भोज्जा

मंगळवार, ७ जून, २०११

आम्हाला "मुलगी" हवीये !

हो............ आम्हाला मुलगी हवीये,नि तेच कसे १००% बरोबर आहे हे आम्ही पुराव्याने सिद्ध करू इच्छितो.विश्वास बसत नाही नां ? मग हा घ्या पुरावा....... अगदी फोटोंसहित ..........
 

भारतात नेहमी "मुलगा"जन्माला यावा म्हणूनच  नवससायास केले जातात. पण मुलगीच व्हावी या साठी कोणी नवस बोलत नाहीत

    

मोठ्यांचे भरभरून आशीर्वाद हे नेहमी मुलांच्याच वाट्याला येतात.पण मुली मात्रं  त्या पासून वंचित रहातातपण जेव्हा पैशाची गोष्ट येते 


तेव्हा लोक लक्ष्मीचीच पूजा करतात. 

नि विद्या प्राप्ती साठी 


सरस्वतीचीच आराधना करतात


नि सुखसमृद्धी, मानसिकशांती-समाधाना साठी ,  


अंबाबाईची  करुणा भाकतात


अन संकटाचे वेळी 


त्यांना कालीमातेचीच आठवण होते


मग आता सांगा बरे कि, लोक त्यांच्या घरात जर मुलगी जन्माला आली तर एवढे खट्टू का होतात बरे ?
खरं तर काहीच कारण नकोय !


कारण आपण जेव्हा जेव्हा संकटात सापडतो तेव्हा आपल्या सगळ्यांना वाचविणाऱ्या ह्या सगळ्या स्त्रियाच आहेत.अहो,फार कशाला आपल्याला अगदी साधी ठेच जरी लागली तरी आपल्या तोंडात प्रथम आईचेच नाव येते,न कि बाबाचे ...


त्या मुळे हे पोस्ट बघितल्या नंतर तुम्ही येथून जर तसेच निघून गेलात तर, तुमचे काहीच बिघडणार नाहीये हे मला माहिती आहे. पण जर तुम्ही हा सुंदर विचार,तुमच्या कडून जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहोचवला तर, "स्त्री" जातीचा उचित सन्मान करून,आपण, आपल्या आई समोर किंवा बायको समोर किंवा अगदी मुली समोर सुद्धा,ताठ मानेने नि आनंदात उभे राहू शकू ... नाही का ? त्या मुळे आपल्या घरात मुलगी जन्माला आल्यावर आपण तिचे दोन्ही हात पसरून अगदी आनंदाने स्वागत करूयात ... 

      

ह्या पोस्टचे अजून एक विशेष म्हणजे,ह्या पोस्टचे प्रेरणा स्थान हे देखील एक स्त्रीच आहे...म्हणजेच सौ.सुजाता. हा ब्लॉग सुरु केल्या नंतर सौ.सुजाता ह्यांनीच वेळोवेळी मला वेगवेगळ्या पोस्ट साठी त्यांच्या कडील असे नि ह्या प्रकारचे सुंदर मेल करून,ते मराठी मध्ये स्वैर अनुवाद करण्यास उद्युक्त केले आहे,त्या मुळे ह्या पोस्टचे वेळी त्यांचे विशेष आभार मानावयाची मी संधी घेतो.धन्यवाद सुजाता,तुमच्या मुळे  हा सुंदर विचार  मला आमच्या जास्तीत जास्त मराठी वाचकां पर्यंत पोहोचवता आला.   

१८ टिप्पण्या:

 1. पियू,
  फक्त मुली नुसत्या पुढे गेल्या नसून,आमच्या मनात त्यांना आदराचे स्थान आहे.तुझा "खरंच मुली पुढे गेल्या ?"हा बझ सुद्धा ह्या पोस्टला कारणीभूत ठरल्या बद्दल तुझेही आभार.धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 2. बदलतंय रे हळू हळू सर्व...
  and Your efforts wont go waste..!!

  :-)

  उत्तर द्याहटवा
 3. खुप छान प्रकारे रे समजवले आहे  अमोल केळकर

  उत्तर द्याहटवा
 4. @ पियू,निखील,अभिषेक,निवेदिता,अनामित,मंदार,आशिष नि अमोल ...आपले सर्वांचे स्वागत नि आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद...ह्या पोस्टचे खरे श्रेय हे त्या तमाम महिला वर्गाचे नि तुम्हां सर्वांचे आहे. ह्या प्रसंगी मी एवढेच म्हणू इच्छितो कि "धन्याचा तो माल, मी तो हमाल, भार वाही !धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 5. अनामित९:५४ AM IST

  mynac, विचारांशी सहमत ,पटवलस ही छान ...
  >>फार कशाला आपल्याला अगदी साधी ठेच जरी लागली तरी आपल्या तोंडात प्रथम आईचेच नाव येते,न कि बाबाचे ...
  ह्याला थोडा आक्षेप आहे कारण जरा काही झाल कि आईच नाव तोंडात येते पण जेव्हा मोठ संकट येते ना तेव्हा 'बाप' आधी आठवतो....

  उत्तर द्याहटवा
 6. प्रती,
  निलेश,शैलेश आंब्रे ,
  आपल्या प्रतिक्रिये बद्दल नि येथे भेट दिल्या बद्दल धन्यवाद,
  davbindu म्हणाले...
  ह्याला थोडा आक्षेप आहे कारण जरा काही झाल कि आईच नाव तोंडात येते पण जेव्हा मोठ संकट येते ना तेव्हा 'बाप' आधी आठवतो....
  अगदी बरोब्बर... १०० % सहमत ...अन म्हणूनच ......आपण उगीच नाही म्हणत कि, तो सगळ्यांचा "बाप" आहे. पण जेव्हा "गोष्ट" ठेचेची येते तेव्हा तिथे मात्र आईच "बाप" असते :)पण मी सुद्धा संदिप खरे & सलिल कुलकर्णी ह्यांचा नक्कीच चाहता आहे आणि कुणाच्या डोळ्यात "दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" वाचून नि ऐकून पाणी उभं राहणार नाही ?

  असो,
  आपल्या "बाप" :) प्रतिक्रिये बद्दल नि येथे भेट दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 7. लगी अशी नवस करून मिळाली असती तर खरच किती बरं झालं असतं....मुलगी(च) पाहिजे वाले होतो आम्ही पण अर्थात पदरी मुलं पडलीत त्यांना पवित्र मानतोय आता...:)

  उत्तर द्याहटवा
 8. अपर्णा ताई,
  आपले हार्दिक स्वागत.
  अगदी खरंय तुमच म्हणण आणि ह्या रांगेत मी स्वतः तर अगदी खूप पुढे उभा आहे,त्या मुळे तुमची नि माझी मानसिकता नक्कीच वेगळी नसणार :)
  आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा