करून नुकतीच  नोकरीला  लागती  काय,संध्याकाळी  कामावरून  घराजवळ  येते काय आणि घराजवळ तिच्यावर जीवघेणा हल्ला होऊन त्यात तिचा बळी जातो काय,सगळेच अविश्वसनीय. 
गेल्या  काही  वर्षांपासून जसे पुण्याचे भौगोलिक,सामाजिक  आणि आर्थिकदृष्ट्या रूप पालटत गेले तसे सगळेच बदलले.मुळचे पुणेकर इथे अल्पसंख्य झाले आणि बाहेरून आलेले मग ते कुठून का असेना, पुणेकर म्हणून  मिरवायला लागले.भले पूर्वी पेन्शनरांचे शहर म्हणून पुण्याला ओळखायचे पण पुण्याला निदान काही एक शिस्त होती, एक संस्कृती होती ती आता लयाला गेलीय आणि हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. पूर्वी पोलिसाचा लहानांना नव्हे तर मोठ्यांनाही धाक होता,चौकात लाल दिवा दिसल्यावर सायकलवाला सुद्धा शिस्त म्हणून थांबायचा,कारवाला त्याचा स्वतःचा आब राखून शहरामधून कार चालवतांना डाव्या बाजूने ओव्हरटेक कधीच करायचा नाही,ह्या छोट्या गर्दीच्या रस्त्यावर सायकलवाला, स्कूटरवाला आपल्याला ओव्हरटेक  करणार हे गृहीत धरायचा.मुळात त्याची नुसती गाडी मोठी नसायची तर मन हि मोठे असायचे.नंतरच्या काळात कोणतीही  गाडी ,रस्त्याच्या कोणत्याही भागातून डावीकडून, मधून, उजवीकडून, कुठूनही चालायला लागली.शहराच्या मध्यवस्तीतले रस्ते,अहो रस्ते कुठले बोळ म्हणा बोळ,पण ते ही  एकेरी बनले.रस्त्यांनी  जाताना  पायी  चालणाऱ्यांचा जीव त्यांच्या मुठीत आला.एकेरी वाहतुकीमुळे रस्ते वेगवान झाले,वाहने वाढली,गाड्या वाढल्या,गाड्यांचे आकारमान वाढले पण आता, आत बसलेल्याची मन खूप छोटी झाली.पूर्वी सायकलला सुध्धा गाडी म्हणायचे,नंतर त्याची जागा स्कूटर ने घेतली पण आता छोट्या चारचाकीवाल्याला सुध्धा इज्जत राहिली नाही.पूर्वी शेजारी-पाजारी, नात्यात गोत्यात कोणी गाडी घेतली तर खरोखरचे मनापासून कौतुक व्हायचे.आता एसेमएस चा जमाना  आला,कौतुकाचा भडीमार होतो पण आतून जळजळ वाढली.भला उसकी कमीज मेरे कमीज से ज्यादा सफेद कैसीच्या जाहिराती पॉप्युलर झाल्या. असो .लिहिण्यास काही कमी नाही,सांगण्या सारखे खूप काही आहे वाचणारे आणि त्या वर विचार करणारे तुमच्या सारखे आहेत पण एवढे असून सुद्धा परिस्थिती काही अगदीच वाईट नक्कीच नाहीये.तरुण पिढी नक्कीच आशादाई आहे.ह्यातून ही नक्कीच मार्ग निघेल असा भरंवसा आहे .मला  तर होप्स आहेत तुम्हाला काय वाटतंय?