भोज्जा

भारत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भारत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

गुरूची विद्या गुरूला

प्रसंग १९७३ चा आहे.तामीळनाडू दौर्यावर पंतप्रधान इंदिरा गांधी  शंकराचार्यांच्या कांची मठात गेल्या.

मठातील सर्वांनी स्वागत करून त्यांना शंकराचार्यां कडे नेले.

 १ तासभर इंदिराजी व शंकराचार्य एकमेकां समोर बसले , पण दोघे ही एकमेकांशी एकही शब्द बोलले नाहीत.

तासाभराने इंदिराजींकडे पहात छोटेसे स्मितहास्य करून शंकराचार्य आतमधे निघून गेले.

निराश होत इंदिराजी तेथून निघून गेल्या. दुसर्या दिवशी  वर्तमानपत्रात ही बातमी हेडलाईन होती.

नंतर पत्रकारांनी शंकराचार्यांना विचारले कि स्त्रीपंतप्रधान असल्याने तुम्ही इंदिराजींशी असे वागलांत कां ?  पंतप्रधान म्हणून इंदिराजी त्यांना आवडत नाहीत कां ?

मात्र यावर शंकराचार्यांनी पत्रकारांना जे सांगीतले ते ऐकून सगळे चकित झाले.

शंकराचार्य म्हणाले,  मागे मी हिंदू  धर्मादाय निधी खाते ( HR & CE Department ) या मिनिस्ट्रीला  संबोधून पंतप्रधान कार्यालयाशी , हिंदू देवळांशी संबंधित असलेल्या अडचणीं विषयी जेव्हा पत्रव्यवहार केला , तेव्हा पंतप्रधानांना या विषयासंबंधित चर्चेस मला वेळ नसल्याचे कळविले.

त्या काल येथे आल्यावर , मठाधिपती म्हणून मला त्यांच्याशी हा विषय वगळता त्यांच्या खाजगी किंवा राजकीय आयुष्या विषयी बोलण्यांत कुठलेच स्वारस्य नव्हते आणि हिंदू धर्म धर्मादाय निधी ,हिंदू देवळांच्या अडचणीं या विषयाची चर्चा करण्यांस त्यांना वेळ नाही...मग अशा वेळी मी काय करणे अपेक्षित होते असे तुम्हांला वाटते ?

तात्पर्य : डॉक्टर्स नेहमी पेशंटचा रोग पाहून उपचाराची दिशा ठरवतात....😜🙈😉



मंगळवार, ७ जून, २०११

आम्हाला "मुलगी" हवीये !

हो............ आम्हाला मुलगी हवीये,नि तेच कसे १००% बरोबर आहे हे आम्ही पुराव्याने सिद्ध करू इच्छितो.विश्वास बसत नाही नां ? मग हा घ्या पुरावा....... अगदी फोटोंसहित ..........

शनिवार, १९ मार्च, २०११

कोकणातील होळी उत्सव (श्रीवर्धन )

होलिकोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ........2011..........  

उत्तर भारतात साजरा केला जाणारा रंगोत्सव म्हणजेच होलिकोत्सव हा महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने खास करुन कोकणात नि उर्वरित महाराष्ट्रात अग्नि पूजनाने साजरा केला जातो.अग्नि देवतेचे स्मरण,आभार नि वाईट -साईट गोष्टींचा निषेध, तसेच, त्याग ह्या सणाच्या निमित्ताने होळी मध्ये केला जातो.खास करुन माणसाच्या मना मध्ये सदैव जागृत असणाऱ्या अहंकाराची होळी ह्या निमित्ताने व्हावी असेच ह्या सणाचे प्रयोजन तर नसावे? कारण चढ़ाओढ़,मत्सर,हेवेदावे हे आजच्या जीवन शैलिचे अविभाज्य घटक बनू पाहत आहेत.चला आजच्या सणाच्या निमित्ताने त्याची आपण सर्वजण मिळून होळी करुयात.अहंकार,मत्सराच्या बैलाला घो...............
 

रविवार, १७ ऑक्टोबर, २०१०

विजया दशमी

दसरा सण मोठा ,
नाही आनंदाला तोटा!

विजयादशमीच्या  सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

रविवार, ३ ऑक्टोबर, २०१०

बापू

काल गांधी जयंती सर्वत्र नेहमीच्या उत्साहात साजरी झाली.रात्री टी.व्ही.ऑन केल्यावर सालाबाद प्रमाणे वेगवेगळ्या नेत्यांचे,पुढार्यांचे हस्ते वेगवेगळ्या शहरात,गावात गांधींच्या पुतळ्यास हार घालणे कुठे गोरगरिबांना,दीनदुबळ्यांना कशाना कशाचे तरी वाटप करणे वगैरे वगैरे नेहमीचे प्रकार चालूच होते.ते ह्या पुढेही,अन त्या पुढेही म्हणजे अगदी गांधीजी जो पर्यंत आपल्या नोटेवर आहेत तो पर्यंत चालूच राहणार आहेत हे सांगणे नको.

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०१०

ईद मुबारक

"सर्व धर्म समभाव"
श्री.आदमभाई शेखचाचा,जावेदभाई,शाहीदभाई,शोएब,शब्बीरभाई तांबोळी आणि कुटुंबीय,रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवाना हार्दिक शुभेच्छा.
ईद मुबारक हो!

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा

सर्व वाचकांना,१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.