भोज्जा

गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

"फेसबुक" वापरतांय ? तर मग हे बघायलाच हवे !

"फेसबुक" हे "हत्यार" दुधारी सुरी आहे.वेळप्रसंगी शिवीगाळ अथवा समोरच्याची दिशाभूल करून त्याचा गैरवापर करणे हे तेथे नवीन नाही. त्या मुळे ते वापरताना खूप जपूनच वापरले पाहिजे.येथे मी फक्त मला आलेल्या एका मेसेजचा नमुना वानगी दाखल देत आहे.फेसबुकवर जे लोक खास करून महिला,मुली आपला खरा खुरा चेहरा घेऊन उतरतात व त्यांच्या मित्रमंडळींना(?) त्यांच्या खाजगी जीवनात प्रवेश करण्याची आयती संधी उपलब्ध करून देतात त्यांच्या साठी ही पहा एक धोक्याची सूचना.
प्रस्तुत मेसेज मधील ह्या मुलीला ...नव्हे..... खरे तर ह्या फोटो खालच्या प्रोफाईलवर  एके ठिकाणी १७,१५८  subscribers (?)आहेत असे दिसते तर दुसऱ्या एका ह्याच फोटोचा वापर केलेल्या प्रोफाईल मध्ये तिला थोडे थोडके नव्हे तर तब्बल ४८९४ मित्रमंडळी असल्याचे दिसून येते.हा एकच फोटो वापरून तयार केलेल्या काही प्रोफाईल मध्ये हि मुलगी डॉक्टर ,अकौंटंट,शिक्षिका असल्याचे दिसते तर काही ठिकाणी तिचा फोटो चक्क विवाह विषयक साईट्स मध्ये दिसून येतो आणि काही मर्यादे पलीकडील अवैध साईट्स मध्ये तर ह्या फोटोचा वापर, ती अगदी विक्री साठी सुद्धा उपलब्ध आहे असे दर्शविते.हा पहा त्या फोटोचा धुमाकूळ....

थोडक्यात, महिलांनी,विशेषतः मुलींनी फेसबुकचा किंवा अगदी कोणत्याही सामाजिक संकेतस्थळाचा (सोशल नेटवर्किंग साईट्सचा) वापर करताना,खास करून त्यावर मित्रमंडळी जोडताना विशेष सावध रहाणे हे ह्या पुढील काळात अजून गरजेचे असणार आहे आणि ह्या पोस्टचे वाचक हा निरोप त्यांच्या आया-बहिणी, मित्रमैत्रिणींच्या पर्यंत पोहचवून तसे सहकार्य करतील असा विश्वास आहे.धन्यवाद.

१३ टिप्पण्या:

 1. मित्र हो !खरे तर आजच्या तरुण पिढीला हा किंवा ह्या प्रकारचे अनुभव हे फारसे नवीन नाहीत ह्याची मला कल्पना आहे तथापि हा प्रकार किंवा हे असले उद्योग कोणत्या थरा पर्यंत गेले आहेत किंवा जाऊ शकतात ह्याची कदाचित सरसकट सगळ्यांनाच माहिती नसायची शक्यता गृहीत धरून,ती थोडीफार माहिती व्हावी व त्यांनी "अजून" सावध रहावे फक्त ह्या साठी येथे ह्या पोस्टचे खास मराठी वाचकांसाठी आयोजन केले आहे.वाचक/प्रेक्षक त्याचा योग्य तो विचार करतील अशी खात्री आहे.धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 2. फार ज्वलंत विषय मांडला ...त्या बद्दल धन्यवाद.......

  उत्तर द्याहटवा
 3. प्रती तुषार चौधरी,
  आपण म्हणता त्या प्रमाणे हा विषय ज्वलंत आहे,होता नि राहील... खरे तर मी सुद्धा तो येथे सर्वांसमोर अगदी पहिल्यांदा-बिहील्यांदा वगैरे सुद्धा काही मांडला नाहीये.ह्या विषयावर चर्चा तर आजची तरुण पिढी फेसबुक वर करतच असते/होती.फरक जर कुठे असेल तर "ह्या" विषयाच्या साठी केवळ हे माहिती वजा उदाहरण म्हणून हि एक मराठी लिंक आपल्या सगळ्यांना,मला आलेल्या मेल मुळे मला उपलब्ध करून देता आली.

  मुळात अजून अगदी शहरी सुशिक्षित भागातील सायबर कॅफे मध्ये सुद्धा "सेशन " संपताना जिथे बऱ्याच जणांना त्यांनी त्यांच्या वेळात ब्राउज केलेली हिस्टरी डिलीट करायची माहिती नसते. तेथे फार काही अपेक्षा करणे /ठेवणे चुकीचे ठरते.अन केवळ त्या मुळेच ह्या पोस्टचे प्रयोजन.बऱ्याचदा फेसबुक सारख्या सोशल नेट वर्किंग साईट वर एक करतो म्हणून दुसरा त्याची री ओढतो असे चित्र आहे किंवा असते किंवा खास करून तरुणांमध्ये झटपट अक्सेस साठी मेल अकौंट आता पारंपारिक होत चालले आहे,त्या मुळे ह्याचे गांभीर्य अजून वाढते.
  किती हि खबरदारी घेतली तरी चोऱ्या ह्या होतंच राहणार/राहतात असे अगदी म्हटले तरी कुणी बाहेर जाताना आपल्या घराला कुलूप लावायचे बंद केल्याचे माहित नाही.त्याच प्रमाणे किमान पक्षी खबरदारी बाळगलेली चांगली,हा मुख्य हेतू.
  आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. mynac,

   लोक बोलत असतात पण असे उदाहरणासह पोस्ट केल्यामुळे लोकांमध्ये लवकर जनजागृती होईल. परत एकदा धन्यवाद आणि अशाच प्रकारच्या पुढच्या पोस्ट करता शुभेच्छा....

   हटवा
 4. बापरे.. आम्ही या विषयावर चर्चा करायचो. पण उदाहरण पाहून जरा जास्तच आश्चर्य वाटले.. असो विषय खूप चांगला आणि मोठ्ठा आहे. यावर चर्चा होतच राहणार..
  ब्लॉग चांगला झाला आहे

  उत्तर द्याहटवा
 5. प्रती इनर सर्कल,
  खरे तर हे एवढे मोठे धडधडीत उदाहरण माझ्या हि कधी पाहण्यात नव्हते.त्यातून ह्या मुलीचा फोटो सुद्धा असा आहे कि तो ह्या सर्व प्रोफाईल मध्ये त्या-त्या व्यक्तीचा म्हणून बघायला गेले तर अगदी "फिट्ट" असा बसलाय.आमच्या एका मित्राच्या भाषेत सांगायचे तर तो अंगाला चिकटून बसणाऱ्या नायलॉन स्पोर्ट्स स्लॅक्स सारखा आहे. त्याच्या म्हणण्या नुसार ती पँट ज्या पद्धतीने ताणली जाते त्या मुळे जशी ताईला,आईला,दादाला अगदी सगळ्या-सगळ्यांना होते,अगदी एवढेच काय पण वेळप्रसंगी ती बाबा हि घालू शकतात.तसेच काहीसे येथे झाले आहे.ह्यातील अतिशयोक्तीचा नि विनोदाचा भाग जरी सोडलं तरी एकूण प्रकार विचार करायला नक्कीच भाग पाडतो.प्रसिद्ध व्यक्तींचा फोटो एखाद्याच्या प्रोफाईलचा "अवतार"(ओळख) म्हणून एकवेळ आपण समजू शकतो, पण येथे ज्या पद्धतीने त्या फोटोचा त्या सर्व लोकांनी वापर केला आहे ते पाहता,खरे तर त्याचा वापर ज्यांनी-ज्यांनी आपल्या प्रोफाईल मध्ये केला आहे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.सायबर क्राईमने जर मनावर घेतले तर त्यांना हे काम बिलकुल अवघड नाही,असे वाटते.पण कदाचित हे फक्त हिमनगाचे १/३ एवेढेच दिसत असणारे टोक असेल तर आपल्या सारख्यांना काय माहित ? त्या मुळे केवळ सावधगिरी बाळगणे एवढेच आपल्या हातात उरते.
  आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 6. Hi mynac

  GE :) Happy Sankranthi.

  In this internet world, whom v hv 2 believe whom not???..

  Just a prayer - Oh My God please always show me the right and good person and good path.

  regards

  उत्तर द्याहटवा
 7. ohhhhhhhh y my timing is showing 'AM" now it's 6.35 PM :P my arrival time is bad???

  उत्तर द्याहटवा
 8. Dear sujatha,
  Happy Sankranthi to you and your family too...

  "ohhhhhhhh y my timing"...... No its not your mistake,the arrival is @ right time but it's problem from Google side...like JN. & as there is not too much traffic here comre to JN I have not taken any efforts to change it.

  उत्तर द्याहटवा
 9. हो हि खरी स्थिती आहे , माझ्याही मित्रांच्या यादीत अशा काही मुली आहेत ज्यांना मी ओळखतो पण त्यांनी दुसऱ्याच नावाने खाते उघडले आहे आणि त्याची कारणे तर अफलातून आहेत.
  पण असा उपद्व्याप पहिल्यांदाच पाहतोय .
  म्हणून मी आपल्या ब्लोग चे हे पान शेअर करतोय फेसबुक वर

  उत्तर द्याहटवा
 10. प्रती
  मराठी कट्टा,
  आपले स्वागत आणि प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा