"फेसबुक" हे "हत्यार" दुधारी सुरी आहे.वेळप्रसंगी शिवीगाळ अथवा समोरच्याची दिशाभूल करून त्याचा गैरवापर करणे हे तेथे नवीन नाही. त्या मुळे ते वापरताना खूप जपूनच वापरले पाहिजे.येथे मी फक्त मला आलेल्या एका मेसेजचा नमुना वानगी दाखल देत आहे.फेसबुकवर जे लोक खास करून महिला,मुली आपला खरा खुरा चेहरा घेऊन उतरतात व त्यांच्या मित्रमंडळींना(?) त्यांच्या खाजगी जीवनात प्रवेश करण्याची आयती संधी उपलब्ध करून देतात त्यांच्या साठी ही पहा एक धोक्याची सूचना.
प्रस्तुत मेसेज मधील ह्या मुलीला ...नव्हे..... खरे तर ह्या फोटो खालच्या प्रोफाईलवर एके ठिकाणी १७,१५८ subscribers (?)आहेत असे दिसते तर दुसऱ्या एका ह्याच फोटोचा वापर केलेल्या प्रोफाईल मध्ये तिला थोडे थोडके नव्हे तर तब्बल ४८९४ मित्रमंडळी असल्याचे दिसून येते.हा एकच फोटो वापरून तयार केलेल्या काही प्रोफाईल मध्ये हि मुलगी डॉक्टर ,अकौंटंट,शिक्षिका असल्याचे दिसते तर काही ठिकाणी तिचा फोटो चक्क विवाह विषयक साईट्स मध्ये दिसून येतो आणि काही मर्यादे पलीकडील अवैध साईट्स मध्ये तर ह्या फोटोचा वापर, ती अगदी विक्री साठी सुद्धा उपलब्ध आहे असे दर्शविते.हा पहा त्या फोटोचा धुमाकूळ....