भोज्जा

मनाला भावलेले काही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मनाला भावलेले काही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

महाचोर ( The Thief)

 

                                              सोळाव्या शतकात जपान मध्ये एका राजाच्या  राजवटीत एका चोराने खूप धुमाकूळ घातला होता . त्याला पकडण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न निष्फळ होत होते. विशेष म्हणजे हा चोर चोरी केल्यावर जाताना जाणूनबुजून त्याचा रुमाल तेथे सोडून जायचा ,जेणेकरून समजावे कि  "तो मीच होतो." नंतर नंतर तर त्या रुमाली चोराने एखाद्या श्रीमंता कडे कडे चोरी करणे हे लोक त्याच्या श्रीमंतीचे स्टेटस  सिम्बॉल मानायला लागले.

                                           बघता बघता वर्षे उलटली आता चोर म्हातारा झाला.. तो  जरी चोर असला तरी तो सुद्धा एक संसारी माणूसच होता. तो त्याच्या पत्नी आणि मुला  सोबत राहत होता आणि त्याच्या पत्नीला आपल्या नवऱ्याच्या या उद्योगधंद्याची माहिती होती आणि मुलगा पण आता वयात आल्याने त्याला सुद्धा वडिलांच्या व्यवसायाबद्दल हळूहळू समजत गेले  आणि भले अपकीर्ती जरी असली त्याच्या वडिलांच्या चौर्य कौशल्या बद्दल लोकांमधे असलेले  कुतुहूल,भीतीयुक्त आदर त्याला समजत होता पण तो चोर मूलतःच  स्वभावाने अबोल असल्याने त्याच्या मुलाला सुद्धा त्याचा दरारा वाटायचा .    

                                           मधे  बरीच वर्षे गेली,आणि वय झाल्याने आता आपल्या वडिलांचे अगदी घरात सुद्धा काहीएक काम करतांना हातपाय थरथरतात हे मुलाच्या लक्षात आले.  आणि त्याला वाटले कि आता आपण पण आपल्या वडिलांना त्यांच्या चोरीच्या कामात मदत केली पाहिजे  जेणे करून ते निदान उतार ते  वयात पकडले जाणार नाहीत, त्यांची मानहानी होणार नाही.

                                        शेवटी एक दिवस त्या मुलाने थोडा हिय्या करून वडिलांना सांगितले कि मला सुद्धा तुमची हि चौर्यकला शिकायची आहे. तुम्ही शिकवाल  का ?


चोराने मुला कडे बघितले , क्षणभर थांबला आणि म्हणाला ,

ठीक आहे ! आज रात्री तयार राहा !

                                         बघता बघता संध्याकाळ उलटून  रात्र  सुरु झाली आणि  ती सुद्धा  नेमकी अमावस्येची. .सरणाऱ्या एकेक मिनिटागणिक मुलाची उत्सुकता आता शिगेला पोहोचायला लागली होती.  

                                       शेवटी बारा  साडेबारा नंतर चोर उठला ,त्याने त्याच्या हत्यारातील एक ५ पौंडाचा हातोडा आणि एक धारदार छिन्नी ,जी त्याने आधीच लावून तयार ठेवली होती ती  पोत्यात भरून  मुलाला नुसत्या मानेने चल अशी खूण  करून तो बाहेर पडला व चालायला लागला.

                               बघता बघता चोर गावाबाहेर असणाऱ्या एका  शेठजीच्या बंगल्याच्या मागच्या बाजूच्या कंपाउंड वॉल मागे जाऊन थांबला. आजूबाजूचा थोडा कानोसा घेत त्याने त्या भरभक्कम भिंतीला जवळच्या छिन्नी हातोड्याने भगदाड पाडले आणि सहजगत्या बंगल्याच्या आवारातून दबक्या पावलाने पुढे जात त्याने बघता बघता बंगल्याचा दरवाजा तोडत बंगल्यात प्रवेश केला.

                                इतक्या अंधारात सुद्धा तो आता बंगल्यात हॉल मध्ये टांगलेल्या प्रकाश हंड्यांच्या मंद प्रकाशात अगदी सराईता सारखं चालत जात होता ..जणू त्या बंगल्यातच तो राहत होता.  त्याचा मुलगा थक्क होत हे सगळं पाहात त्याच्या मागोमाग जात होता . इतरवेळी थरथरणारे ,क्वचित अडखळणारे आपल्या वडिलांचे पाऊल आत्ता मात्र न अडखळता ,थरथरता नेमके पणाने पुढे जात आहे हे पाहून तो विचार करतो न करतो तेवढ्यात तो चोर एका खोली पाशी जाऊन पोहोचला.

                                   आता त्याने खिशात हात घालत एक किल्ली काढली ,झटक्यात त्या खोलीचे कुलूप आणि दार उघडून तो आत शिरला आणि मागोमाग आलेल्या  त्याच्या मुला कडे बघत  त्याने फक्त नजरेने खुणावले " तिजोरी".

                                      बघता बघता चोराने ती तिजोरी जवळच्याच  कुठल्याशा किल्लीने उघडली  आणि मुलाला त्यातील वस्तू सोबत नेलेल्या पोत्यात भरायची खूण  केली.मुलगा तर थक्क होऊन हे सगळे पाहत होता,अनुभवत होता.वडिलांची हि अद्भुत कला अनुभवत तो त्या तिजोरीतील वस्तू पोत्यात भरायला घेणार  इतक्यात त्याला त्या खोलीचा  दरवाजा आणि त्यावरचे कुलूप कुणीतरी बाहेरून लावल्याचा आवाज आला. आणि तो दरवाजा जवळ पळत  गेला .. आणि बघतो ते काय त्याच्या वडिलांनी, म्हणजे त्या चोराने आता त्या खोलीला बाहेरून चक्क कुलूप लावत जोर जोरात चोर-चोर-चोर अशी आरोळी ठोकलेली मुलाने ऐकली आणि मुलगा  आत मध्ये मटकन खाली बसला.  चोराने या सर्व हालचाली इतक्या वेगाने केल्या पण त्याने कंपाउंडला पाडलेल्या त्या भगदाडा कडे  धाव घेताना त्याचा पाय नकळत वाटेतल्या एका स्टूल वर ठेवलेल्या फ्लॉवरपॉटला  लागला व तो खाली पडत खळकन मोठा आवाज झाला.

                                 आता संपूर्ण बंगल्याला जाग आली . काहींनी चोराला त्या भगदाडातून बाहेर पडताना बघितले आणि चोर-चोर चोर अशा आरोळ्यातून एकच हलकल्लोळ माजला. काही जण त्याच्या मागे धावले पण चोराने इतक्या सफाईने पोबारा केला होता कि तो कुणाच्या हाताला म्हणून  लागला नाही.

                             आता पहाटेचे तीन साडे तीन झाले होते . चोराचा मुलगा सुद्धा आता घरी पोहोचला . अतिशय रागाने तो सर्वप्रथम बापाच्या खोलीत गेला आणि बघतो तर काय ? त्याचा बाप डोक्यावरून पांघरून घेऊन चक्क घोरत निवांत झोपला  होता.

                           आता मात्र त्याचा राग प्रचंड अनावर झाला व त्याने त्वेषाने वडिलांच्या तोंडावरून पांघरूण काढत त्यांना हलवून जागे केले.

                         वडिलांनी त्याच्याकडे पहिले आणि विचारले,  अरे ! आलास का ? छान झाले. आणि पुन्हा डोक्यावरून पांघरूण घेत  तो झोपी जायला लागले  तसा मुलगा बापावर खूपच भडकला आणि त्याची भडास तो बापावर काढायला लागला.बापाने थोडावेळ थांबत .. ठीक आहे ,आता तू आलास ना ? बास ! झोप आता ,दमला असशील खूप .. पण मुलगा बापाचे बोलणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . त्याने निग्रहाने वडिलांना जागे राहायला लावले. आणि अतिशय चिडून म्हणाला तुम्ही माझे नक्की बाप आहेत का वैरी ? तुम्ही मला एकट्याला त्या खोलीत कोंडून गेल्यावर पुढे काय झाले ते  माहितीयेका ? तर ऐका 

                            बाप म्हणाला ,खरं तर मला खूप झोप आलीये आणि  खरं सांगू ? तुझी गोष्ट ऐकण्यात मला काडीचा रस नाहीये ,तू परत आलयेस हीच माझ्या साठी खूप महत्वाची  गोष्ट आहे, पण केवळ तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुझी गोष्ट  ऐकतोय . त्यावर मुलगा सांगायला लागला .. कि..

                                तुम्हीं मला त्या खोलीत कोंडून जेव्हा सोडून गेलात तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न आला कि हा माझा बाप आहे का मागच्या जन्मीचा वैरी ? हा इतका दुष्ट कसा असू शकतो . ? याने हे असे का केले असावे ? ते हि स्वतःच्या मुलाच्या बाबतीत?

                            पण यावर मला जास्त विचार करायला तेव्हा वेळ मिळाला नाही कारण बाहेरच्या दिवाणखान्यात  आता लोक जमले होते व घरात चोर घुसलेला आहे हे त्यांना समजल्याने ते त्याचा आता कसून शोध घेत होते. आता घरमालक शेठजी  सुद्धा हॉल मध्ये आलेले होते .. चोराला सगळीकडे शोधल्यावर आणि तो न सापडल्यावर  जेव्हा सगळे पुन्हा हॉल मध्ये जमले तेव्हा शेठजींनी त्यांच्या जुन्या जाणत्या नोकराला तिजोरीची खोली बघायला सांगितले. चोराने पळून जाताना तिजोरीच्या खोलीला कुलूप लावल्याने ती बाहेरून बंद होती ..  नोकराने तेथील कुलूप पाहून शेठजींना तसे सांगितले. सगळ्यांना हायसे वाटले .. 

                         आता बाकी सगळे उद्या दिवस उजाडल्यावर बघू असे शेठजी म्हणाल्याचे ऐकल्यावर मात्र आतमध्ये आता माझ्या अंगात कापरे भरले. आता उद्या सकाळी मी चोरी न करता देखील  आयताच पकडला जाणार या जाणिवेने मी हबकून गेलो आणि का कोण जाणे पण मी काहीतरी करून  त्या खोलीचा दरवाजा उघडला जावा या हेतूने  खोलीतून मांजराच्या पिलाचा आवाज काढला.. 

                              रात्रीच्या शांततेमुळे तो सगळ्यांनी ऐकला नि शेठजींनी घरातील जुन्या जाणत्या स्त्री नोकराणीला ती तिजोरीची खोली उघडून त्या पिलाला बाहेर काढायला सांगत तेथून प्रस्थान केले. संध्याकाळी मी खोली बंद करतांना हे पिल्लू तिथे नव्हते म्हणतच  तिने खोलीचे दार उघडले अन ती  संधी साधून मी तिला जोरदार धक्का देत    जीवाच्या  आकांताने कंपाउंड वॉल च्या त्या पाडलेल्या भगदाडातून जीव मुठीत घेऊन बाहेर पळालो. घरातील लोक माझा पाठलाग करायला लागले. 

                            घरातल्या लोकांची  बोंबाबोंब ऐकून आता  बघताबघता चोर चोर ओरडत ५० लोक माझा पाठलाग करायला लागले आणि  आता मी पकडला जाणार असे मला स्पष्ट दिसायला  लागले ,तेवढ्यात पळताना मला गावा  बाहेरच्या विहिरीजवळ एक मोठ्ठी शिळा नजरेला पडली .. आणि कसे ते माहिती नाही पण एक क्षणभर विचार करत आहे नाही ती ताकद लावून मी ती उचलली आणि त्या विहिरीत टाकली. त्याचा भलामोठा  आवाज आला आणि विहिरीतून पाण्याचा जो मोठ्ठा फवारा उडला त्या गडबडीत मी जवळच्या पिंपळाच्या झाडामागे जाऊन लपलो.

                              आता माझा पाठलाग करणारे विहिरीजवळ येऊन ठेपले होते. विहिरीतून उडणारा पाण्याचा  फवारा  त्यांनी सुद्धा  बघितला असल्याने पडला पडला चोर पाण्यात पडला असा त्यांनी जल्लोष केला. काही जण त्या अंधारात चोराला शोधायला लागले. मी सुद्धा आता हळूच त्या गर्दीत सामील  झालो ..  काही जण म्हणाले .. चला बरे झाले सापडला ,कारण विहिरीला पायऱ्या नसल्याने आता चोर वर येऊ शकणार नाही म्हणून आता त्याला उद्या सकाळी येऊन पकडून चोप देऊ. असे म्हणत गर्दी पांगली .. आणि हे बघा मी आत्ता तुमच्या समोर उभा आहे .

                           हे सांगताना मात्र त्याच्या  नजरेत त्या वेळी "  बोला ,या सगळ्याला आता तुम्ही काय म्हणणार असा आत्मप्रौढीचा  प्रश्नार्थक भाव होता.  बापाने तो ओळखला .

                              बापाने त्याच्या डोळ्यात शांतपणे पहात फक्त इतकेच सांगितले "आता उद्या पासून तू तुझे काम एकट्याने करायला हरकत नाही. तुझे ट्रेनींग संपले आहे." 


तात्पर्य : मिळालेल्या यशाची कधी चर्चा करू नका.    


बुधवार, २३ मे, २०१८

देव करो ,नि उद्याचा दिवस माझा असेल !


 ग्रेट सूफी संत हसन शेवटच्या घटका मोजत असता त्याचे काही शिष्य त्याला म्हणाले "महाराज , आपल्या कडे या क्षणी सुद्धा जगाला खूप काही देण्यासारखं आहे  हे आम्ही जाणतो ...   आपण अजून बोलू शकत आहात ,तरी कृपया आपण आम्हांला आपल्या गुरूंचे ते नांव सांगा ,ज्यांच्या कडून आपल्याला इतकी अगाध ज्ञानप्राप्ती या आयुष्यात झालीये...

हसन म्हणाला " आत्ता या क्षणी मी ती नावं सांगत बसलो तर काही दिवस,महिने,वर्षे लागतील,जो वेळ आता माझ्या कडे नाहीये ,ज्यांच्या कडून मी आयुष्यात खूप काही शिकलो, पण माझे त्यातील ३ गुरूं असे होते ज्यांना मी कधीच   विसरू शकत नाही....

माझा पहिला गुरु एक चोर होता ... 

एकदा वाळवंटात मी रस्ता चुकलो आणि एका अपरात्री मी एका गावात येऊन पोहोचलो. सगळ्यांचे दरवाजे बंद होते त्या मुळे त्या भयानक थंडीत मला आता कुठेच आसरा मिळायची शक्यता नव्हती ,तितक्यात माझी एका  चोराशी गाठ पडली... मी त्याच्याशी माझ्या रात्रीच्या निवाऱ्या बद्दल विचारणा केली असता तो म्हणाला , " तुम्ही चेहऱ्यावरून एखादे धार्मिक ,अध्यात्मिक गुरु दिसताय . तुमच्या चेहऱ्यावर ते तेज मला स्पष्ट दिसतंय ,पण व्यवसायाने मी एक चोर आहे आणि माझ्या कामाला बाहेर पडलोय... पण तुमची तयारी असेल तर चला ,मी तुम्हांला माझ्या घरी घेऊन जातो ,तुम्ही माझ्या कडे आज मुक्काम करा...माझी काही एक हरकत नाहीये .... क्षणभर मी घाबरलो पण विचार केला कि, मी सूफी आहे आणि हा चोर असून सुद्धा याला माझी भीती वाटत नाही तर मी याला भिण्याचे कारण काय ??? मी त्याच्या मागे चालत त्याच्या घरी पोहोचलो...

मी अंदाज बांधल्याचा विपरीत तो चोर स्वभावाने, वर्तणुकीने  आणि आदरातिथ्याने इतका चांगला होता  कि, मी त्याच्या कडे रमलो आणि पुढील काही महिने मी त्याच्याच  घरी राहिलो...आता तो रोज रात्री मला सांगायचा ..."मी माझ्या कामाला जातोय ,पण तुम्ही तुमची पूजा-अर्चा ,ध्यानधारणा निवांत करा,माझी चिंता करू नका... मी रात्री उशिराने येईन..

तो रात्री परतल्यावर मी उत्सुकतेपोटी त्याला रोज विचारायचो  "आज ,काही मिळालं का ?" आणि तो सांगायचा  कि, .....नाही !.... आज काही नाही मिळालं  पण उद्या मात्र नक्की मिळेल... हा प्रकार पुढे जवळपास महिनाभर असाच सुरु राहिला ,..... चोर रोज रात्री चोरी करायला जायचा आणि रिकाम्या हाताने परत यायचा... पण  मला त्याचे नेहमी आश्चर्य वाटायचे कि, त्या महिन्याभरात तो  मला कधीही  निराश झालेला दिसला नाही...तो मला रोज सांगायचा " देव करो नि, उद्याचा दिवस माझा असेल... माझं काम होईल...या उपर तो मला म्हणायचा कि, "महाराज ! तुम्ही तर इतके देवधर्माचें करता ,तुम्ही तर आमच्या पेक्षा देवाच्या जास्त जवळचे आहात त्या मुळे  तुम्ही सुद्धा देवाकडे माझ्या साठी प्रार्थना करा कि, या गरीब माणसाला मदत कर ...त्याला त्याच्या कार्यात यश मिळू दे ! त्याचे काम उद्या नक्की होऊ दे....  

तर हा चोर होता माझ्या आयुष्यातील माझा पहिला गुरु...कारण मी वर्षानुवर्षे ध्यानधारणा करून,कित्येकवेळा देवप्राप्तीच्या अतिशय जवळ पोहोचायच्या पायरीवरून जेव्हा-जेव्हा  मागे खेचला जायचो आणि माझा देवावरील ,देवाच्या अस्तित्वावरील विश्वास उडायची वेळ यायची तेव्हा-तेव्हा मला या चोराचे ते शब्द आठवायचे कि, " देव करो नि उद्याचा दिवस माझा असेल",मी उद्या पुन्हा प्रयत्न करेन !  ... आणि मी तेव्ह-तेव्हा आठवायचो कि,हा चोर असूनही "त्या उद्या" करीत इतका प्रयत्नवादी आणि आशावादी राहू शकतो तर मी अजून एक दिवस प्रयत्न करायला का हरकत नाही ? आणि मी पुन्हा ध्यानधारणेच्या मार्गावर मार्गस्थ व्हायचो...



माझा दुसरा गुरु एक कुत्रा होता !


एकदा मला  तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी मी एका नदी तीरापाशी आलो. तिथेच हा कुत्रा मला दिसला...त्याला सुद्धा  तहान  लागली होती... पण तो नदीकाठी जायचा पाण्यात त्याचेच प्रतिबिंब पहायचा ,घाबरायचा , त्या प्रतिबिंबावर भुंकायचा आणि मागे फिरायचा असे दोन-चारदा झाले ... पण त्या कुत्र्याला तहानच इतकी लागली होती कि, शेवटी हिय्या करून त्याने त्या पाण्यातल्या त्याच्या प्रतिबिंबावर चाल केली आणि पाण्यात उडी घेतली.. प्रतिबिंब गायब झाले ,कुत्र्याने त्याची क्षुधा भागवली आणि तो पोहत-पोहत निवांतपणे पाण्याबाहेर पडला... 


हा सगळा प्रकार दूर उभा राहून मी पाहत होतो... मला लगेच लक्षात आले कि, या प्रसंगाच्या निमित्ताने देवाने मला संदेश पाठवलाय ... कि, वेळ आल्यावर तुम्हाला त्या अज्ञाताची कितीही भीती वाटो ,पण  त्या भीतीवर स्वार होत जर तुम्ही त्यात उडी घेतली,स्वतःला विश्वासाने त्यात झोकून दिले तर ती भीती कायमची दूर होते.... मग मी विचार केला कि, जर त्या कुत्र्याला ते जमू शकले तर मला का म्हणून जमणार नाही ???  आणि त्या नंतर माझ्या मनांतील "एखादी गोष्ट करतांना "ती मला जमेल नां " ही माझी भीती कायमची गेली... तर अशा तऱ्हेने तो कुत्रा हा माझा दुसरा गुरु होता...

माझा तिसरा गुरु एक छोटा मुलगा होता ...

एकदा मी एका गावात संध्याकाळी जवळपास अंधार पडत असतांना शिरलो आणि मला समोरून एक छोटा मुलगा मशिदीच्या दिशेने हातात पेटवलेली मेणबत्ती अतिशय सांभाळून नेतांना दिसला... हातातील ती मेणबत्ती विझू नये म्हणून त्याने एका हाताने तिच्या ज्योतीवर काळजीपूर्वक आडोसा धरला होता आणि  तो जपून चालत होता..... का कोण जाणे पण  मी त्याला वाटेतच जरा थांबवलं... आणि विचारलं कि, "ही मेणबत्ती तू स्वतः पेटवली का ? तो म्हणाला हो !" मग मला त्याची थोडीशी गम्मत करावीशी वाटली, म्हणून मी त्याला विचारलं कि,मग त्यात उजेड कोठून आला ? कारण हि मेणबत्ती पेटवे पर्यंत तेथे अंधार होता आणि ती तू पेटवल्यावर पेटली .... तर आता मला सांग कि, त्यात उजेड कोठून आला ?  कारण तू तो उजेड येतांना बघितला असणार ! नाही का ?

माझ्या या प्रश्नावर तो मुलगा मनापासून खळखळून हसला आणि त्याने त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर जोरात फुंकर मारली आणि ती विझवली... मला समजलं नाही कि, त्यानं हे असं का केलं ते ? पण नंतर त्याने माझ्याकडे वळून पाहिलं आणि मला विचारलं कि, "आत्ता हि मेणबत्ती तुमच्या समोर पेटलेली होती... तिच्यात उजेड होता ,आणि आत्ता तुमच्या डोळ्यादेखत तो उजेड नाहीसा झालेला तुम्ही बघितलात तर आता तुम्ही मला सांगा कि, तो उजेड कुठे गेला ?... तुमच्या डोळ्यादेखत सगळा प्रसंग घडलाय !


त्या मुलाच्या त्या अनपेक्षित कृतीने मी आता गांगरून गेलो.. निरुत्तर झालो ... माझ्यातला "स्वाभिमान" कितीही नाही म्हणलं तरी दुखावला गेला .. माझ्या ,ज्ञानाला,बुद्धिमत्तेला त्याने मोठा हादरा बसला ... मी जमिनीवर आलो आणि त्या क्षणापासून माझ्यातला  माझा "मी" हा तेथेच गळून पडला....     

 स्वैर अनुवाद.. :ओशो -सिक्रेट ऑफ सिकेट्स  वरून साभार   



बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

विजय अरोरा ,स्मृतिदिन, २७ डिसेंबर

काही लोकांच्या विषयी पुरेशी माहिती करून न  घेता आपण त्यांच्या परस्पर त्यांच्या विषयी स्वतःची मते बनवतो आणि तीच योग्य आहेत अशी समजूत करून घेऊन ती दुसऱ्यांच्या समोर मांडतो , हा मनुष्य स्वभाव आहे.... या पद्धतीने ते तसे मत मांडणे ,त्याच्यावर आरोप करणे किंवा त्याच्या विषयी कागाळ्या करणे याला मराठीत हेत्वारोप असे नाव आहे.(हा शब्दप्रयोग मराठी भाषेतून हळूहळू लुप्त होत चालल्याने हे एवढे विश्लेषण)

हे इतके सविस्तर सांगायचे कारण म्हणजे आज अशा दोन व्यक्तींचा जन्मदिवस आहे ज्यातील पहिली व्यक्ती ही  कायमच वादग्रस्त राहिली आहे आणि दुसरी व्यक्ती विनाकारणच तिच्या आयुष्यात फ्लॉप अभिनेता किवा अयशस्वी व्यक्तिमत्व होते असा बऱ्याच जणांचा समज आहे. तर त्या दोन व्यक्ती म्हणजे पहिली सलमान खान आणि दुसरी  विजय अरोरा.  

आज २७ डिसेंबर ,सलमान खान आणि विजय अरोराचा आज जन्म दिवस..

सलमान बद्दल आज बरंच तुम्हांला वाचायला मिळणार कारण त्याचं नाणं अजून चलनात आहे.त्या मुळे मी त्याच्या विषयी आज काहीच बोलणार नाहीये ... पण विजय अरोरा आज स्मृतीच्या पडद्याआड झालाय ..(१९४४-२००७) त्या मुळे आज फक्त त्यालाच उजाळा.

विजय अरोराचा  जन्म १९४४ चा.गांधीनगर ,गुजरातचा ... सुमारे ११० सिनेमे आणि ५०० हून अधिक टीव्ही सिरीयल्सचे भाग अभिनेता म्हणून यशस्वीरित्या केल्यानंतर याने स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरु करत अनेक जाहिराती तयार केल्या. या क्षेत्रातील भारतातील पहिली आय एस ओ ९००० कंपनी असण्याचा मान याच्या कंपनीने मिळवला आहे. त्याने जेम एन्ड ज्वेलरी कौन्सिल इंडिया या संस्थेचे असंख्य कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन तर केलेच पण त्या सोबत असंख्य कंपन्याची प्लेईंग कार्ड्स बनवत ती अमेरिकेतील वार्नर ब्रदर्स कंपनीच्या सुपर man चित्रपटासाठी उपलब्ध करून दिली .    

२००७ साली पोटाच्या किरकोळ दुखण्याने दवाखान्यात दाखल झालेला हा अभिनेता अचानक लिव्हर कॅन्सर च्या शेवटच्या स्टेज मध्ये असल्याचे डॉक्टरी निदान झाले नि हा तडकाफडकी ६३ व्या वर्षीच हे जग सोडून गेला.... विशेष म्हणजे हा पुण्यातील फिल्म इन्स्टीट्यूट चा १९७१ चा अभिनयाचा गोल्ड मेडलीस्ट या नात्याने  तरुण पिढीला मुंबईमध्ये अभिनय,योगासने आणि शारिरीक तंदुरुस्तीचे पाठ द्यायचा ... याचा मुलगा फरहाद हा सुद्धा  फेरारी,मसेराटी या इम्पोर्टेड रेसिंग गाड्यांचा भारतातील प्रमोटर आहे.

थोडक्यात काय तर बेभरवशाच्या चित्रपट व्यवसायात राहून सुद्धा याचे अवघे ६३ वर्षाचे याचे निष्कलंक  आयुष्य हे  अत्यंत यशस्वी होते, यात तिळमात्र शंका नाही.

तात्पर्य : फक्त जे चकाकते तेवढेच फक्त सोने नसते , तर सोन्याची पारख करायला प्रथम आपण स्वतः जातिवंत सोनार असण महत्वाच असतं.   


विजय अरोराचे आजचे गाजलेले गाणे यादोंकी बारात या सिनेमातील...झीनत अमान सोबतचे ,रफी –आशा या कॉम्बिनेशन चा सुंदर नमुना म्हणून रसिकांनी मान्य केलेले ...  ↓ 






रविवार, २३ ऑक्टोबर, २०११

आयुष्यात उंच भरारी घ्यायची आहे ? तर मग हे वाचा.....

एकदा एका राजाला अरेबिया मधून दोन अप्रतिम बहिरी ससाणे भेटी दाखल मिळाले.राजाने आजवर बघितलेल्या स्थलांतरित,प्रवासी  बहिरी ससाण्यांच्या मधील "केवळ अप्रतीम " अशी ती जोडी होती.राजाने  त्या  जोडीला त्यांच्या पुढील प्रशिक्षणासाठी  त्वरित त्याच्या दरबारातील बहिरी ससाण्याच्या प्रशिक्षकाच्या ताब्यात दिले.
काही महिन्यां नंतर एके दिवशी,त्या प्रमुख प्रशिक्षकाने राजाला येऊन सांगितले कि त्या जोडीतील एक ससाणा आकाशात उंचच उंच अशी जादुई  भरारी अगदी लीलया घेतो पण... जोडीतील दुसरा ससाणा मात्र आकाशात उडणे तर दूर  त्याला येथे आणल्या दिवसा पासून त्याच्या फांदी वरून हललेला सुद्धा नाही.

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

ग्लास खाली ठेवायला शिका..!

त्या दिवशी प्राध्यापकांनी अगदी वर्गात शिरताच,  एका काचेच्या ग्लास मध्ये थोडेसे पाणी घेत तो हातात लांब धरतच त्या दिवशीच्या वर्गाला सुरुवात केली.
"ह्या ग्लासचे वजन किती असेल असे तुम्हाला वाटते ?"
खरे तर प्राध्यापकांच्या ह्या अनपेक्षित प्रश्नामुळे, सुरुवातीला सगळेच  विद्यार्थी बुचकळ्यात पडले खरे, पण नंतर अंमळ थोडेसे भानावर येत,
'५० ग्रॅम' !......१०० ग्रॅम !......सव्वाशे ग्रॅम ! अशी काहीशी उत्तरे त्यांच्या कडून आली.

ह्यावर प्राध्यापक महाशयांनी,
" खरे तर ! मलाही आत्ता, ह्याचे नक्की किती वजन आहे हे माहिती नाहीये,  पण,आता मला सांगा कि,जर मी हा ग्लास असाच अजून काही मिनिटे हातात धरून ठेवला तर काय  होईल ?" हा पुढचा प्रश्न विचारला.
"काहीही नाही ! काही होणार नाही "
विद्यार्थ्यांनी एकमुखाने सांगितले.
"ठीक आहे!......आता मला सांगा कि मी हा ग्लास... असाच... ह्या पद्धतीने समजा एक तास भर जर हातात धरून ठेवला तर काय होईल?"

मंगळवार, ७ जून, २०११

आम्हाला "मुलगी" हवीये !

हो............ आम्हाला मुलगी हवीये,नि तेच कसे १००% बरोबर आहे हे आम्ही पुराव्याने सिद्ध करू इच्छितो.विश्वास बसत नाही नां ? मग हा घ्या पुरावा....... अगदी फोटोंसहित ..........

रविवार, १ मे, २०११

“शेवटचं पान”

ही  गोष्ट आहे अमेरिकेतली. १८९० च्या सुमारास न्यूयॉर्क शहरातील ग्रीनविच व्हिलेज मध्ये बरेच कलाकार वास्तव्यास असायचे. स्यू  आणि जोन्सी ह्या दोघी त्या पैकीच एक. अगदी पहिल्यांदा त्या दोघी एकमेकींना जेव्हा  तिथल्या एका रेस्टाँरंट मध्ये भेटल्या,तो त्यां वर्षीचा मे  महिना होता.
“मी मेन स्टेट मधून आलेय नि मासिकांच्या कथांसाठी  चित्रे काढून देते.”
स्यू ने आपली ओळख करून देत जोन्सीला  सांगितले.
"आणि मी कॅलीफोर्नियाची, पण खरे तर मला मनातून इटलीला जायची  खूप इच्छा आहे.नि तेथे जाऊन  बे ऑफ नेपल्सची खूप चित्रे काढायची ईच्छा  आहे."
जोन्सी उत्तरली.
त्या दिवशी त्या दोघींची ती पहिलीच भेट असून सुद्धा  अगदी पहिल्या भेटीतच दोघींचे सूर असे काही जुळले कि त्यांनी त्यांच्या कला ह्या विषया बरोबरच अगदी कपडे, ड्रेस, खाण्यापिण्याची आवड निवड ह्या विषयावर सुद्धा मनसोक्त गप्पा मारल्या.

सोमवार, २५ एप्रिल, २०११

आयुष्या वर पाहू काही..

आयुष्या वर बोलू पाहू काही..
खरे तर ह्या फोटो मधल्या बऱ्याच गोष्टी ह्या  खरे तर आपल्याला माहिती असतात,कळत हि असतात  पण त्याची नेटाने अंमलबजावणी करणे अंमळ अवघडच असते.पण तरी हि आपण सगळे त्या बघून त्यातील आपल्याला कितपत रुचतंय,झेपतंय हे आपापले आपणच ठरवू यात.चला तर मग ... जरा वेळात वेळ काढून एक नजर टाकताय ना?


 रोज किमान एक अर्धा तास तरी फिरण्याचा व्यायाम हवाच..आणि हो असं हसता आल तर सोन्याहून पिवळ !  नाही का?

गुरुवार, १४ एप्रिल, २०११

"एका लग्नाची गोष्ट" पण चित्ररूप

तिचे नाव कॅटी आणि त्याचे नाव निक.
उत्कटप्रेम हे दोन प्रेमीजीवांना कुठवर घेऊन जाऊ शकतं त्याचे हे अतीशय दुर्मीळ उदाहरण बघीतलं की थक्क व्ह्यायला होतं.पहिल्यांदा बघितल्यावर पुन्हा दुसऱ्यांदा नजर त्या वरुन आपोआपच फ़िरते.वाटलं तर तुम्हीहि अनुभव घेऊन बघा.

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

पैसा भले तुमचा असेल पण त्याच्या उगमस्रोताची मालकी समाजाकडेच आहे

जर्मनी हा देश औद्योगिकदृष्ट्या प्रचंड प्रगत देश आहे. बेन्झ,बी एम डब्लू ,सिमेन्स हे जगप्रसिद्ध ब्रान्ड   सुद्धा इथलेच. अगदी अणुभट्टी साठी  लागणारे पंप सुद्धा इथे एखाद्या छोट्या शहरामध्ये सुद्धा बनतो अन त्यांच्या प्रचंड प्रगतीची साक्ष देतो.

इथे यायच्या अगोदर वरील सगळ्या पार्श्वभूमीमुळे,इथले लोक हे अतिशय चैनीचे अन छानछोकीचे   जीवन  जगत  असणार हा माझा स्वाभाविक समज होता,अन त्यात काही गैर सुद्धा नव्हते

मी जेव्हा जर्मनीतील दुसऱ्या अन  युरोपमधील आठव्या क्रमांकाच्या मोठ्या शहराला म्हणजेच  हॅम्बर्गला जेव्हा पोहोचलो ,तेव्हा तेथे माझ्या मित्रांनी माझ्या स्वागताच्या जय्यत तयारीचा एक भाग म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये भोजन समारंभाचे आयोजन केले होते. 


आम्ही जेव्हा हॉटेल मध्ये पोहोचलो तेव्हा फारशी गर्दी अशी नव्हतीच.बरीच टेबले अजून रिकामीच होती.कोपऱ्यातल्या एका टेबलावर एक तरुण जोडपे जेवत बसले होते.समोर फक्त दोन बियरचे  कॅन अन दोन डिशेस,...बसं...   इतक्या मस्त अशा ह्या तरुण जोडप्याचे हे असे  एवढेसे जेवण, 'हे' रोमँटिक जेवण इथे ह्यांच्या देशात असूच कसे शकते ह्या कल्पनेनेच मी चकित झालो.हे सगळ बघून "सालं ह्या चिक्कू प्रियकराला हे सगळ पाहून हि पोरगी सोडून तर जाणार नाही ना?" असा हि  विचार क्षणभर माझ्या डोक्यात उगीचच येऊन गेला.

रविवार, २७ मार्च, २०११

दॄष्टिकोन

दॄष्टिकोनाचे महत्व

गणितातील सौंदर्या कडे एका वेगळ्या नजरेने,दृष्टिकोनातून बघितल्यास आपल्याला गणिताची एक वेगळीच अनुभूति येईल.
1 x 8 + 1 = 9 
12 x 8 + 2 = 9 8
123 x 8 + 3 = 9 8 7
1234 x 8 + 4 = 9 8 7 6
12345 x 8 + 5 = 9 8 7 6 5
123456 x 8 + 6 = 9 8 7 6 5 4
1234567 x 8 + 7 = 9 8 7 6 5 4 3
12345678 x 8 + 8 = 9 8 7 6 5 4 3 2
123456789 x 8 + 9 = 9 8 7 6 5 4 3 2 1 

1 x 9 + 2 = 11 
12 x 9 + 3 = 111 
123 x 9 + 4 = 1111 
1234 x 9 + 5 = 11111 
12345 x 9 + 6 = 111111
123456 x 9 + 7 = 1111111
1234567 x 9 + 8 = 11111111
12345678 x 9 + 9 = 111111111 
123456789 x 9 +10= 1111111111

9 x 9 + 7 = 88
98 x 9 + 6 = 888 
987 x 9 + 5 = 8888 
9876 x 9 + 4 = 88888 
98765 x 9 + 3 = 888888 
987654 x 9 + 2 = 8888888
9876543 x 9 + 1 = 88888888
98765432 x 9 + 0 = 888888888 

कमाल आहे.. नाही? 

1 x 1 = 1 
11 x 11 = 1 2 1
111 x 111 = 1 2 3 2 1 
1111 x 1111 = 1 2 3 4 3 2 1 
11111 x 11111 = 1 2 3 4 5 4 3 2 1 
111111 x 111111 = 1 2 3 4 5 6 5 4 3 2 1 
1111111 x 1111111 = 1234567654321 
11111111 x 11111111 = 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 1 
111111111 x 111111111 = 12345678987654321
आणि आता ह्या साधर्म्याकडे जर लक्ष द्या

 आणि आता अगदी गणिताच्या काटेकोर दॄष्टीकोनातून पाहू: What Equals 100%? What does it mean to give 100%? How about ACHIEVING 100%. What equals 100% in life?
Here’s a little mathematical formula that might help Answer these questions:  
थोडं इकडे लक्ष द्या

जर
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z 
Is represented as:
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. 
तर
H-A-R-D-W-O-R- K 8+1+18+4+23+15+18+11 = 98% 
आणि
K-N-O-W-L-E-D-G-E 11+14+15+23+12+5+4+7+5 = 96% 
पण
A-T-T-I-T-U-D-E 1+20+20+9+20+21+4+5 = 100% 

Therefore, one can conclude with mathematical certainty that: While Hard Work and Knowledge will get you close, Attitude will get you there !

सदरहू पोस्ट हे आमचे मित्र श्री.राजीव वर्मा ह्यांनी शेयर केलेल्या ईंग्रजी व्हिडिओचा,मराठी स्वैरानुवाद आहे.मला तो अतिशय आवडल्याने,आपल्या मराठी वाचकां समोर तो आणण्याचा हा एक प्रयत्न. राजीवभाई मन:पूर्वक धन्यवाद.