भोज्जा

रविवार, ३ ऑक्टोबर, २०१०

बापू

काल गांधी जयंती सर्वत्र नेहमीच्या उत्साहात साजरी झाली.रात्री टी.व्ही.ऑन केल्यावर सालाबाद प्रमाणे वेगवेगळ्या नेत्यांचे,पुढार्यांचे हस्ते वेगवेगळ्या शहरात,गावात गांधींच्या पुतळ्यास हार घालणे कुठे गोरगरिबांना,दीनदुबळ्यांना कशाना कशाचे तरी वाटप करणे वगैरे वगैरे नेहमीचे प्रकार चालूच होते.ते ह्या पुढेही,अन त्या पुढेही म्हणजे अगदी गांधीजी जो पर्यंत आपल्या नोटेवर आहेत तो पर्यंत चालूच राहणार आहेत हे सांगणे नको.


हे सर्व पाहता पाहता सहज डोक्यात विचार आला कि ह्या पुढारी मंडळींनी दर वर्षी फक्त ह्याच गोष्टी करण्या पेक्षा देशाच्या राजकारणासाठी ज्या गांधींच्या नावावर ते गेली ६३ वर्षे मते मागताहेत,त्यांचा वारसा पुढे चालू ठेवायची ग्वाही देताहेत,त्यांच्यातील खालील फक्त दोन गोष्टी जरी अमलात आणायचा थोडा जरी प्रयत्न केला तरी देशाची प्रचंड प्रगती होऊ शकेल.

१)स्वतःच्या अगदी कोणत्याही जाणते-अजाणतेपणा पोटी झालेल्या केलेल्या चुकीची जाहीर कबुली देणे

आणि

२) नेहमी खरे बोलावे.

अर्थात हे दिवा स्वप्न आहे हे माझं मलाही समजतय पण जर चुकून माकून जादूची कांडी फिरली नि तसे झाले तर काय बहार येईल नाही? सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या नेते मंडळींच्या मनावरचे ताण हलके होतील,आणि आता ते खरेच बोलत असल्याने त्यांना ते लक्षात ठेवायची गरज पडणार नाही आणि त्या मुळे खरोखरच्या विधायक कार्याला(जर)त्यांना (वाहून घ्यायचे असेल तर)वाहून घेता येईल.

हे अस कधी होऊ शकणार नाही ह्याची आपल्या सगळ्यांना कल्पना असल्याने तूर्तास मी मात्र ठरवलंय नि मी गांधींचा एका निरागस लहान मुलाच्या हास्या प्रमाणे हास्य असलेला एक हसरा फोटो नेट वरून मिळवलाय तो मी सेव्ह करून ठेवलाय नि पुढच्या गांधी जयंतीच्या वेळी चौकात "माझ्या" फ्लेक्सच्या कोपऱ्यात त्यांना टाकायची व्यवस्था करून ठेवलीय.थोड बर असत कारण आता निवडणुका जवळ येणार आहेत ना? हा उभ र्हायचा विचार करतोय.

तसं ह्या वेळीही मी मिठाचा सध्याचा भाव ( सॉरी,ते मिठाचा सत्याग्रह का काय म्हणतात)ते थोड वाचल होत ( खर तर मी लो.टिळकान प्रमाणे"मी शेंगा खाल्या नाहीत त्या मुळे मी टरफले उचलणार नाही"असे गांधीजींचे काही ड्याशिंग वाक्य भाषणात टाकायला मिळेल का हे शोधत होतो पण मला कोणीतरी सांगितले कि गांधीजी हे म्हणे अहिंसेचे पुरस्कर्ते होते,नि खरे तर आजच्या सुट्टी मुळे मला कोपऱ्या वरच्या दुकानातून मटण आणायची घाई होती त्या मुळे तो नाद सोडला)आणि हो गांधीजीनी जरी कधी स्वतः घातली नाही नि कोणाला घातलीही नाही ति गांधी टोपीहि मी आजपासून घालायला सुरुवात केलीय हे सांगायचे विसरूनच गेलो होते.आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजच्या भाषणात ( हा थोड केल,एका ठिकाणी थोडा चान्स मिळाला) माझ्या कडून गांधीजींना नुसते बापू म्हणून सम्बोधायच्या ऐवजी च्यायला सारखे तोंडातून बाप्पू बाप्पू असेच जात होते.(ह्यात माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही पण कोपर्यावरच्या हॉटेलवाल्याचेही तेच नाव असल्याने नि त्याला तशीच हाक मारतात ह्यात माझा काय दोष?)असो.आम्ही ह्यात चुकतोय असंच तुम्हाला वाटतंय ना? पटकन हो म्हणा.आता वेळ दवडू नका नंबर १) च्या वचनाची(चुकीची कबुली द्यायची) सुरुवात प्रथम तुम्ही करायची कारण आम्ही नेहमी नंबर २ चा विचार आधी करतो.महात्मा गांधी कि जय हो!

ताजा कलम

बापू,आम्हाला रहावलं नाही.नंबर १)च्या वचनाची आम्ही फक्त जनते कडून कबुली घेतली ती हि अगदी उघडपणे पण ते धाडस आमच्या रक्तात गेल्या ६३ वर्षात नाही हो,पण निदान खाजगीत तरी आम्ही कबुली देतो कि,तुम्ही कधी कोणती निवडणूक लढवली नाही,त्या मुळे तुमच्या कामाचा नि नावाचा तुम्हाला कधी निवडणुकीच्या,निवडून यायच्या दृष्टीने कधी फायदा झाला नाही पण आम्ही मात्र गेली ६ दशके त्याचा इतका उपभोग घेतलाय नि उपयोग करून घेतोय कि काय सांगायचे?आपल्या मुळे "गांधी" ह्या नावाला जे वलय निर्माण झाले,ते जे पूजनीय झाले ते गेली ६ दशके आपली किमया अजून राखून आहे.आम्ही तर "गांधी" ह्या नावाची फ्रेम करून ती आमच्या देवघरात कायमची लाऊन ठेवलीये.तिला आम्ही खास करून दर निवडणुकीचे वेळी उत्सवाच्या स्वरूपात मढवतो.लोकांना त्याची आठवण करून देतो.हे थोडे अतिशयोक्ती पूर्ण वाटेल पण आमची तर अशी ईच्छा आहे कि ह्या पृथ्वी तलावावर जो पर्यंत चंद्र नि सूर्य आहेत तो वर "कोणत्याही गांधी" ह्या नावाची हि जादू अशीच कायम रहावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा