भोज्जा

रविवार, १ ऑगस्ट, २०१०

सुदाम्याचे पोहे

मित्रांनो,
आज फ्रेंडशिप डे.म्हणजेच आपल्या भगवान कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीची आठवण करून देणारा.त्या आदर्श आणि अतूट मैत्रीची स्मृती चाळवणारा.काय गम्मत आहे बघा आजच्या ह्या दिवशी ह्या दोघांची आणि त्यांच्या मैत्रीची किती जणांना आठवण झाली असेल ते त्या भगवान कृष्णालाच ठाऊक.

ते काही जरी असल तरी हे मात्र खर कि आजच्या ह्या "स्पेसिफिक" दिवसा मुळे मला मात्र माझ्या सर्व मित्रांची मिलिंद, गिरीश,जयंत,राजा,मुकुंद,सुनील,प्रदीप,पाध्ये,आनंदा,अरूण ह्यांची प्रकर्षाने आठवण झाली आणि हे मी नक्कीच नाकारणार नाही.मला माझे ते सैरभैर दिवस आठवले.त्या काळातील त्यांच्या अतिशय निर्व्याज प्रेमाची आणि त्यांनी केलेल्या सर्व प्रकारे मदतीची  आठवण झाली.आणि हि  मदत  कशी तर कुठल्या हि प्रकारच्या परत फेडीची अगदी बिलकुल काडीमात्र अपेक्षा न ठेवता केलेली.बरे ह्या मदती मागे त्यांचा कुठला हि काडीमात्र स्वार्थ नव्हता कारण  त्या वेळची माझी परीस्तीथीच अशी होती कि माझ्या सकट माझ्या सर्व मित्रांना हे पूर्णपणे माहित होते कि हि परिस्तिथी अगदी माझ्या अथक प्रयत्नां नंतर सुध्धा लगेच बिलकुल सुधारणार नाही आणि नव्हती.आणि झाले हि अगदी तसेच.आणि म्हणूनच त्याचे मोल जास्त आहे.

आनंदा मध्ये सर्वसाधारणपणे आपण सगळेचजण सहभागी होत असतो,दुःखात सुध्धा त्या त्या वेळेनुसार,प्रसंगानुसार आपण सहभागी होतच असतो पण माझ्या मित्रांची त्या वेळी मला मिळालेली मोलाची साथ,मी माझ्या आयुष्यात विसरायची जरी म्हटले तरी विसरता येणार नाही. कारण त्यात ते कदापि काहीही कमावणार नव्हते तर वेळप्रसंगी गमावणारच होते.हि वास्तवता त्यांना ठाऊक असून सुध्धा त्यांनी जी मदत देऊ केली ह्या पेक्षा अजून कोणती गोष्ट एखादा मित्र त्याच्या फक्त एखाद्याच्या बरोबरच्या मैत्री साठी करू शकतो ? आणि म्हणूनच निखळ मैत्रीचे नाते हे सर्व नात्यांच्या पलीकडचे असते ह्या बाबतीत माझे दुमत नाही.आज मी आपल्या बरोबर आहे त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

आजच्या ह्या "फ्रेन्डशिप डे" च्या निमित्ताने मी आपणा सर्वांना असेच माझ्या मित्रां सारखे मित्र प्रत्येकाला मिळोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.
                     

1 टिप्पणी:

  1. मित्रांनो,
    आपल्या प्रतिक्रिया वाचायला मला जरूर आवडतील. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा