एव्हाना कोलावेरी डी चे तोंड फाटे पर्यंत कौतुक करून झाले आहे,तरुण पिढीला त्याने घातलेली भुरळ पाहता तरुणांच्या ह्या आवडी पेक्षा त्यांची खरोखरच्या श्रवणीय संगीताच्या बाबतीत सध्या होत असलेली उपासमार प्रकर्षाने नजरे समोर येते.सध्याच्या संगीतकारांच्या सिनेमातील गाण्याला दिलेल्या अति सुमार चाली पहाता,सगळ्याच वाईट गाण्यात त्यातल्या त्यात बरे काय तर कोलावेरी डी ...आणि म्हणून तर खरे,ते जास्त उचलले गेले असावे अस उगीच राहून राहून वाटत.
एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...
"आपलं"...काही तरी.... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
"आपलं"...काही तरी.... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, २ डिसेंबर, २०११
शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११
गुरुवार, १ सप्टेंबर, २०११
रतन खत्री आणि "कुंकू"
आज बऱ्याच दिवसांनी झी मराठीच " कुंकू " बघायचा योग आला नि एकेकाळचा मटकाकिंग रतन खत्रीची आठवण झाली.म्हणजे झालं असं कि,बावळट,दुबळ्या नि ह्या अनुषंगाने येणाऱ्या बऱ्याच विशेषणांनी युक्त म्हणजेच बिनडोक वगैरे वगैरे असलेल्या जानकी वरील सध्याच्या नवीन अत्याचारांची मालिका बघून... हे अत्याचार आज थांबतील ,उद्या थांबतील ह्या आशेने वर्षानुवर्षे हि मालिका बघणाऱ्या आमच्या तमाम भगिनी वर्गाची होणारी उलघाल,झालेली अगतिकता बघून खूप भरून आले.कारण संध्याकाळचे सात वाजल्यावर एकवेळ "ते" कुंकू गेलं तरी चालेल म्हणजे म्हणजे स्वतःचे सौभाग्य पण "हे" कुंकू जाता कामा नये एवढी ह्या मालिकेची महिलां मध्ये लोकप्रियता आहे.थोडक्यात काय तर कामावरून घरी येणाऱ्या स्वतःच्या त्या "कुंकवा" पेक्षा,आमच्या भगिनी वर्गास ह्या "कुंकवाची" नि जानकीची काळजी जास्त.
शुक्रवार, ३ जून, २०११
चिंतातूर जंतू.. अर्थात डांबरट पुणेकर...
आम्ही रिटायर्ड,म्हणजे लोकांच्या दृष्टीने रिकामटेकडे,पण आमच्या दृष्टीने सर्वात जागरूक असे पुणेकर सध्याच्या "वाघ्या" नाट्या विषयीच्या गदारोळा मुळे फार नाराज आहोत.ह्या विषयातील तज्ञ, इतिहास संशोधक त्यातील सत्य-असत्य,वास्तवता-काल्पनिकता ह्याचा जरूर तो पाठ पुरावा करतील,तो महाराष्ट्र पुढे आणतील ह्यात आमच्या मनात शंका नाही.पण ह्या भानगडीत त्यांनी "आमच्या" सारख्यांचे फार "नुसकान" केले आहे.
छ्या ! पुरावे देऊन काहींनी खेळातील सगळी गम्मत घालवायचा चंगच बांधलाय राव ! हे बरोबर नाही,अस नसतं चालत.आत्ता कुठे गणगौळण संपून वगाच्या दिशेने प्रवास सुरु होणार होता नि मधेच काही लोकं सगळा खेळाच्या रंगाचा बेरंग करून टाकतात.आमच्या सारख्या रिकामटेकड्या पुणेकरांची आत्ता-आत्ता कुठे ह्या विविध गुणदर्शनाच्या प्रयोगां मुळे थोडीशी करमणूक देखील व्हायला लागली होती,नि बेजान नीरस आयुष्यात रंग भरायला लागला होता नि मध्येच काहींनी ही अशी (खरी) माहिती उपलब्ध करून सगळा रंगाचा बेरंग करून टाकला.एक तर आम्ही रिटायर झाल्या पासून हिंग लाऊन आम्हाला कोणी विचारात नाही.जुनं पुणं,आताची बिघडलेली तरुण पिढी....(हो ! म्हणजे आमच्या मते,....कारण वय झाल्यावर तसं म्हणायचा एक प्रघात असतो ) पुण्यातील वाढती गर्दी , बेशिस्त वाहतूक,वाढती महागाई,सध्याचे राजकारण ते पार लादेन-बिदेन असले अगदी नॅशनल,इंटरनॅशनल विषयसुद्धा चघळून चघळून पार चोथा झाले होते,त्या मुळे,असं कोणी काही नवीन पिल्लू आमच्या डोक्यात सोडलं कि,सर्वात प्रथम म्हणजे आम्हाला रमायला होतं! नंतर आमची तल्लख बुद्धी प्रवासाला निघते म्हणजेच चालायला लागते नि नंतर नंतर तर पळायला लागते.
सोमवार, १६ मे, २०११
पेट्रोल दरवाढ...व्यंगचित्र रूपाने
आताशा पेट्रोलची दरवाढ हा विषय खरे तर अनपेक्षित किंवा धक्कादायक वगैरे बिल्कुल राहिलेला नाहीये.आंतर्राष्ट्रीय बाजारातील पेट्रोलची वाढती किंमत,देशांतर्गत पेट्रोकेमिकल कंपन्यांची वाढती वित्तीय तूट ह्या वास्तवाचा केवळ तत्कालीन सरकारने पुरेशी खबरदारी घेऊन जर योग्य वेळी सामना केला नाही तर ह्या गोष्टी अपरिहार्य असतात.खरे तर प्रत्येक पक्ष हा प्रथम सत्ता मिळविणे नि नंतर ती टिकविणे ह्यासच प्राधान्य देत असतो,त्या मुळे वित्तीय तुटीचा जेव्हा अगदी कडेलोट व्हायची वेळ येते तेव्हा हे कटू निर्णय हे घ्यावेच लागतात.आपण सर्व सामान्य जनता हि भाबडी(बावळट),निरागस (मूर्ख) असल्याने ह्या दरवाढीस सरकारच्या सांगण्या नुसार "फक्त" आंतर्राष्ट्रीय बाजारातील पेट्रोलच्या वाढत्या किंमती वर अज्ञाना पोटी विश्वास ठेवून मोकळे होतो,नि सरकारी यंत्रणेच्या योग्य वेळी योग्य निर्णय क्षमतेच्या नाकर्तेपणा मुळेच होणारी वाढती वित्तीय तूट,त्या मुळेच वाढणारा महागाई दर वगैरे सोयीस्कररित्या विसरून जातो. चला तर मग ह्या वेळी सुद्धा तेच करू... फक्त व्यंगचित्र रूपाने

बुधवार, ४ मे, २०११
लादेन... किती खरा नि किती खोटा ?
ओसामा संपला पण नेहमी प्रमाणे बरेच प्रश्न अनुत्तरीत ठेवून.खरं तर मराठी नि हिंदी सिरीयलचे आम्ही हक्काचे प्रेक्षक ह्याला आता चांगलेच सरावलो आहोत कि असे बिनडोक प्रश्न आम्हाला आता सहसा पडत नाही. पण इथे कसं डायरेक्ट लादेन आहे नि लादेन बाबत अगदी खुद्द अमरिकेने नव्हे खुद्द ओबामाने जरी अगदी आमच्या वर त्याची किंवा त्याच्या देशाची हि कृती लादेन असं जरी सांगितलं तरी आम्ही ती सहजा सहजी लादून घेणार नाहीये. काही बेसिक, भाबडे म्हणजेच बावळट असे प्रश्न हे पडतातच. मुळात तो खरच संपला का ? का संपला असे सांगून अमेरिकेने नेहमी प्रमाणे स्वतःची एकदाची सुटका करून घेतली ? कारण कुणी म्हणत तो निःशस्त्र होता तर कुणी म्हणत कि त्याच्या कडून प्रतिकार झाल्याने त्याला गोळ्या घातल्या. आता जर तो निःशस्त्र होता नि अगदी नेम धरून त्याच्या डोक्यात गोळ्या घाले पर्यंत जर जवळ जाता येत होते तर त्याला जिवंत पकडता का नाही आले ?त्या सद्दाम हुसेन सारखा ? नि इतक्या घाई घाईने त्याला समुद्रात का फेकले ? का हि सुद्धा एक फेकच आहे ? का खरा लादेन कदाचित पूर्वीच मेला असेल वा नसेल पण केवळ या विषयावर कायमचा पडदा टाकण्या साठी हे अमेरिकेचे नेहमी प्रमाणे एक नवे पण नेहमी प्रमाणेच बेमालूम नाटक आहे ?
अहो, आमच्या वाड्यात अगदी बोहारीण जरी भां S डी SS ...ये करत शिरली तरी ती कुणाच्या दारा समोर उभी राहून आवाज देतीये हे शेजारच्या काकू हातातलं काम सोडून बघतात नि इथे तर अनोळखी देशाची ४-४ हेलीकॉप्टर रात्री बेरात्री विनापरवानगी एखाद्याच्या प्रदेशात उतरतायेत, ३०-४० मिनिट आमच्या हिंदी सिनेमातल्या प्रमाणे फुल फायटिंग करतायेत नि शत्रूचा खात्मा करून भुरकन पुन्हा उडून जाताहेत.अन ते सुद्धा म्हणे त्या आय.एस.आय च्या तळाच्या फक्त ७०० मीटर अंतरावर.सगळेच संशयास्पद.एक कुणी १०-१२ वर्षाचा मुलगा काही सांगतो नि आपण आपले तोंडाचा आ करून बघत राहायचे ? बरं, फोटो दाखवून टी.व्ही. न्युज चॅनल वाले ज्याला अलिशान- आलिशान हवेली म्हणून संबोधतायेत ते घर तरी कसले डोंबलाचे अलिशान ?कुठल्या तरी एन्गलने ते अलिशान वाटते का?अहो आमच्या कडच्या सरपंचाचे घर त्या पेक्षा अलिशान असते नि सर्वात महत्वाचे म्हणजे ते दिसते….का लोक पहातेहेत नि ऐकताहेत म्हणून हुं म्हणून काहीही रेटत रहायचं ?
मुळात एखाद्या गोष्टीचे उत्तम प्रेझेन्टेशन करण्याचे अमेरिकेचे कौशल्य वादातीत आहे.अगदी चंद्रावर माणूस उतरला पासून ते इराक मध्ये सद्दाम हुसेनने केमिकल वेपन्स ठेवली आहेत ते वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडण्या -पडण्या पर्यंत.मागे ७० च्या दशकात अमेरिका-रशियाच्या त्या कोल्डवॉरच्या काळात चंद्रावर तो आर्मस्ट्रोंग उतरला काय नि न उतरला काय त्याने इथे कुणालाच फरक पडणार नव्हता. आमचा भुगोलातला तो अवघ्या २ मार्कांचा प्रश्न. पण अगदी बेंबीच्या देठापासून शंख केलेल्या सद्दाम बाबत ही सरते शेवटी हाती काहीच लागले नाही ना? ना केमिकल वेपन ना अजून काही.तो सद्दाम सुद्धा शेवटी एखाद्या अगदी हुतात्म्या सारखा फासावर गेला.अहो तिथली बहुसंख्य जनता अजून ही बऱ्या पैकी मागासलेलीच होती नि आहे.नाही तर हां सद्दाम दशाकानुदशके तेथे सत्ता उपभोगु शकला असता का ? का अमेरिका नि ब्रिटन ला येनकेंन प्रकारे संपत चाललेल्या जगातील तेलसाठ्याची जी चिंता भेडसावत होती त्या वर जगाची सहानुभूति मिळवून,बघा आम्ही होतो म्हणून तुम्ही वाचलात हे उपकार केल्याचे दाखवून त्या वर फ़क्त ताबा मिळवायचा होता? हे प्रश्न अनुत्तरितच आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर बाबत सुद्धा बरेच प्रश्न अनुत्तरितच आहेत.हेरम्ब ओकच्या ह्या पोस्ट मुळे तर त्यास पुष्टीच मिळते.त्या मुळे अगदी जरी खरोखरचा लादेन मारला गेला असे जरी आपण मान्य केले गृहीत धरले तरी हे एनकौंटर म्हणजे नेहमी प्रमाणे दर ४-६ महिन्याने टी.व्ही. वर येणारया त्या लादेनच्या टेपला आता हे अमेरिके कडून कायमचे उत्तर देऊन त्याला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न आहे का ? ह्या नंतर सुद्धा अमेरिके कडून ह्या विषायावर बरेच उलट सुलट दावे बातम्या येतंच रहातील पण आम्हां सामान्यांचा बुद्ध्यांक मुळातच कमी असल्याने असे प्रश्न मग ते कदाचित बिनबुडाचे सुद्धा असतील पण पडू शकतात नि मुळातच हुशार नसल्याने अगदी स्टॅटिस्टीकली ते मांडून त्याचा शहानिशा सुद्धा करू शकत नाही. कां लादेन संपला हे ही नेहमी प्रमाणेच उत्तर नसलेले कायमचे कोडेच राहणार आहे.
शनिवार, २३ एप्रिल, २०११
ही मराठी ब्लॉगर्सची मानसिकता ? का अजून काही?
मराठी ब्लॉगिंग मध्ये अगदी थोडीफार लुडबुड करायला लागल्या पासून बऱ्याच मराठी ब्लॉग्जला भेट द्यायचा योग आला.काहींचे लिखाण हे खूप आवडले ,तर काहींचे तितकेसे नाही.ह्यातील सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे एखाद्या ब्लॉगरचे एखादे पोस्ट आपल्याला अगदी वाचल्या वाचल्या त्या क्षणी आवडले म्हणून आपण अतिशय उत्साहाने त्यावर काही कॉमेंट दिली तर जवळपास ९० टक्क्याहून ब्लॉग वर "आपली टिप्पणी मंजुरी मिळाल्यानंतर दृश्यमान होईल" हि पाटी त्वरित आपल्या समोर येते नि आपण खट्टू होऊन जातो.साल म्हणजे होत कस कि आपण एखाद्याच्या मुलाचे तो परीक्षेत चांगल्या मार्काने पास झाला म्हणून अगदी कौतुकाने बाजारातून अगदी चांगले पेन विकत घेऊन त्याला प्रेझेंट द्यायला वेळात वेळ काढून त्याच्या घरी जावे तर त्याच्या बापाने.......... "तो स्कॉलरशिपच्या अभ्यासाची तयारी करतोय तुम्ही नंतर भेटा"... असे सांगितल्या सारखे होते.आता हातातले आणलेले पेन त्याच्या बापाने आता बघितलेलेच असल्याने ते त्याला देण्या शिवाय पर्यायच राहिला नसल्याने पेन त्याच्या बापाकडे सोपवून "बरंय येतो" म्हणत आपण काढता पाय घेतो,अन तो हि ते पेन (निर्लज्जपणे)हातात घेत "पुन्हा या" म्हणायला मोकळा.आपण तिथून बाहेर पडता पडता मनात ठरवलेलेच असते कि “सालं, कौतुकानं म्हणून आलो तर तू हि ट्रीटमेंट देतोयेस,मुलाला दोन मिनिट भेटू द्यायला काय झाल होत? ”
"झक मारली नि तुझ्या कडे आलो.पुन्हा कोण कशाला मरायला तुझ्या दारात येतंय?”
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
