एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन
क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...
लता मंगेशकर अनकॅबेरे साँग म्हणजे भांगेत तुळस..... नव्हे, खरंतर तुळशीत भांग.कारणलताच्या वाट्याला हिंदी सिनेमाच्या७० च्या दशकात "कॅबेरेडान्ससाँग" म्हणजेच खास करून हेलेन वर चित्रित झालेली गाणी तशी कमीचआली.मध्यंतरी खुद्द लताने सुद्धा हे स्वतः एका मुलाखतीत बोलूनदाखविले.कारणे भले काहीही असोत पण १९६९ साली येऊन गेलेल्या संजय (हा त्याकाळी पुढे खान हे आडनाव लावत नसे)साधना,अशोककुमार नि हेलेनच्या "इन्तकाम"मधील राजेंद्र कृष्ण लिखित नि लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीने संगीतबद्धकेलेले हे "कॅबेरे साँग" त्यास अपवाद आहे.गाण्याच्या सुरुवातीस हेलेनने ज्या नजाकतीने नि अदाकारीने तिच्या कंबरेचानि शरीरसौष्ठवाचा वापर ह्या गाण्यात केलाय त्याला तोड नाही.अहो, मुळात “आ जाने जा” म्हणून ती आव्हानच देतीये त्या मुळेगाण्यातील ज्येष्ठ (दिवंगत)अभिनेता असितसेनच्या तोंडाला लाळ सुटली नसती तरच नवल होतं :) शेवटी हेलेन तीहेलेनच तिला तोड नाही .....आणि नसेल हि.....
ह्या गाण्याची दुसरी अजून एक आठवण अशीकि ९ जून १९८५. रोजीकॅनडातील टोरांटोशहरात "मेपल लीफ गार्डन्स"च्या१२ हजार प्रेक्षकांनी काठोकाठ भरलेल्याप्रेक्षागृहातलता-किशोरकुमार संगीत रजनीचाकॅनडातीलकॅन्सरग्रस्तलोकांसाठी मदतीचा जो कार्यक्रम झाला होता त्यात इतर गाण्यां बरोबरच ह्यागाण्याचा सुद्धा समावेश होता नि विशेष म्हणजे भारतीय वादकां बरोबर त्यातकॅनेडियनवादकांनीसुद्धा त्यांना साथ संगत केली होती.त्या रात्री ह्याकार्यक्रमाच्या उत्पन्नातून गोळा झालेले दीड लाख डॉलर्स (त्या वेळचे ४५ लाखरुपये )हे त्या काळी उत्पन्नाचे रेकॉर्ड होते.दुसरे दिवशी तेथील "टोरांटोस्टार" ह्या प्रमुख वृत्तपत्राने लताचा पावणेसहा इंच बाय साडेसात इंच असामोठा फोटो अगदी पहिल्या पानावर छापुन गौरविले होते.हरीश भिमानी लिखित "लतामंगेशकर" ह्या पुस्तकात मध्यंतरी हा किस्सा वाचनात आला होता तो ह्यागाण्याच्या निमित्ताने आज आपणां सोबत शेयर केला.
"कॅबेरे साँग "ला "कॅबेरे गाणे" म्हणणे म्हणजे "वशाट" ला "सामिष" असे बाळबोध संबोधल्या सारखे होईल,अन हेलेन वर उगाच अन्याय केल्या सारखे होईल.खरे तर आत्ताच्या काळातील कोरीओग्राफर हि संज्ञा नि संकल्पना त्या काळात फारशी रूढ नसताना देखील तिने तिच्या जवळपास प्रत्येक गाण्यात जी व्हरायटी पेश केली,ज्या अदाकती तिने ज्या नजाकतीने पेश केल्या आहेत,त्याची सर आत्ताच्या कुठल्याही आयटेम साँगला म्हणावी अशी येत नाहीये हे कटू सत्य आहे.
हेलन इज "दि ग्रेट". कितिही आदाकारी असो,कमी कपडे असोत पण त्यांचे नृत्य कधी "अश्लिल" वाटतच नाही! या नव्या लोकांनी मात्र पार चिंध्या केल्या आहेत "नृत्य" या संकल्पनेच्या!! शिला मुन्नी परवडल्या आता ही शालू म्हणे! अरेरे! आवरारे ह्यांना!
अद्वैतजी, मुळात हेलेन हि गरजेमधून बनलेली अभिनेत्री होती.अँग्लो-इंडियन वडील नि बर्मीज आई असं दुर्मिळ मिश्रण तिच्यात पार अगदी दिसण्या पासून ते वर्तणुकी पर्यंत असं होतं.असं सांगतात कि तिचा चित्रपटातील शॉट संपला कि एका कोपऱ्यात बसून ती निवांतपणे एखाद्या इंग्रजी पुस्तक वाचनात गर्क असायची.त्या मुळे सहसा तिच्या वाटेला फार कोणी तेव्हा म्हणे जायचं नाही.७० च्या दशकात तिची अदाकारी त्या वेळच्या कथानकास अनुसरून असायची म्हणजे साधारणपणे चित्रपटाचा व्हिलन हेलेनच्या रुपात त्याच्या दुष्मानांवर "मोहिनी अस्त्र" फेकायचा नि त्याला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करायचा असे त्याचे साधारण स्वरूप असायचे.त्या मुळे जाळ्यात सावज अडकविण्या साठी उत्तान नि शृंगारिक अदा ह्या तिच्या रोलचा भागच असायचा पण ते कधी बीभत्स,ओंगळवाणे नि हिडीस ह्या सदरात जायचे नाही हे तिचे स्वतःचे कौशल्य होते,आणि नेमका फक्त हाच फरक तेव्हा नि आत्ता मध्ये आहे,आणि म्हणून केवळ "या सम हीच"
"कॅबेरे साँग "ला "कॅबेरे गाणे" म्हणणे म्हणजे "वशाट" ला "सामिष" असे बाळबोध संबोधल्या सारखे होईल,अन हेलेन वर उगाच अन्याय केल्या सारखे होईल.खरे तर आत्ताच्या काळातील कोरीओग्राफर हि संज्ञा नि संकल्पना त्या काळात फारशी रूढ नसताना देखील तिने तिच्या जवळपास प्रत्येक गाण्यात जी व्हरायटी पेश केली,ज्या अदाकती तिने ज्या नजाकतीने पेश केल्या आहेत,त्याची सर आत्ताच्या कुठल्याही आयटेम साँगला म्हणावी अशी येत नाहीये हे कटू सत्य आहे.
उत्तर द्याहटवाहेलन इज "दि ग्रेट". कितिही आदाकारी असो,कमी कपडे असोत पण त्यांचे नृत्य कधी "अश्लिल" वाटतच नाही! या नव्या लोकांनी मात्र पार चिंध्या केल्या आहेत "नृत्य" या संकल्पनेच्या!! शिला मुन्नी परवडल्या आता ही शालू म्हणे! अरेरे! आवरारे ह्यांना!
उत्तर द्याहटवाअद्वैतजी,
उत्तर द्याहटवामुळात हेलेन हि गरजेमधून बनलेली अभिनेत्री होती.अँग्लो-इंडियन वडील नि बर्मीज आई असं दुर्मिळ मिश्रण तिच्यात पार अगदी दिसण्या पासून ते वर्तणुकी पर्यंत असं होतं.असं सांगतात कि तिचा चित्रपटातील शॉट संपला कि एका कोपऱ्यात बसून ती निवांतपणे एखाद्या इंग्रजी पुस्तक वाचनात गर्क असायची.त्या मुळे सहसा तिच्या वाटेला फार कोणी तेव्हा म्हणे जायचं नाही.७० च्या दशकात तिची अदाकारी त्या वेळच्या कथानकास अनुसरून असायची म्हणजे साधारणपणे चित्रपटाचा व्हिलन हेलेनच्या रुपात त्याच्या दुष्मानांवर "मोहिनी अस्त्र" फेकायचा नि त्याला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करायचा असे त्याचे साधारण स्वरूप असायचे.त्या मुळे जाळ्यात सावज अडकविण्या साठी उत्तान नि शृंगारिक अदा ह्या तिच्या रोलचा भागच असायचा पण ते कधी बीभत्स,ओंगळवाणे नि हिडीस ह्या सदरात जायचे नाही हे तिचे स्वतःचे कौशल्य होते,आणि नेमका फक्त हाच फरक तेव्हा नि आत्ता मध्ये आहे,आणि म्हणून केवळ "या सम हीच"