अजून कोणी येतंय का?हा वेटरचा प्रश्न अपेक्षितच होता नि त्याला कारण हि तसेच होते कारण कोठल्याही चांगल्या व्हेज हॉटेल मध्ये पहिल्या मजल्या वरील फॅमिली रूम मध्ये फक्त २ तरुणच बसले असतील तर त्यांच्या बरोबरच्या लेडीज मागे आहेत नि हे त्यांची वाट पाहत आहेत असेच वाटते.नि पुढे येऊन ह्या दोघांनी जागा मिळवायची व्यवस्था केली आहे असेच वेटरचे हि मत झाले नाही तरच नवल.त्या मुळे आम्ही स्थानापन्न झाल्यावर सुमारे ५ मिनिटांनी वेटरने आम्हास हा प्रश्न केला.उत्तर "नाही" असेच होते ते द्यायची जबाबदारी मात्र रामभाऊनि घेतली कारण त्यांनीच मला येथवर आणले होते.
एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...
बुधवार, २९ सप्टेंबर, २०१०
बुधवार, १५ सप्टेंबर, २०१०
प्रणम्य शिरसा देवं ! गौरी पुत्रं विनायकम !!
![]() |
एकदंताय विद्महे ! वक्रतुंडाय धीमही !! ऐसा गणेश मंगलमूर्ती ! तो म्या स्तविला यथामती ! वांच्छा धरुनी चित्ती ! परमार्थाची ! ध्यान गणेशाचे वर्णिता ! मतिप्रकाश होय भ्रांता ! गुणानुवाद श्रवण करीता ! बोले सरस्वती !! समर्थ रामदास स्वामी |
आमच्या घरचा यंदाचा गणेशोत्सव २०१०
ओमकार स्वरूपा सदगुरु समर्था!अनाथांच्या नाथा तुज नमो!! भव्यरूप वितंड ! भीम मूर्ती महा प्रचंड ! विस्तीर्ण मस्तकी उदंड ! सिंधूर चर्चिला !! नाना सुगंध परिमळे ! धबधबा गळती गंडस्थळे ! तेथे आली षटपद कुळे ! झुन्कारशब्दे !! समर्थ रामदास स्वामी |
मोरया,मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे
![]() |
यंदा माझ्या घरात विराजमान झालेले गणपती बाप्पा नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे ! अत्यंत ते साजिरे ! माथा शेंदूर पाझरे वरि बरे ! दुर्वांकुराचे तुरे ! माझे चित्त विरे मनोरथ पुरे ! देखोनी चिंता हरे ! गोसावीसुत वासुदेव कवि रे ! त्या मोरयाला स्मरे ! |
शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०
गणेशोत्सव २००९
प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकम!भक्तावासं स्मरे नित्यं ,मायुः कामार्थ सिद्धये!!
माझ्या घरातील गणेश उत्सव २००९
गणपती बाप्पा मोरया २००८
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समःप्रभ!
निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा!! प्रारंभी विनंती करू गणपती !
विद्यादयासागरा !
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मति दे !
आराध्य मोरेश्वरा !!
चिंता,क्लेश,दारिद्र्य,दुःख अवघे !
देशांतरा पाठवी !
हेरंबा गणनायका गजमुखा !
भक्ता बहु तोषवी !!
शुक्रवार, १० सप्टेंबर, २०१०
ईद मुबारक
"सर्व धर्म समभाव"
श्री.आदमभाई शेखचाचा,जावेदभाई,शाहीदभाई,शोएब,शब्बीरभाई तांबोळी आणि कुटुंबीय,रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवाना हार्दिक शुभेच्छा.
ईद मुबारक हो!
श्री.आदमभाई शेखचाचा,जावेदभाई,शाहीदभाई,शोएब,शब्बीरभाई तांबोळी आणि कुटुंबीय,रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवाना हार्दिक शुभेच्छा.
ईद मुबारक हो!
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०
"सहस्त्रबुद्धे" नि "पोलीस"
एका रविवारी मी सकाळी-सकाळी मित्रा बरोबर खरेदी साठी तुळशीबागे जवळ गेलो होतो.सकाळ असूनही मंडईचा परिसर असल्याने गर्दी हि होतीच.मित्रं काही एक खरेदी साठी दुकानात गेल्याने नि दुकानात गर्दी असल्याने मी बाहेरच उभा राहून गर्दीचे निरीक्षण करू लागलो.तेवढ्यात एक गोरेगोमटे गृहस्थ आपल्या बायकोला स्कूटर वर घेऊन त्या दुकाना समोर येऊन थांबले.नुकतीच मंडई केली असल्याने(बहुदा आठवड्याची)स्कूटर पिशव्यांनी गच्च भरल्या सारखी दिसत होती.गृहस्थ गाडी वरून खाली न उतरता बायकोला थोडे दरडावण्याच्या सुरातच"लौकर ये"असा दम देऊन तिथेच थांबले.'नो पार्किंगचा'बोर्ड असल्याने त्यांनी गाडी वरून उतरणे नि गाडी पार्क करणे हुशारीने टाळले नि ते पण माझ्या प्रमाणेच प्रेक्षकांच्या गर्दीत मिसळले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)