भोज्जा

मंगळवार, १२ एप्रिल, २०११

बायको ही बायकोच असते


हो ...........  

बायको ही बायकोच असते,

कारण तिच्या लेखी 

तुम्ही कोण आहात ......

नि   काय आहात....  ह्याच्याशी तिला  काही  घेणं देणं नसतं.

बाहेर भले तुम्ही ,राजे असाल ,

पण घरात मात्र, तीच राणी असते. 


इतका उशीर का झाला?.. S  S  S नि ऐन शिकारीच्या वेळी कुठे गेला होतात हो ? नि सांगितलेली सगळी कामे तरी झाली का?
सौजन्य: आमच्या (जस्ट निफ्टी स्नेही) सौ.सुजाथा

सदरहू फोटो/चित्र हे बहुदा एडीट केलेले असावे नाही पेक्षा अशी शंका येते, असे बारकाईने बघितल्यावर वाटते,तथापि ज्या कोणी हे तयार केले असेल त्यात त्याची कल्पकता नक्कीच दिसून येते.नि त्या हि पेक्षा त्यातून निर्माण होणारा /तयार कर्त्याला अभिप्रेत असणारा विनोद हा आपली जिवणी रुंदावयास भाग पाडतो ह्या बद्दल शंका नाही.शेवटी कुठेही गेलं तरी पळसाला पाने तीनच.
   २ टिप्पण्या:

  1. आजच्या "रामनवमी" प्रित्यर्थ सर्व वाचकांना माझ्या तर्फे हार्दिक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. ही पोस्ट प्रसिद्ध झाल्या पासून फक्त दोन दिवसातच शेकड्याच्या वर लोकांनी बघितली पण त्या वर माझ्या सकट सगळ्यांना मुग गिळून गप्प राहणेच सोयीचे नि शहाणपणाचे वाटले ह्यातच सगळे काही आले.मित्रांनो काय करणार कधी-कधी वास्तवाला सामोरं हे जावच लागत,सत्य अगदी कटू असलं तरी सुद्धा... नाही का????? हा S हा S हा

    उत्तर द्याहटवा