"कोई चुपके से आ के, सपने सुला के,मुझ को जगा के बोले.... कि मै आ रहा हूँ ! कौन आये,ये मै कैसे जानू ? " वा ! काय कमालीचे शब्द आहेत.अहो असे अर्थपूर्ण नि आशयघन शब्द गीता दत्त साठी फ़क्त कपिल कुमारच लिहू शकतो. तो सत्तरीचा काळच काही वेगळा होता कि असे नि ह्या प्रकारचे किती तरी ओघवते काव्य त्या वेळी रसिक श्रोत्यांच्या कानावर येऊन ठेपत असे.खरे तर त्याचे रसग्रहण करण्याची नीटशी संधी सुद्धा त्या काळी त्या पिढीला मिळाली नाही.कारण उत्तमात उत्तम आंबेमोहोर अगदी मुबलक पणे बाजारात मिळत असेल तर अगदी बासमती सुद्धा क्षणभर बाजूला पडतो नि रेशनच्या जाड्या भरड्या तांदळा साठी तर कोण कशाला रांग लावेल ? असा तो काळ..... त्यां मुळे इतकी अर्थपूर्ण नि रसाळ काव्ये तेव्हा गाण्यांच्या रूपाने इतकी लागोपाठ रसिकां समोर यायची कि त्यात सुद्धा नाईलाजास्तव थोडे डावे उजवे करावे लागायचे.,नव्हे आपोआप व्ह्यायचे.
आज ह्या गोष्टीची आवर्जून आठवण व्हायचे कारण म्हणजे सकाळीच न्हाव्याकडे कटिंगला गेलो असता "लोकसत्ताची" लोकरंग पुरवणी वाचनात आली.तसे आमचे पवार सलूनवाले सुद्धा रसिकच,त्या मुळे बोलबोलता विषय निघाला नि थेट ७० सालात जाऊन पोहोचलो.आजच्या लोकरंग मध्ये ह्या गाण्या विषयी वाचनात आले नि तो सुवर्ण काळ आठवला.