उगाच पाल्हाळ लावण्या पेक्षा डायरेक्ट मुद्यालाच हात घालुयात.शेयरबाजारात आपण कुठल्याही कंपनीचा शेयर घेतला कि त्या शेयरची ती गुंतवणूक योग्यवेळ आहे नाही,आपण जर नफ्यात असू किंवा आलो तर तो कुठे विकावा किंवा जर त्या गुंतवणुकीत तोटा होत असेल तर तो अजून किती काळ होऊ शकतो ,ह्या सर्वसाधारण आपल्या सारख्या छोट्या गुंतवणूकदारांना पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर बंगलोर येथील श्री.इलँगो ह्यांच्या स्टॉकवेल्थ ह्या ब्लॉगवर मिळू शकेल.सदरहू लेखक ही माहिती गेल्या ३ वर्षा पासून विनामूल्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जवळपास दररोज नियमित प्रसिद्ध करतात.शेयर बाजारातील प्रमुख ५० मिड्कॅप आणि निफ्टी मधील ५० कंपन्यांच्या शेयरची "आजची स्थिती" अशा प्रकारची "विश्वासार्ह "माहिती देणारा माझ्या माहितीतील हा भारता मधील एकमेव ब्लॉग आहे.
एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...
शेयरबाजार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शेयरबाजार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, ४ डिसेंबर, २०११
गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११
शेयर बाजार कसा चालतो ? तर असा :)
शेयर बाजार हा समजायला,रुचायला नि पचायला तसा ही अवघड विषयच आहे,नि बाजारातील मराठी माणसाचा सहभाग पाहता शेयर बाजार नि मराठी माणसाचे विळ्या भोपळ्याचे सख्य आहे,असे म्हटले तर तितकेसे वावगे ठरणार नाही.बाजारातील होणाऱ्या व्यवहारांची व्यवस्थित माहिती नि स्व-अभ्यास नसेल तर येथे तुमच्या चुकीला माफी नाही,कारण येथे रोजच्या रोज दुपारी साडे तीन वाजताच तुमच्या हुशारीचे मूल्यमापन केले जाते,आणि ते ही अगदी रोख स्वरुपात.
अर्थव्यवस्थेचे अतिरंजित प्रतिबिंब वेळे अगोदरच वेळप्रसंगी बाजारात दिसून येते असे म्हणतात कारण ती शेयर बाजाराची खासियतच आहे.बाजाराने दुरून जरी लवंग पहिली तरी ती त्यास उष्ण पडते नि वेलदोड्याच्या नुसत्या वासानेच बाजाराला हुडहुडी भरते,हे अनिवार्य कटू सत्य आहे.रावाचा रंक नि रंकाचा राव करण्याची क्षमता ज्या व्यवसायात ठासून भरली आहे,तेथे तुमच्या गरम खिशा सोबतच तुमच्या "खरोखरच्या कणखर मानसिकतेची,स्व-अभ्यासाची येथे पदोपदी परीक्षा घेतली जाते.
धर्मराजाच्या द्यूता मुळे महाभारत घडले हे माहित असूनही,माणसामधील उपजत जुगारी प्रवृत्तीला लगाम घालणे हे केवळ अशक्य आहे.त्या मुळे सर्वसामान्य सरळमार्गी लोकांनी त्या पासून चार.... नव्हे, चाळीस हात दूर राहणे हितावह असते असे म्हणतात ते खोटे नाही.ह्या पोस्ट सोबतच्या व्यंगचित्रात शेयर बाजारातील सट्टेबाजांची मानसिकता व त्यांचे व्यवहार हा विषय व्यंगचित्रकाराने थोडा अतिरंजित पण अतिशय खुबीने मांडला आहे.चला तो आधी पाहून घेऊयात नि मग हा विषय फक्त "आजच्या पुरताच" थोडा अजून पुढे नेऊयात...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)