भोज्जा

खेळ खंडोबा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खेळ खंडोबा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३० मार्च, २०११

अफ़्रिदीचा.... वारू रोखला

फ़ायनलचे स्वप्न दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या समोरच भंगले




भारतीय संघाचे पाक वरील विजया बद्दल हार्दीक अभिनंदन.अंतीम सामन्या साठी भारतीय संघास हार्दीक शुभेच्छा.

मंगळवार, २९ मार्च, २०११

फरक... ’तेव्हाच्या’ आणि ’आत्ताच्या’ मधील

            १९८३ चे खरोखरचे विजेते अष्टपैलू बोलर्स

वन डे मॅचला आवश्यक असणाऱ्या ईंग्लिश स्पोर्टी खेळपट्ट्या,घरच्या  प्रेक्षकांचा नसलेला दबाव,अपेक्षांचे नसलेले ओझे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खरोखरचे विकेट घेणारे बोलर्स,हे १९८३ च्या विजेत्या संघात विजेते होण्यासाठी असणारे आवश्यक गुण होते. अंतीम सामन्यातील गोलंदाजांचे पॄथक्करण ह्याची साक्ष देते.
११ ओव्हर्स ४ मेडन २१ धावा १ विकेट

सोमवार, २८ मार्च, २०११

अपेक्षांचे ओझे

 
भारत-पाकिस्तान दोन्ही संघांचे कर्णधार सध्या त्यांच्या चाहत्यांच्या "अपेक्षांचे ओझे" असे वहात आहेत.

शुक्रवार, २५ मार्च, २०११

मास्टर स्ट्रोक

कालच्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्या बद्दल अधिक काही बोलायलाच नको. हे चित्रच पुरेसे बोलके आहे. नाही का?
मैने धो डाला !

आमच्या जस्ट निफ़्टी वरच्या सौ.सुजाथा ह्यांच्या सौजन्याने 

रविवार, २० मार्च, २०११

भारत -वेस्ट ईंडीज...मी गणितात नापास तर तू गणित आणि ईंग्रजी मध्ये....


मी गणितात नापास तर तू गणित आणि ईंग्रजी मध्ये.......
आजच्या आत्ता पर्यंतच्या सामन्या बद्दल आत्ता फक्त एवढेच बोलता येईल.
आपण खराब खेळलो तर वेस्ट ईंडिज फ़ार फ़ार खराब खेळली.
मात्र विजेत्या भारतीय संघाचे मना पासून अभिनंदन. 
कारण विजय हा नेहमी फक्त विजयच असतो.तो किती धावांनी,विकेट्ने मिळाला,मिळविला ह्याची नोंद फक्त रेकॉर्ड बुकात ठेवली जाते.आपल्या सारख्या सर्व सामान्य क्रिकेटप्रेमींना त्याच्याशी काही घेणे देणे नसते. तथापि,जेव्हा युवराजसिंह हा मेन स्ट्राईक बोलर म्हणुन कनव्हर्ट व्हायला सुरुवात होते तेव्हा ते कौतुकाचे नव्हे तर काळजीचे कारण बनते.  

अजुन पर्यंतचा नीरस वर्ल्ड कप

ह्याने सर्वांना आशा लाउन ठेवल्या आहेत.

पण ह्या बेजान खेळ पट्ट्या,खेळ खंडोबा करण्यात सर्वात पुढे आहेत.ताशी १४० + कि.मी. वेगाने चेंडू टाकुन सुद्धा स्पर्धेतील प्रमुख बोलर हैराण झालेले दिसतात.पांढऱ्या फटक खेळपट्ट्या नि कधी नव्हे पण का होईना निदान ह्या वेळी तरी हिरवे गार असणारे आउटफिल्ड बोलर्स साठी मात्र जीवघेणी ठरली आहेत.काही करून सामना  ५० --५० ओव्हर्स पर्यंत गेलाच पाहिजे ही प्रायोजकां साठी आय.सी.सी. ने घेतलेली दक्षता,खऱ्या क्रिकेटप्रेमीला खेळा पासून दूर नेत आहे.