भोज्जा

रविवार, ४ डिसेंबर, २०११

शेयरबाजारात पैसे मिळवायचे?तर मग हे वाचाच...

          उगाच पाल्हाळ लावण्या पेक्षा डायरेक्ट मुद्यालाच हात घालुयात.शेयरबाजारात आपण कुठल्याही  कंपनीचा शेयर घेतला कि त्या शेयरची ती गुंतवणूक योग्यवेळ आहे नाही,आपण जर नफ्यात असू किंवा आलो तर तो कुठे विकावा किंवा जर त्या गुंतवणुकीत तोटा होत असेल तर तो अजून किती काळ होऊ शकतो ,ह्या सर्वसाधारण आपल्या सारख्या छोट्या गुंतवणूकदारांना पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर बंगलोर येथील श्री.इलँगो ह्यांच्या स्टॉकवेल्थ ह्या ब्लॉगवर मिळू शकेल.सदरहू लेखक ही माहिती गेल्या ३ वर्षा पासून विनामूल्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जवळपास दररोज नियमित प्रसिद्ध करतात.शेयर बाजारातील प्रमुख ५० मिड्कॅप आणि निफ्टी  मधील ५० कंपन्यांच्या शेयरची "आजची स्थिती" अशा प्रकारची "विश्वासार्ह "माहिती देणारा माझ्या माहितीतील हा भारता मधील एकमेव ब्लॉग आहे.

          आपण फक्त एवढेच करायचे कि सदरहू ब्लॉग वर प्रसिद्ध होणाऱ्या टेबलवर शक्यतो रोज किंवा किमान अधून मधून तरी नजर टाकायची व आपल्या  गुंतवणुकीचा  आढावा घ्यायचा.त्या टेबल मधील JNSAR म्हणजे "जस्ट निफ्टी स्टॉप एंड रिव्हर्स " ह्या कॉलम मधील निळ्या आकड्यातील किंमत हि सर्वात महत्वाची,म्हणजे तुमच्या शेयरची,तुम्ही केलेल्या गुंतवणुकीची किंमत,म्हणजेच तुम्ही तो शेयर घेताना त्याची तुमची जी खरेदीची  किंमत होती ती किंमत जर त्या(JNSAR) आकड्याच्या खाली असेल तर ती गुंतवणूक योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि  तुमची खरेदी किंमत जर त्या आकड्याच्या वर असेल तर,आत्ता तुमचा शेयर हा सध्याच्या बाजारात नरम पडला असून तुमची गुंतवणूक हि कधी पासून फायद्यात यायची शक्यता आहे ते त्या शेयरच्या JNSAR किमती वरून तुम्हाला अगदी सहज समजू शकते.थोडक्यात, तुमची खरेदी किंमत हि आजच्या त्या शेयरच्या JNSAR किमतीच्या जितकी जवळ किंवा लांब  त्या वरून तुम्हाला  तुमच्या शेयर मध्ये प्रॉफिट  कधी बुक करायचा किंवा तुमचा शेयर नफ्यात कधी यायची शक्यता आहे ह्याचा अंदाज येऊ शकतो,जी सर्वसामान्य गुंतवणूकदाराची,अगदी नेहमी प्राथमिक गरज असते.बाजारातील तुमच्या शेयरच्या किमतीत  मागणी-पुरवठा तत्वा नुसार होत असलेली वध-घट हि ज्या किमतीस केंद्रीभूत धरून बाजारातील मोठे ग्राहक त्या शेयर मध्ये व्यवहार करीत असतात आणि त्या केंद्रीभूत किमती पासून त्या शेयरची आज बाजार बंद होताना काय स्थिती आहे हे दर्शविणारी किंमत म्हणजेच JNSAR किंमत,आणि वरील चढाओढीत ह्या केंद्रीभूत किंमती मध्ये रोजच्या रोज थोडाफार बदल "होतच असतो."        

          सदरहू ब्लॉगर श्री.इलँगो हे भारतीय शेयरबाजाराचे १९९२ पासून अतिशय सखोल अभ्यासक असून त्यांचे शेयरबाजाराशी संबंधित दोन ब्लॉग आहेत.त्यांच्या जस्ट निफ्टी ह्या ब्लॉगवर रोज शेयरबाजाराचे वेळेत ते अतिशय निस्वार्थीपणे विनामूल्य मार्गदर्शन करतात आणि फक्त निफ्टी ट्रेडिंग ह्या विषयावर रोज किमान ४ पोस्ट अपडेट करत असतात आणि संध्याकाळी त्या दिवसाचे पोस्ट द्वारे विवेचन असते.त्यांच्या ह्या दोन्ही ब्लॉगवर ते कधीही कोणत्याही प्रकारचे कॉल देत नाहीत,म्हणजे हा शेयर किंवा निफ्टी इथे घ्या, तिथे विका,वगैरे वगैरे किंवा  आता मला अस वाटतंय वगैरे वगैरे.सदरहू ब्लॉगर हे  शेयर बाजाराचे ईलियट वेव्ह ह्या टेक्निकल संज्ञेचे मी आजवर बघितलेले सर्वात मोठे अभ्यासक आहे.सदरहू दोन्ही ब्लॉग हे फक्त शेयरबाजारातील ट्रेडिंग ह्या विषयाची नि त्यातील टेक्निकल अनालिसिस विषयाची अतिशय अभ्यासपूर्ण पण अतिशय सोप्या भाषेत माहिती देणारे सर्वस्वी विनामुल्य ब्लॉग आहेत.अभ्यासू आणि ह्या विषयाची आवड असणाऱ्या मराठी  वाचकांनी ह्याचा जरूर जरूर लाभ घ्यावा असे नम्र निवेदन.

          सदरहू ब्लॉगर श्री.इलँगो ह्यांचे हे काम गेली ३ वर्षे मी नियमितपणे पाहत आल्यानेच आणि मराठी मध्ये ह्या प्रकारे शेयर बाजारातील ट्रेडिंग अथवा टेक्निकल अनालिसिस ह्या विषयी अतिशय सखोल,खरोखरचे  विनामूल्य आणि निस्वार्थीपणे मार्गदर्शन करणारे करणारे साहित्य नियमितपणे केवळ उपलब्ध नसल्याने ह्या पोस्ट द्वारे मी हा खटाटोप केला आहे.व्यक्तीशः मी, श्री.इलँगो यांना कधीही भेटलेलो नाही,अथवा त्यांनी कधीही मला अथवा कुणालाही वरील प्रकारची माहिती तुम्ही प्रसिद्ध करा असे सांगितले नाही व तसे सांगण्याची त्यांना बिलकुल गरज देखील नाही.कारण त्यांच्या ब्लॉगची गेल्या ३ वर्षातील वाचकांची चव्वेचाळीस लाख पंचवीस हजार ही संख्या नि त्या वाचकांनी बघितलेली एक कोटी पेक्षाहि अधिक अशी पृष्ठसंख्या हा त्याचा धडधडीत पुंरावा आहे.एखाद्या विषयाशी संबंधित मोठे किंवा प्रसिद्ध नाव, किंवा  कोणत्याही प्रकारची त्याची त्या ब्लॉगर तर्फे प्रसिद्धी केली नसतानाही आणि नसून हि ,एखाद्या ब्लॉगची इतकी वाचक संख्या असलेले हे भारतातील बहुदा एकमेव उदाहरण असावे.

                    "मला तुमचा हा JNSAR चा फॉर्म्युला मेल करा किंवा कळवा" "तो काय ?" किंवा तो कसा केला आहे?" वगैरे ह्या प्रकारचे  असंख्य आणि अगणित प्रश्न आजवर अनेकांनी त्यांना विचारून झाले आहेत सदरहू  JNSAR चा फॉर्म्युला हा त्यांनी त्यांचे सहकाऱ्यांचे सहयोगातून तयार केला असून,त्यांच्या मते तो अजूनही परीक्षणा अंतर्गत आहे असे त्यांचे सांगणे असते,तथापि त्याचे रिझल्ट पाहता,तो परिपूर्णते कडे जास्त झुकलेला आहे असे निरीक्षण आहे.जे गुंतवणूकदार शेयरबाजारात गुंतवणूक केल्या नंतर सदासर्वकाळ शेयरबाजारावर,शेयरबाजाराचे वेळेत लक्ष ठेऊ शकत नाहीत, त्यांचे साठी तर हे ब्लॉग, हि सोन्याची संधी आहे असे इथे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.             
           त्या मुळे आपण सुज्ञ मराठी वाचक "सिर्फ फल खायेंगे और पेड गिनने कि नौबत नही करेंगे "असा मला विश्वास आहे.केवळ वाचकांचे सोई साठी जे सोमवार दि.डिसेंबर साठी  आहे ते शेयरचे ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट साठी असणारे टेबल आणि दि.५ डिसेंबर साठी असणारे निफ्टी चे टेक.टेबल येथे श्री.इलँगो ह्यांच्या पूर्व परवानगीने मी प्रसिद्ध करीत आहे.
ह्या  पोस्ट साठी  श्री.इलँगो ह्यांनी केलेल्या/करत असलेल्या मार्गदर्शना बद्दल,सहकार्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.हे पोस्ट माझ्या साठी/आमच्या साठी अतिशय विशेष आहे.ह्या पोस्टच्या निमित्ताने  शेयरबाजारातील "आमच्या" ह्या गुरूला श्री.इलँगो ह्यांना माझ्या सारख्या त्यांच्या अनेक एकलव्यां तर्फे त्यांच्या निरपेक्ष वृत्तीने कार्य करीत असलेया कार्याची ही एक छोटीशी पोहोच पावती/छोटीशी गुरुदक्षिणा,आज आम्हा सर्वांचे वतीने मला देता आली, ह्याचा विशेष आनंद वाटतो. त्याचा स्वीकार करावा,   प्रणाम  गुरुजी.....      ilango, vanilango@gmail.com 
to  me   
Hi..Mynac,


Let me congratulate you on your tireless services to the Marathi community. That is true sharing.

My best wishes.

I might add here that those interested to monitor individual stocks could download one of the stock's file or even Nifty TA file and replace the data with the stock's data (From yahoo finance) and watch the Tech.table. And in the absence of JNSAR, they could follow J10SAR for those stocks not covered in our stockwealth. It'll be time consuming but it is worth the time spent. In the end, how one takes things seriously and follow the studies and not their own thinking resulting from distracting noises in the market. "Stillness has power within". (Hence a tortoise lives for 1000's of years)

Best wishes.

ilango


धन्यवाद गुरुजी...६ टिप्पण्या:

 1. Though I am not a Marathi, but I really appreciate your thoughts. I have always valued your precious inputs on the market and after seeing this work, it increased a thousand-fold. Hats off!

  उत्तर द्याहटवा
 2. Hi mynac

  Really hats off to your patience. Watever it is some may feel "mother tongue" is always convenient to them. So definitely this will be helpful for them.

  As i don't hv much experienced person in market and life anyway all the best. :) Me too was hv a thought to open a blog in tamil (after seeing ur blog) in simple terms "how to trade" huh...it's very tough to maintain a blog ...the blogger needs much patience which i don't hv. :P :( Always happy with Master's place :D


  Regards

  उत्तर द्याहटवा
 3. Hi Mynac

  I don't understand a single word of this blog But can understand that two wonderful men Ilango and mynac are doing something useful to the trading community.

  Good Luck.

  उत्तर द्याहटवा
 4. Dear FIRE,Sujatha and San,
  First of all thanks a lot for your visit here.Its honor for me.....

  Friends,
  Dear FIRE is one of the best meticulous technical analysts of Elliot wave theory,who recently has started his blog related to Indian Stock market particularly for Nifty Technical Analysis.So its not surprise that market players used to wait for his"Fire Work".He is doing wonderful Job.

  I am sure,readers of this Blog surly know Dear Sujatha,who has provided and is providing lot of Blogging material for this Blog,but she is rather well known for her fast and correct,intelligent trading decisions,during market Hrs,with spontaneous comments & studious Fibonacci levels,which is very rare in such a Business like stock market.So always hats off to her..

  Dear San is a very rare personality,whose Blog followers are not only limited to India but lot of international followers are there because his way of understanding and predicting Indian as well as U.S. market possibilities through very simple but very effective charts is just amazing.One must visit there.

  उत्तर द्याहटवा
 5. Dear Mynac
  I am Maharashtrian so I am very happy to see
  and read about Just Nifty blog on your blog
  that too in Marathi for the Marathi people.
  I wish you all the best for the future.
  Many Many Regards!
  Shradha Saburi

  उत्तर द्याहटवा
 6. Dear Shradha Saburi,
  Thanks a lot for your visit and comment there after.Nice to see you,being a Maharashtrian and you are also active in Stock Market.
  All the best to you also....

  उत्तर द्याहटवा