भोज्जा

बुधवार, २७ एप्रिल, २०११

एका रिकाम्या सोपकेसची गोष्ट

जपानी लोकांच्या सौंदर्य उत्पादने तयार करणाऱ्या एका कंपनीच्या इतिहासात एक अतिशय अविस्मरणीय असा किस्सा घडून गेला…….झाले असे कि एका ग्राहकाची एक अशी तक्रार त्यांचे कडे आली कि त्याने त्यांच्या उत्पादनातील एक प्रख्यात साबण ,सोपकेस सह बाजारातून खरेदी केला,…..घेतलेला,मिळालेला पीस सुद्धा अगदी पॅकबंद,सीलबंद होता.तथापि तो गृहस्थ  ..ती सोपकेस घरी घेऊन गेल्यावर उघडून बघतो तर काय ? सोप केस रिकामी ... आत मध्ये साबणाचा पत्ताच  नाही.. नुसतीच डबी. झाले ... कंपनीला तक्रार करण्या शिवाय पर्यायाच नव्हता. कंपनी सुद्धा नामांकित असल्याने त्यांनी सुद्धा त्या तक्रारीची गंभीरतेने दाखल घेतली. नि कंपनीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाल्याने कंपनीचे सर्व प्रशासन सुद्धा खडबडून जागे झाले.


चौकशी अंती सर्व प्रथम त्यांनी हे शोधून काढले कि त्या उत्पादनाच्या शेवटच्या टप्प्यात ज्या असेम्ब्ली लाईन वरून सदरहू माल पॅकबंद होऊन  डिलिव्हरी साठी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला पाठविला जातो तेथे गडबड झाली होती.. एका कामगाराच्या नजर चुकीने एक साबणाची प्लास्टिकची डबी (सोपकेस) त्यात साबण न भरता तशीच पुढे पाठविली गेली होती... आणि नेमकी चुकून तीच सोपकेस  त्या ग्राहकाच्या गळ्यात पडली होती.... झाले ...  कंपनी  व्यवस्थापनाने सर्व इंजिनिअर्स ची तातडीची बैठक बोलवून ,त्यांच्यावर ह्या गोष्टीवर  लौकरात लौकर ठाम,…निश्चित असा तोडगा काढण्याचे काम सोपाविले,कि पुन्हा हि चूक न होणे म्हणून.

इंजिनिअर्सनि सुद्धा दिवस रात्र एक करून त्या उत्पादना साठी अगदी एक्स रे मशीनची सुद्धा मदत बिद्त घेऊन ,अतिशय काटेकोरपणे,पुरेपूर खबरदारी घेऊन  एक अत्याधुनिक अशी  प्रणाली विकसित केली, ति हि अतिशय कमी कालावधीत.कि ज्या योगे अवघी दोन माणसे ह्या कामासाठी लावली कि अशी चूक पुन्हां होणार नाही, स्वाभाविकपणे,व्यवस्थापन खुश झाले.पण ह्या भानगडीत झाले काय कि त्या साठी मनुष्यबळ नि पैसा मात्र पाण्या सारखा खर्च झाला. पण आता रिकामी सोपकेस मात्र बाजारात जाणार नव्हती हा व्यवस्थापनाला दिलासा होता.

तथापि हि सगळी डेव्हलपमेंट होत असताना कंपनीच्या मधल्या उत्पादनाच्या काळात हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा  तेथे प्रत्यक्ष लाईन वर काम करणाऱ्या  एका कामगारा समोर उपस्थित झाल्यावर,त्याने एक्स रे मशीन ,दोन माणसे वगैरे काहीही दिमतीला न घेता ह्या अडचणी वर त्याचा त्यानेच एक अतिशय साधा तोडगा काढला.त्याने फक्त एक मोठा इंडस्ट्रीयल फॅन मागून घेतला नि तो त्या बेल्टच्या तिथे अशा पद्धतीने लावला कि उत्पादना दरम्यान तो सुरु ठेवला असता, जर चुकून माकून रिकामी सोपकेस त्या बेल्ट वरून पंख्यां समोर आलीच तर,हलकी असल्या कारणाने बेल्ट वरून वाऱ्याच्या झोताने,फोर्सने  तेथून उडून जाईल नि ज्या योगे रिकामी पेटी पुन्हा बाजारात ग्राहकां पर्यंत  पोहोचूच शकणार नाही....किती सरळ नि साधा उपाय?

तात्पर्य : कोणताही प्रॉब्लेम असो, तो प्रथम नेहमी साध्या नि सरळ पद्धतीने हाताळा,नि त्या वर मार्ग शोधा.अडचणी पेक्षा त्या वरच्या उपाया वर लक्ष केंद्रित करा.आयुष्यात जर तुम्ही फक्त " सालं माझ्या कडे अजून ह्या-ह्या गोष्टी नाहीयेत" हेच बघत राहिलात तर तुमच्या कडे काहीच नसेल पण हेच जर तुम्ही असा विचार केला कि चला इथ पर्यंत तर पोहोचलोय.... हे एवढे तर आहे..... आता पुढच पाहू ... तर तुमच्या लक्षात येईल कि तुमच्या पाशी सगळ काही आहे... असेल... अर्धा ग्लास रिकामाय म्हणण्या पेक्षा,तो अर्धा भरलेला म्हणण कधीही चांगलंच ! नाही का?:)
सदरहू पोस्ट हे मला सौ.सुजाथा ह्यांनी पाठविलेल्या मेलचा स्वैरानुवाद आहे. धन्यवाद सुजाथा.   


३ टिप्पण्या:

 1. Dear Sujatha,
  Now a days I am nothing but just translating your those mails which I found "more" interesting to share with everyone :) Dear Kumar has also provided some good blogging material,but as and when the time will permit..will go through the same too.Thanks for this mail & Bye...

  उत्तर द्याहटवा
 2. अनामित९:४३ PM IST

  Really Thinking is good way for achieving shortcut with Ideas and less time consuming and no any hectic work.

  उत्तर द्याहटवा
 3. प्रती अनामित,
  मस्त... आपण अगदी थोडक्या,मोजक्या पण नेमक्या शब्दात संपूर्ण लेखाचे सार आमच्या समोर ठेवले.
  धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा