ती एक बार गर्ल डांसर आहे. तिचे तेथेच एका नामचिन गुंडा बरोबर सुत जुळते .ती त्याच्याशी लग्न करते .तिला दोन मुले होतात. मोठा मुलगा आणि धाकटी मुलगी .
काही काळाने तिचा गुंड नवरा पोलीस एन्काऊंटर मध्ये मारला गेलाय आणि नवऱ्याच्या माघारी तिच्या दोन्ही मुलांचे संगोपन आणि शिक्षण ती एकटी स्वतःच्या हिमती वर करत आहे. आणि अशातच तिच्या १४-१५वर्षाच्या मुलाला पोलिसांनी त्याने न केलेल्या गुन्ह्याबद्दल उचलून नेले आहे आणि आता ती त्याला त्या कचाट्यातून सोडवून आणण्यासाठी पोलिसांना द्यावयाच्या पैशाची तजवीज करण्याच्या मागे आहे....पण तिला जागोजागी नकार मिळत आहे...😢
आणि केवळ त्या मुळे नाईलाजास्तव ती आपल्या शरीराचा सौदा करायला आता तयार झाली आहे ....😭
ही आहे आजच्या व्हिडीओ ची पार्श्वभूमी .
ती मुद्दाम सांगायचे कारण असे की चांदनी बार या 2001 साली आलेल्या सिनेमात हा प्रसंग तब्बू या संवेदनशील अभिनेत्रीने पडद्यावरती आपल्या अभिनयाने शब्दशः जिवंत केला आहे...
नको असलेल्या मार्गावरून केवळ पुत्र प्रेमासाठी जाणे भाग पडत आहे आणि त्या वेळी ती करत असलेली गोष्ट चुकीची आणि गैर आहे हे समजत असून सुद्धा तिच्यातील आईचा झालेला नाईलाज ,त्यामुळे आलेली उद्विग्नता आणि अपराधीपणाची जाणीव तब्बू ने या अवघ्या चार मिनिटांच्या सीनमध्ये अतिशय प्रभावी पद्धतीने सादर केली आहे ...
हा सिनेमा सलग पहात असताना संवेदनशील प्रेक्षकाच्या डोळ्यांच्या कडा त्यामुळे पाणावल्या गेल्या नाहीत तरच नवल .. या भूमिके करिता तब्बूला उत्कृष्ट अभिनेत्री चे नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहे. या सीन बद्दल इतके प्रास्ताविक करायचे कारण असे की ते अवॉर्ड मिळाल्यावर हा 👇सीन माझ्या करियर मधील आजवरचा सर्वोत्कृष्ट सीन आहे आणि माझ्यातील अभिनेत्रीचे समाधान करणारा आहे असे एका मुलाखतीत तेव्हा सांगितले होते.
तब्बू ४ नोव्हेंबरला 49 व्या वर्षात पदार्पण करत आहे..
जन्मदिनाच्या तिला मनापासून शुभेच्छा आणि आता पहा तब्बूचा तो अप्रतिम परफॉर्मन्स
👌👌👌👌👌👇🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा