भोज्जा

बुधवार, ३० मार्च, २०११

मो.रफ़ी....अजरामर आवाज

"अविस्मरणीय रफ़ी"
आज कसे कोण जाणे पण अचानक रफ़ीचे १९६४ सालात आलेल्या "चा चा चा" मधले, "सुबह न आयी... शाम न आयी..."हे गाणे एकदम आठवले.खरे तर "चा चा चा" हे गमतीदार अन तितकेच विचित्र नाव केवळ ह्या गाण्यामुळे अजरामर झालयं,अन्यथा, १९६४ मधे आलेल्या अन लेखक,निर्माता,दिग्दर्शक आणि नायक अशा सगळ्या आघाड्या एकट्याने सांभाळलेल्या,त्याच्या काळात प्रसिद्ध असलेल्या चंद्रशेखरला,तब्बल १६२ हिंदी सिनेमातून काम करून ही फ़ार कोणी लक्षात ठेवेल असे वाटत नाही.अगदी त्याच्या रहात्या अंधेरी वेस्ट रेल्वेलाईन जवळचे रहिवासी सुद्धा.आजची तरूण पिढी आमीरच्या "थ्री ईडियट" मधील "एअर लाईन ग्राऊंड स्टाफ़ २" ही त्याची भूमिका एव्हाना विसरली देखील असेल, अन आमिताभच्या ८२ मधे आलेल्या "नमक हलाल" मधील "मेहता वकील" ही त्याची भूमिका आधीच्या पिढीला सुद्धा आठवावी लागेल.पण हेलनला कोण विसरू शकेल? अहो,ती या चित्रपटाची चक्क नायिका होती.कॅब्रे डान्सर म्हणून तिची कारकीर्द नंतर बहरली.असो.


ईक्बाल कुरैशीचे संगीत,गोपालदास "नीरज" चे काव्य आणि रफ़ी साहेबांचा अफ़लातून आवाज अशी भन्नाट भट्टी जमून आल्याने हे गाणे "अजरामर" ह्या कॅटेगिरीत जाऊन बसले आहे.माझ्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी एक,आज खास तुमच्या साठी.भारत-पाकिस्तान मॅचला अजुन खूप अवकाश आहे.ऐकताय नां?  



1 टिप्पणी:

  1. मित्रांनो,पुढच्या वेळेस असेच एखादे नवीन गाणे,त्याच्या अवांतर माहिती सोबत आपल्या सोबत शेयर करण्याचा प्रयत्न करेन.बघुयात कधी योग येतोय ते.धन्यवाद

    उत्तर द्याहटवा