भोज्जा

शनिवार, ३१ जुलै, २०१०

पुणेकर, पण चिंता मात्र मुंबईच्या झालेल्या चिवड्याची

मित्रांनो,         
मराठी ब्लॉग रायटर म्हणून हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी मला थोड सांभाळून घ्याल अशी खात्री आहे.         
आज दिवसभर सुध्धा पुन्हा गेल्या काही दिवसांपासून दळत असलेले पीठच पुन्हा हिंदी च्यानल वाल्यांनी दळायला घेतल होत,ते म्हणजे मुंबईचा पाऊस. अहो कंटाळा आला हो.मुळातच मुंबई हि समुद्र सपाटीला वसलेली आहे.आता सध्या आपण  सगळे ज्याला मुंबई,मुंबई म्हणतो 'त्या 'मुंबईचा बराचसा सध्याचा भाग हा आता  मातीचे भाराव टाकूनच बनविण्यात आलेला आहे.मुळात इंग्रज जेव्हा भारतावर राज्य करीत होते तेव्हाची मुंबई हि बेटांची मुंबई होती.समुद्र सपाटी लगत असलेली पण तुलनेने खूप जवळ जवळ असलेली बेटे मिळून तेव्हाची मुंबई बनलेली होती.पण गेल्या  काही  वर्षात आपली सगळीच समीकरणे बदलली आणि बिचारी मुंबई सुद्धा त्या मुळे बदलली.नव्हे आपण तिला बदलली.संपूर्ण देश भरातून गेल्या ५० वर्षात इतके लोक मुंबईत पोटार्थी म्हणून/बनून वेगवेगळ्या निमित्ताने येऊन तथा  कथित मुंबईकर झाले.झाले नव्हे बळच बनले.बिचारी मुंबई,काय करणार?घेतलन  काय तिन  सगळ्यांना सामावून आणि सांभाळून.    पण आपण त्या पुढचे  निघालो.आपण काय केल? तिनं आपल्याला बोट दिल,आपण हात धरला ,आणि बिचारी काही कुरकुरत नाही म्हटल्यावर तो पार खांद्या पासूनच उखडला.म्हणजे खरोखरचे जिथ पर्यंत राहण्या योग्य जागा होती( खर तर ती तेव्हा   सुद्धा फारशी नव्हतीच ) तिथ पर्यंत बांधकामे होत गेली,पण लोकांचे लोंढे काही केल्या थांबेनात,मग पूर्वी जिथे खाड्या होत्या तिथे ह्या नवीन आलेल्या मंडळीनी मातीचे कचऱ्याचे भराव टाकून त्या वर त्यांची बांधकामे करायला सुरुवात केली.पूर्वी बेटांची असलेली मुंबई हळू हळू एकसंध होत गेली .पण फक्त भौगोलिक दृष्ट्या.माणसे  मात्र  एकमेकां पासून दूर होत गेली
अहो जी मुळात जमीनच  नव्हती तिथे आपण भराव टाकून तिला जमीन बनवली. फक्त  आपल्या  स्वार्थापोटी, गरजेपोटी आणि आता आपणच बोंब मारून उठतो  कि,दरवर्षी पावसाळ्यात इथ पूर येतो नि पाणी साचत!अरे  लेको  तिथ  तेच होणार.मुळात तिथे भौगोलिकदृष्ट्या  जमीनच नाहीये,त्या मुळे, मुळात ती माणसाला राहण्यायोग्य जागाच नाहीये.ती पूर्वीची खाडी आहे,आता लेको तिथ भराव करून तुम्ही रहाताय हा काही मुंबईचा किंवा त्या समुद्राचा दोष नाहीये.     आता गेल्या  काही वर्षात  हे  केबल टीव्हीचे राज्य आणि विशेष करून ह्या हिंदी चानल वाल्यांची चलती झाल्या पासून ते ह्या गोष्टीला अवास्तव  महत्व,नव्हे फुटेज द्यायला लागले म्हणून तुमचे फावले काय? खरतरं  त्यांनी  इथे पाणी ह्या-ह्या लोकांनीच केलेल्या  भौगोलिक बदला मुळेच साचते आहे हे जगाला ओरडून सांगायला पाहिजे.पण ते सांगणार नाहीत कारण दरवर्षीच्या पावसाळ्यातला,ह्याला बातमी म्हणून दाखविणे  हा त्यांचा हुकमी एक्का आहे ना ते तो कसा वाया घालवतील? महानगरपालिकेच्या नावाने बोंब मारायला मिळून आपण खूप मोठे समाज कार्य करीत आहोत, लोकसेवा  करीत आहोत हे मिरवायला ते  कसे  विसरतील? सगळे सारे ४२०.          
असो,आपण आपल्याला विनाकारण त्रास करून घ्यायचा नाही.नेहमी प्रमाणे उगी राहायचं .माझं जाऊन द्या हो पण तुम्हाला काय वाटतंय?