जेव्हा-जेव्हा तुम्ही
सजगपणे इतिहासा कडे बघता तेव्हा- तेव्हा असे
लक्षात येते कि,जेव्हा
कोणत्याही देशातील तमाम जनता त्यांची जात,पात,देव,धर्म ,उदबत्या ,पणत्या,धूप, निरांजन , मेणबत्या
हे फक्त आपापल्या श्रद्धा स्थाना पुरते आणि स्वतः पुरतेच जेव्हा मर्यादित ठेवतात
आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी " तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
" हि उक्ती विज्ञानाची कास धरत जेव्हा पूर्णपणे अंगी बाणवतात तेव्हांच
त्या-त्या देशांचा विकास शक्य झाला आहे.
जेव्हा गॅलिलिओने (इ.स. १५६४-१६४२) " पृथ्वी हि स्वतः भोवती फिरत सूर्या
भोवती फिरते व चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे " हे जगाला सूर्यमालेच्या रूपात
ज्ञात करून दिले आणि ख्रिश्चन धर्मियांनी ती वास्तवात निदान त्याच्या मृत्यूपश्चात कां होईना पण
स्वीकारत स्वतःच्या विचारसरणीत जेव्हा बदल केला , तेव्हा
आणि फक्त तेव्हाच यूरोप आणि नंतर अमेरिकेत
खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली.साधारण साडेसोळाव्या शतकापर्यंत जगातील
जवळपास सर्वच देश हे देव-धर्म, आणि त्यांचे-त्यांचे धर्मग्रंथ केवळ यातच अडकलेले
होते.विज्ञानाची कास धरे पर्यंत
ख्रिस्तपूर्व ४०० वर्षे जुन्या ऍरिस्टोटल या ग्रीक तत्ववेत्याचे तत्वज्ञान
हा युरोपियन समाजाचा जणू धर्मग्रंथ होता.भगवान येशू ख्रिस्त यांचे पर्यंत आणि नंतर बायबलमध्ये वेळोवेळी त्या-त्या काळातील
देवासमान विचारवंतांनी त्यात लेखन करत, कालानुरूप स्वीकारयोग्य बदल केले.जे जगासाठी नंतर भविष्यात
वरदान ठरले.