एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...
पुणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
पुणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, १९ सप्टेंबर, २०१२
सोमवार, ९ जानेवारी, २०१२
"पुण्याचे निरक्षर नगरसेवक "
"केवळ ६६ नगरसेवकांनाच पडले प्रश्न" ह्या मथळ्या अंतर्गत "दै.सकाळ " पुणे आवृत्तीत नुकत्याच ३ जाने.ला आलेल्या बातमी नुसार गेल्या ५ वर्षात, जून २००७ ते डिसेंबर २०११ ह्या कालावधीत मावळत्या महापालिके मध्ये निवडून आलेले १४४ नगरसेवक आणि ५ नामनिर्देशित सदस्य अशी १४९ संख्या होती/आहे.ह्या ५ वर्षात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ह्या एकूण १४९ सदस्यांपैकी निम्म्याहून अधिक नगरसेवक/सेविकांनी त्यांच्या विभागा मधील कोणत्याही विकास कामाबद्दल,सुधारणे बद्दल कधीही कोणताही लेखी प्रश्न उपस्थित केला नाही.थोडक्यात त्यांनी त्यांच्या ह्या अधिकाराचा कधी वापरच केला नाही,किंवा त्यांना शहरा बद्दल किंवा त्याच्या विकासकामा बद्दल कधी कोणता प्रश्नच पडला नाही.
खरे तर महापालिका अधिनियमानुसार नगरसेवकांना नागरी सुविधा ,विकास कामे,योजना आदि संदर्भात सर्वसाधारण सभेत असे लेखी प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. दर महिन्याच्या सर्वसाधारणसभेत हे प्रश्न मांडता येतात.हे प्रश्न फक्त नगरसचिव कार्यालयात त्यांना आधी दाखल करावे लागतात व तो प्रश्न सर्वसाधारण सभेत घ्यावा कि न घ्यावा ह्याचा निर्णय महापौर घेतात.मात्र सर्वसाधारणपणे बहुतेक सर्व प्रश्न सर्वसाधारण सभेत चर्चेला ठेवले जातात असा अनुभव आहे.लेखी प्रश्नांच्या आधारे प्रशासनावर अंकुश ठेवण्यास मदत होत असते,हा त्या मागचा मुख्य हेतू ...त्यातील गमतीचा अजून एक भाग म्हणजे ह्या ६६ नगरसेवकांपैकी काही नगरसेवकांनी केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सुद्धा केवळ नावालाच प्रश्न विचारले होते असे हि निदर्शनास आले आहे....

पण ह्यात त्या माननीय(?)नगरसेवक/सेवकांची काहीही चूक नाही ..... आणि त्यातून जेव्हा पुण्यातील ५०% नगरसेवक कोण असावेत हे जेव्हा झोपडपट्टीवासीय ठरवितात/ठरविणार आहेत तेव्हा तर हि औपचारिकता पूर्ण केली काय किंवा न केली काय सर्व सारखेच.त्या साठी कृपया सोबतचा खालील तक्ता पहावा {सौजन्य:पुणे स्लम एटलास आणि दै,सकाळ )
प्रभागनिहाय लोकसंख्या
प्रभागांची संख्या झोपडपट्टीमधील लोकसंख्या
प्रभागनिहाय लोकसंख्या
प्रभागांची संख्या झोपडपट्टीमधील लोकसंख्या
- ३ १०० टक्के
- ३ ७६ ते ९९ टक्के
- १२ ५१ते ७५ टक्के
- १८ २६ ते ५० टक्के
- ३२ १ ते २५ टक्के
- ८ 0 टक्के
शनिवार, ३१ डिसेंबर, २०११
रविवार, २७ नोव्हेंबर, २०११
पुण्यातील वॉकिंगप्लाझाचे कौतुक
पुण्यातील लक्ष्मीरोड वरील वॉकिंग प्लाझाचा प्रयोग यशस्वी होत आहे अशी आजच्या वर्तमान पत्रात बातमी आहे.हा प्रयोग यशस्वी होणार नाही किंवा होऊ शकणार नाही असे वाटायचे खरे तर काहीच कारण नाही आणि नव्हते.कारण पोलिसी खाते आणि अतिक्रमण खाते ह्यांनी जर ह्या पूर्वी सुद्धा,हा सध्याचा समन्वय दाखविला असता तर, खरे तर हे असले प्रयोग करण्याची वेळ सुद्धा त्यांचे वर आली नसती.वास्तविक पाहता ह्या दोन्ही खात्यांच्या प्रचंड निष्क्रियतेतूनच सध्याची परिस्थिती उद्भवली होती आणि आहे.लक्ष्मी रोडवरील आणि तेथील फुटपाथ वरील अनधिकृत फेरीवाले अतिक्रमण खात्याला न दिसणे आणि तेथे खरेदीला आलेल्या लोकांनी त्यांच्या गाड्यां मध्ये ड्रायव्हर बसवून ठेवून,ती वाहतुकीला अडथळा उत्पन्न होईल अशी उभी करून ठेवेणे आणि ते हि अगदी एका मागोमाग एक, अशा पद्धतीने, हे सर्व सगळ्यांना दिसत असून हि पोलिसांना ते न दिसणे हे, ह्या पूर्वीही शक्य नव्हते आणि ह्या पुढे हि नसेल.
मुळात गाडीत जर ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसला असेल,........
मुळात गाडीत जर ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसला असेल,........
रविवार, १८ सप्टेंबर, २०११
"मराठमोळया गप्पांची" विचकट पेट्रोल दरवाढ.
"मी मराठी" वर "मराठमोळया गप्पांची काही अंशी पेट्रोल दरवाढ" झाली. माझ्या पेट्रोल दरवाढ...व्यंगचित्र रूपाने ह्या पोस्टचे काही अंशी संकलन करून "विचकट" ह्यांनी ते "मी मराठी" ह्या संकेत स्थळावर गप्पाटप्पा या सदरात प्रसिद्ध केले.
गुरुवार, १ सप्टेंबर, २०११
माझ्या घरातील यंदाची श्री गणेश मूर्ती ...२०११
माझ्या घरात यंदा गणपती बाप्पांचे विराजमान झाल्या नंतरचे पहिले दर्शन.
सोमवार, २१ मार्च, २०११
ज्याच्या त्याच्या व्यवसायाचे गणित.
आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात खूप काही बघत असतो,अनुभवत असतो पण त्या कडे वेगळ्या नजरेने बघण्यास आपणा कडे न वेळ असतो ना सवड.
सकाळी बस स्टॉप वर बसची वाट पाहत होतो.बस यायला बराच वेळ होता कारण आधीची बस मी स्टॉप वर येता येता समोरून गेली होती त्या मुळे आता चिंता नव्हती. त्या मुळे गर्दी कडे पाहत बसण्या शिवाय पर्याय नव्हता. तेवढ्यात माझे लक्ष तेथे काम करीत असलेल्या कॉर्पोरेशनच्या झाडूवाल्या कडे अनाहूतपणे गेले.त्याला आज त्याच्या खात्या कडुन नवीन खराटा मिळालेला दिसत होता.आता नवीन खराटा मिळाला ह्यात खरे तर काही विशेष नव्हते पण त्याच्या दॄष्टिने ती गोष्ट मोठी होती.कारण ती त्याच्या उपजीविकेच्या करिता महत्वाची होती,आणि नंतरची १५-२० मिनीटे माझी कशी गेली ते नंतर माझे मला सुद्धा कळले नाही.

रविवार, १० ऑक्टोबर, २०१०
बुधवार, १५ सप्टेंबर, २०१०
प्रणम्य शिरसा देवं ! गौरी पुत्रं विनायकम !!
![]() |
एकदंताय विद्महे ! वक्रतुंडाय धीमही !! ऐसा गणेश मंगलमूर्ती ! तो म्या स्तविला यथामती ! वांच्छा धरुनी चित्ती ! परमार्थाची ! ध्यान गणेशाचे वर्णिता ! मतिप्रकाश होय भ्रांता ! गुणानुवाद श्रवण करीता ! बोले सरस्वती !! समर्थ रामदास स्वामी |
आमच्या घरचा यंदाचा गणेशोत्सव २०१०
ओमकार स्वरूपा सदगुरु समर्था!अनाथांच्या नाथा तुज नमो!! भव्यरूप वितंड ! भीम मूर्ती महा प्रचंड ! विस्तीर्ण मस्तकी उदंड ! सिंधूर चर्चिला !! नाना सुगंध परिमळे ! धबधबा गळती गंडस्थळे ! तेथे आली षटपद कुळे ! झुन्कारशब्दे !! समर्थ रामदास स्वामी |
मोरया,मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे
![]() |
| यंदा माझ्या घरात विराजमान झालेले गणपती बाप्पा नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे ! अत्यंत ते साजिरे ! माथा शेंदूर पाझरे वरि बरे ! दुर्वांकुराचे तुरे ! माझे चित्त विरे मनोरथ पुरे ! देखोनी चिंता हरे ! गोसावीसुत वासुदेव कवि रे ! त्या मोरयाला स्मरे ! |
शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०
गणेशोत्सव २००९
प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकम!भक्तावासं स्मरे नित्यं ,मायुः कामार्थ सिद्धये!!
माझ्या घरातील गणेश उत्सव २००९
गणपती बाप्पा मोरया २००८
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समःप्रभ!
निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा!! प्रारंभी विनंती करू गणपती !
विद्यादयासागरा !
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मति दे !
आराध्य मोरेश्वरा !!
चिंता,क्लेश,दारिद्र्य,दुःख अवघे !
देशांतरा पाठवी !
हेरंबा गणनायका गजमुखा !
भक्ता बहु तोषवी !!
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०
"सहस्त्रबुद्धे" नि "पोलीस"
एका रविवारी मी सकाळी-सकाळी मित्रा बरोबर खरेदी साठी तुळशीबागे जवळ गेलो होतो.सकाळ असूनही मंडईचा परिसर असल्याने गर्दी हि होतीच.मित्रं काही एक खरेदी साठी दुकानात गेल्याने नि दुकानात गर्दी असल्याने मी बाहेरच उभा राहून गर्दीचे निरीक्षण करू लागलो.तेवढ्यात एक गोरेगोमटे गृहस्थ आपल्या बायकोला स्कूटर वर घेऊन त्या दुकाना समोर येऊन थांबले.नुकतीच मंडई केली असल्याने(बहुदा आठवड्याची)स्कूटर पिशव्यांनी गच्च भरल्या सारखी दिसत होती.गृहस्थ गाडी वरून खाली न उतरता बायकोला थोडे दरडावण्याच्या सुरातच"लौकर ये"असा दम देऊन तिथेच थांबले.'नो पार्किंगचा'बोर्ड असल्याने त्यांनी गाडी वरून उतरणे नि गाडी पार्क करणे हुशारीने टाळले नि ते पण माझ्या प्रमाणेच प्रेक्षकांच्या गर्दीत मिसळले.
रविवार, १ ऑगस्ट, २०१०
बदलते पुणे नि पुण्यातील बदल
मित्रांनो,
आजचा सकाळ वाचला.कु.दर्शना तोंगारेच्या खुनाची बातमी वाचली आणि मन सुन्न झालं.अहो ह्या आमच्या पुण्याला झालाय तरी काय आणि त्यात चाललाय तरी काय ?एक जेमतेम २२ वर्षाची तरुणी,आपलं शिक्षण पूर्ण करून नुकतीच नोकरीला लागती काय,संध्याकाळी कामावरून घराजवळ येते काय आणि घराजवळ तिच्यावर जीवघेणा हल्ला होऊन त्यात तिचा बळी जातो काय,सगळेच अविश्वसनीय.
गेल्या काही वर्षांपासून जसे पुण्याचे भौगोलिक,सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या रूप पालटत गेले तसे सगळेच बदलले.मुळचे पुणेकर इथे अल्पसंख्य झाले आणि बाहेरून आलेले मग ते कुठून का असेना, पुणेकर म्हणून मिरवायला लागले.भले पूर्वी पेन्शनरांचे शहर म्हणून पुण्याला ओळखायचे पण पुण्याला निदान काही एक शिस्त होती, एक संस्कृती होती ती आता लयाला गेलीय आणि हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. पूर्वी पोलिसाचा लहानांना नव्हे तर मोठ्यांनाही धाक होता,चौकात लाल दिवा दिसल्यावर सायकलवाला सुद्धा शिस्त म्हणून थांबायचा,कारवाला त्याचा स्वतःचा आब राखून शहरामधून कार चालवतांना डाव्या बाजूने ओव्हरटेक कधीच करायचा नाही,ह्या छोट्या गर्दीच्या रस्त्यावर सायकलवाला, स्कूटरवाला आपल्याला ओव्हरटेक करणार हे गृहीत धरायचा.मुळात त्याची नुसती गाडी मोठी नसायची तर मन हि मोठे असायचे.नंतरच्या काळात कोणतीही गाडी ,रस्त्याच्या कोणत्याही भागातून डावीकडून, मधून, उजवीकडून, कुठूनही चालायला लागली.शहराच्या मध्यवस्तीतले रस्ते,अहो रस्ते कुठले बोळ म्हणा बोळ,पण ते ही एकेरी बनले.रस्त्यांनी जाताना पायी चालणाऱ्यांचा जीव त्यांच्या मुठीत आला.एकेरी वाहतुकीमुळे रस्ते वेगवान झाले,वाहने वाढली,गाड्या वाढल्या,गाड्यांचे आकारमान वाढले पण आता, आत बसलेल्याची मन खूप छोटी झाली.पूर्वी सायकलला सुध्धा गाडी म्हणायचे,नंतर त्याची जागा स्कूटर ने घेतली पण आता छोट्या चारचाकीवाल्याला सुध्धा इज्जत राहिली नाही.पूर्वी शेजारी-पाजारी, नात्यात गोत्यात कोणी गाडी घेतली तर खरोखरचे मनापासून कौतुक व्हायचे.आता एसेमएस चा जमाना आला,कौतुकाचा भडीमार होतो पण आतून जळजळ वाढली.भला उसकी कमीज मेरे कमीज से ज्यादा सफेद कैसीच्या जाहिराती पॉप्युलर झाल्या. असो .लिहिण्यास काही कमी नाही,सांगण्या सारखे खूप काही आहे वाचणारे आणि त्या वर विचार करणारे तुमच्या सारखे आहेत पण एवढे असून सुद्धा परिस्थिती काही अगदीच वाईट नक्कीच नाहीये.तरुण पिढी नक्कीच आशादाई आहे.ह्यातून ही नक्कीच मार्ग निघेल असा भरंवसा आहे .मला तर होप्स आहेत तुम्हाला काय वाटतंय?

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)