आणि नववर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्या ह्या अभिनव शुभेच्छा !
२०१२ ह्या येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या प्रत्येक चालीला,प्रत्येक खेळीला यशाचा सुगंध लाभू देत...
तुमच्या "आनंदाचा कप " सुद्धा ह्या प्रमाणेच सदैव काठोकाठ भरलेला राहू देत...
तुमचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्व ह्या नवीन वर्षात अजून खुलून दिसो...
ह्या मेक्सिकन डिश प्रमाणे तुमचे ही आरोग्य हे उत्तम आहाराने युक्त आणि सदैव संतुलित राहो...
तुमचे व्यक्तिमत्व तुमच्यातील अंगभूत नैसर्गिक वैशिष्ट्याने अधिक खुलून दिसो...
तुमच्या सहकाऱ्यां बरोबरचे तुमचे संबंध सदैव सौहार्दपूर्ण राहोत...
तुम्हाला भेटणारे सर्व नवीन लोक हे अभिरुचीपूर्ण नि प्रेमळ असोत...
मौजमजा आणि मस्तीचा आनंद ती कुणाला कळायच्या आत तुम्हाला भरपूर लुटायला मिळो...
कामाचे नि वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्याने,वेळ शिल्लक राहून तुम्हाला हि अशी अगदी डुलकी काढायला सुद्धा वेळ मिळो...
यदाकदाचित आयुष्यात जरी कोणते संकट वा वादळ अगदी उद्भवलेच तरीही त्या पासून तुमचे संरक्षण होवो...
अप्रिय संगती पासून दूर कधी व्हायचे नि त्या पासून दूर पळायचे कधी ह्याचे तुम्हाला सदैव भान राहो...
मित्र-मैत्रिणींच्या सहवासात तुम्हाला सदैव आनंद मिळो नि त्यांचा मैत्रीचा हात सदैव तुमच्या पर्यंत पोहोचो...
२०१२ हे नूतन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचे,यशाचे,उत्तम आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो ह्या हार्दिक शुभेच्छा !
२०११ ह्या सालात हा ब्लॉग ज्यांच्या सहकार्या मुळे इथवर प्रवास करू शकला त्या सर्वांचे आणि विशेष करून सौ.सुजाता ह्यांच्या विशेष सहकार्या बद्दल मनःपूर्वक आभार. आत्ताचे हे पोस्ट सुद्धा सौ.सुजाता ह्यांच्या सहकार्यानेच तयार केले असून ,नेहमी प्रमाणे मी फक्त त्याचे येथे मराठी संस्करण केले आहे.धन्यवाद.
उत्तर द्याहटवाअप्रतिम शुभेछ्या ! खूप आवडल्या ! धन्यवाद ! तुम्हालाही नूतन वर्ष सुखसमृद्धीचे जावो !
उत्तर द्याहटवाएक नवा दिवस,एक नवी आशा,तुमच्या कर्तुत्वाला एक नवी दिशा,नवी स्वप्ने,सोबत आमच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछ्या!
सौ.गीतांजलीताई,
उत्तर द्याहटवाआपल्या शुभेच्छां बद्दल धन्यवाद आणि आपणास आणि आपल्या कुटुंबास सुद्धा हे नूतन वर्ष,सुख समृद्धीचे,भरभराटीचे,ऐश्वर्याचे आणि सुखसंपन्न जाओ ही हार्दिक शुभेच्छा.
VERY NICE
उत्तर द्याहटवाप्रती अशोक,
उत्तर द्याहटवाआपल्या येथील भेटीसाठी नि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
नवीन वर्षाच्या शुभेछ्या
उत्तर द्याहटवाआपली संकल्पना मनाला असते दाखविणारी आहे. माणसे माणसाचे कधीच विचार आत्मसाद करीत नाही. पण प्राणी मित्र मात्र त्याचे अनुकरण करतात. नवीन वर्षात सर्वांनी याचा बोध पाहिजे… जग आणि आणि जगणे यावरही आपल्या कातून टिपणी करावी वी विनंती !
ज्ञानेश्वर जाधव(पत्रकार/उपसंपादक दैनिक नवनगर नवी मुंबई, ठाणे )
नवीन वर्षाच्या शुभेछ्या
उत्तर द्याहटवाआपली संकल्पना मनाला दिशा दाखविणारी आहे. माणसे माणसाचे कधीच विचार आत्मसाद करीत नाही. पण प्राणी मित्र मात्र त्याचे अनुकरण करतात. नवीन वर्षात सर्वांनी याचा बोध घेतला पाहिजे… जग आणि आणि जगणे यावरही आपल्या कडून टिपणी करावी ही विनंती !
ज्ञानेश्वर जाधव(पत्रकार/उपसंपादक दैनिक नवनगर नवी मुंबई, ठाणे )
नवीन वर्षाच्या शुभेछ्या
उत्तर द्याहटवाआपली संकल्पना मनाला दिशा दाखविणारी आहे. माणसे माणसाचे कधीच विचार आत्मसाद करीत नाही. पण प्राणी मित्र मात्र त्याचे अनुकरण करतात. नवीन वर्षात सर्वांनी याचा बोध घेतला पाहिजे… जग आणि आणि जगणे यावरही आपल्या कडून टिपणी करावी ही विनंती !
ज्ञानेश्वर जाधव(पत्रकार/उपसंपादक दैनिक नवनगर नवी मुंबई, ठाणे )