भोज्जा

रविवार, १ मे, २०११

“शेवटचं पान”

ही  गोष्ट आहे अमेरिकेतली. १८९० च्या सुमारास न्यूयॉर्क शहरातील ग्रीनविच व्हिलेज मध्ये बरेच कलाकार वास्तव्यास असायचे. स्यू  आणि जोन्सी ह्या दोघी त्या पैकीच एक. अगदी पहिल्यांदा त्या दोघी एकमेकींना जेव्हा  तिथल्या एका रेस्टाँरंट मध्ये भेटल्या,तो त्यां वर्षीचा मे  महिना होता.
मी मेन स्टेट मधून आलेय नि मासिकांच्या कथांसाठी  चित्रे काढून देते.
स्यू ने आपली ओळख करून देत जोन्सीला  सांगितले.
"आणि मी कॅलीफोर्नियाची, पण खरे तर मला मनातून इटलीला जायची  खूप इच्छा आहे.नि तेथे जाऊन  बे ऑफ नेपल्सची खूप चित्रे काढायची ईच्छा  आहे."
जोन्सी उत्तरली.
त्या दिवशी त्या दोघींची ती पहिलीच भेट असून सुद्धा  अगदी पहिल्या भेटीतच दोघींचे सूर असे काही जुळले कि त्यांनी त्यांच्या कला ह्या विषया बरोबरच अगदी कपडे, ड्रेस, खाण्यापिण्याची आवड निवड ह्या विषयावर सुद्धा मनसोक्त गप्पा मारल्या.
त्यांच्या पहिल्याच भेटीत त्यांच्यात मैत्रीचे असे बंध जुळून आले कि थोड्याच दिवसात त्या दोघींनी एका तीन मजली स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये रूम्स भाड्याने घेऊन,त्या एकमेकींच्या शेजारी झाल्या.बिल्डींग खर तर तशी थोडी जुनाटच होती नि त्यांच्या खोल्या सुद्धा त्याच्या शेवटच्या म्हणजे  तिसऱ्या मजल्यावरच होत्या.पण तशा दोघींना सोयीच्या होत्या.
बघता बघता डिसेंबर महिना आला.त्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये थंडी जरा जास्तच होती. हिमवृष्टी मुळे सगळी जमीन  बर्फमय बनून गेली होती.हवेतल्या गारठ्याने बरेच लोक आजारी सुद्धा पडले.न्युमोनिया हा तसा त्याकाळी जीवघेणा रोग होता.डॉक्टर्स प्रयत्नांची शिकस्त करायचे पण तरी सुद्धा बऱ्याच लोकांचे ह्या आजारात बळी जायचे ते जायचेच.
गारठा सहन न झाल्याने जोन्सी सुद्धा त्या वर्षी  न्युमोनियाची शिकार होऊन आजारी पडली,नि बघता बघता अशक्तपणा मुळे सदैव  बेडवरच विश्रांती घेण्या शिवाय तिच्या समोर पर्यायच उरला नाही.डॉक्टरांच्या फेऱ्या सुद्धा रोज तिच्या कडे सुरु झाल्या पण आराम पडण्याचे मात्रं  कोणतेच चिन्ह काही दिसेना.

एके दिवशी स्यू ला डॉक्टरांनी बाजूला घेऊन  हलक्या आवाजात सांगितले कि
" आपले औषधोपचार सुरूच आहेत पण मला जोन्सीचे थोडे अवघडच दिसतंय,नि मला नाही वाटत कि मी ह्या पुढे तिला फार काही मदत करू शकेन.ती सदैव दु:खीच असते नि मुळात तिची स्वतःची आता जगण्याची उमेद दिसत नाहीये.काही तरी करून तिचे नैराश्य घालविले पाहिजे नि तिला प्रथम थोडे आनंदी केले पाहिजे.तिच्यात जगण्याची उमेद निर्माण होण हे ती बरी व्हायच्या दृष्टीने फार गरजेचे आहे…..अशी कोणती गोष्ट आहे का कि जिच्यात तिला सर्वात जास्त रुची, गोडी आहे? कि ज्या योगे ती  ह्यातून बाहेर येऊ शकेल?"
"डॉक्टर ,ती पण चित्रकारच आहे नि बे ऑफ नेपल्स ला जाऊन पेंटिंग काढायची तिची फार इच्छा आहे असं तिनं मागे मला सांगितलं होत."
स्यू ने डॉक्टरांना सांगितले.
"पेंटिंग ? अं ... मला नाही वाटत कि त्याचा काही उपयोग होईल " एवढे बोलून डॉक्टर तेथून निघाले.
स्यू ने हे सगळे निमुटपणे  ऐकले  मात्र खरे, पण नंतर आपल्या खोलीत जाऊन तिने मूकपणे आपल्या अश्रूंना वाट करून दिली.थोड्या वेळाने तिने काहीसा विचार करून तिचा स्वतःचा पेंटिंग बोर्ड उचलला,काही पेन्सिली घेतल्या नि एक छानसे गाणे म्हणत ती जोन्सिच्या खोलीत दाखल झाली.
जोन्सी तिच्या बेड वर खिडकी कडे तोंड करून निपचित पडून होती.स्यू ने हळूच तिच्या जवळ जाऊन जात तिच्या कडे बघितले.तिचा चेहरा निस्तेज नि पांढराफटक पडलेला दिसत होता.
"बहुदा झोपलेली दिसतेय !" असा स्वतःशीच विचार करत स्यू ने  गाणे थांबविले नि खोलीच्या एका कोपऱ्यात बसून  ती तिचे एका मासिकाला द्यावयाचे असलेले चित्र  काढू लागली. थोड्या वेळाने तिला कोणी तरी काही तरी पुटपुटतय असा भास झाला.
झटकन उठून ती जोन्सीच्या बेड जवळ गेली. जोन्सी  निस्तेज डोळ्याने खिडकीतून बाहेर बघत होती.आणि पुटपुटत होती ...
"बारा" ….. थोड्यावेळाने  स्यू ने "अकरा " हा शब्द ऐकला,नंतर थोड्या वेळात तिला "दहा"हि  ऐकू आला. नंतर "नऊ"…..आणि "आठ" नि "सात" तर जोन्सीने जवळ जवळ लगेचच पुटपुटले…..तिची उलटी गणना सुरूच होती.
खिडकीतून हि नक्की  काय पाहतेय नि मोजतेय हे बघण्यासाठी ,स्यू चे लक्ष खिडकीतून बाहेर गेले. स्यू चे लक्ष शेजारच्या घराच्या कंपाउंड वॉलला लागून उभ्या असलेल्या "वाईन ट्री" कडे गेले.पानगळ झाल्याने ते झाड आता अगदी ओकेबोके झालेले दिसत होते.
"सहा" जोन्सी पुन्हा पुटपुटली.आता तर हि फारच वेगाने झडतायेत  ."तीन दिवसांपूर्वी  ह्या झाडावर जवळ पास शंभर पेक्षा जास्त पाने होती.... ओ ... अजून एक गेले.... आता फक्त पाचंच राहिलीयेत.
"पाच ?" तू नक्की कशा बद्दल बोलतेयेस जोन्सी जरा प्लीज  सांग नं मला ? स्यू ने न राहवून  प्रश्न केला.
आता त्या वाईन ट्री वर फक्त पाचचं पानं राहिलीयेत. शेवटचे पानं सुद्धा आता गळून पडेल अन त्या बरोबर मी सुद्धा,... मी सुद्धा मरेन.डॉक्टरांनी तुला ह्या वाईन ट्री च्या पानां बद्दल काही सांगितलं नाही ? “जोन्सीने स्यू जवळ विचारणा केली.
असं काही तरी अभद्र बोलू नकोस, तू काही मरत बिरत नाहीयेस.उलट  तू लौकरच बरी होणारेस. अगं! माझं नि डॉक्टरांच  सकाळीच तसं  बोलणही झालंय. स्यू ने थोड्याशा कडक आवाजात पण प्रेमाने तिला खडसावले.
मी आत्ता,…. आता हे चित्र पूर्ण करते, ते मासिकाला देऊन येते... ती लोकं पण खूप चांगली आहेत पैसे हि लगेचच मिळतील ,नि मग मी येताना तुला सूप नि चांगलं काही तरी   खायला घेऊन येते.
जोन्सी अजून खिडकीतून वाईन ट्री  कडेच बघत होती.
"आता फक्त चारच पानं राहिलीयेत नि शेवटचं  पान सुद्धा लगेच गळून पडेलच.सूप बीप मला काही नकोय. 
"जोन्सी,आता तू प्लीज डोळे बंद करून जरा वेळ झोप.मला सुद्धा हे ङ्रॉईंग  जास्तीत जास्त उद्या पर्यंत पूर्ण करायचं नि आता ह्या पुढे मी तुला त्या खिडकीतून बाहेर पाहू देणार नाहीये." ह्या स्यू च्या बोलण्यावर जोन्सीने डोळे बंद करून घेतले खरे पण "मला ते शेवटचे पान बघायचं ,आता थोड्याच वेळात ते गळून पडेल कारण ते सुद्धा आता थकलंय  नि मी  सुद्धा.मला आता जगायचं नाहीये गं हा तिचा हेका सुरूच होता.
बरं,....झोप आता. मी सुद्धा आता निघते कारण मला बेहमनशी जरा बोलायचं ,कारण माझ्या ह्या चित्रा साठी मला एक मॉडेल हवंय नि मी विचार करतीये कि बेहमनलाच  मॉडेल म्हणून घ्यावे. एवढे बोलून स्यू तेथून खोली बाहेर आली.

म्हातारा बेहमन त्याच बिल्डींग मध्ये त्यांच्या खालच्या मजल्यावर रहायचा.खरं तर तो सुद्धा एक चित्रकारच होता,पण तो आज पर्यंत कधी  एखादं  म्हणावं  असं चांगले चित्र काढू शकला नव्हता हि मात्रं वास्तवता होती. त्याला स्वतःला सुद्धा ह्या गोष्टीचे खूप वाईट वाटायचे नि स्वतःचा खूप राग सुद्धा यायचा.पण "एक दिवस मी चांगलं चित्र..... अगदी मास्टर पीस काढीन" हा त्याचा हेका नि आशावाद कायम असायचा.अगदी आता त्याची पार साठी उलटून गेल्यावर  सुद्धा.
विचाराच्या तंद्रीत स्यू  बेहमन च्या खोलीत कधी पोहोचली हे तिचे तिलाच कळले नाही.त्या अंधाऱ्या खोलीत तिला  तो म्हातारा  एकदाचा सापडला.मुद्द्यांच ,कामाचं बोलून झाल्यावर स्यू ने त्याला जोन्सी बद्दल नि त्या वाईन ट्री बद्दल सांगितले.
सगळं  ऐकल्यावर  "मूर्ख ... मूर्ख  आहेय हि मुलगी. अगं "ओल्ड वाईन " हि  का कधी माणसं मारते ? हे तो जवळ जवळ ओरडलाच पण  “हि वाईन मात्रं तिच्या  जीवावर बेतलीये स्यू ने त्याला सांगीतले. नि आत्ता ती खूप आजारी आहे नि अशक्त सुद्धा झालीये.रोज झडत जाणारी त्या झाडाची पाने बघून आता तिला स्वतःला  सुद्धा आपण असेच ह्या झाडांच्या पाना सारखे संपणार अशी खात्री वाटायला लागलीये. हे हि त्याच्या कानावर घातले.
हे सगळ ऐकल्यावर खरे तर बेहमनला खूप राग आला.पण त्याचा त्या दोघींवर तसा जीव होता. त्याने समजावणीच्या सुरात स्यू ला सांगीतले कि "हि जागा तशी जोन्सिला नवीन आहे ना ? अगं त्या मुळे कदाचित असं असेल.पण तू काही काळजी करू  नकोस.ती ह्यातून नक्की बाहेर पडेल.अगं मी सांगतो न तुला कि एक दिवस,आपण तिघं अगदी इटलीला सुद्धा जाऊ नि अगदी नेपल्स ला सुद्धा भेट देऊ.काही काळजी करू नकोस. अन हो.... कधीतरी... मी हि एक दिवस मास्टर पीस बनवेन.... काढेन” पण, आत्ता  मी तुझं मॉडेल आहे ना ? चल,तू हि आता  उगीच फार विचार करत  बसू नकोस. लाग !तू तुझ्या कामाला लाग.
ते  दोघे जिना चढून वर आले.जोन्सीचा डोळा लागला होता.स्यू ने गुपचूप तिच्या खिडकीचा पडदा ओढून घेतला नि ते दोघे स्यू च्या खोलीत आले.न कळत दोघांचे लक्ष पुन्हा एकदा त्या वाईन ट्री कडे गेले. आता थंडगार वाऱ्या बरोबर  पाउसही पडायला सुरवात झाली होती नि "आता बर्फ हि पडेल " असा विचार स्यू च्या मनात येऊन गेला. मात्र बेहमन मॉडेल च्या  भूमिकेत शिरला नि स्यू ने  ते कागदावर उतरवायला सुरुवात केली.
त्या रात्री खरोखरच चांगला वादळी पाउस झाला,नि बर्फ  हि भरपूर पडले.सकाळी जोन्सीला नेहमी पेक्षा जरा लौकरच जाग आली.
"जरा खिडकीचा पडदा बाजूला कर" असे जोन्सीने स्यू ला सांगतच दिवसाची सुरुवात झाली.स्यू ने पडदा बाजूला केला.झाडावर फक्त एक पान  राहिलं होतं." हे शेवटचं पान ,ते  सुद्धा आज गळून पडेन अन मी सुद्धा त्या नंतर ह्या जगात नसेन " जोन्सीने आपली खंत स्यू  ला बोलून दाखवली. जोन्सीने पटकन तिच्या तोंडावर हात  ठेऊन " असं काही बोलू नकोस गं" म्हणून तिला विनविले. मात्र  जोन्सीने ह्या वर काहीच उत्तर दिले नाही.तो संपूर्ण दिवस नि रात्र वारा नि पाउस असून सुद्द्धा ते पान झाडावर टिकून राहिले.


सकाळी जोन्सीला पुन्हा एकदा लौकर जाग आली."स्यू जरा पडदा बाजूला कर नां ? असे सांगतच दिवसाची पुन्हा एकदा सुरुवात झाली.ते शेवटचे पान अजून सुद्धा त्या वाईन ट्री वर टिकून होते.जोन्सी नंतर बराच वेळ त्या कडे एकटक बघत राहिली. थोड्या वेळाने तिने स्यू ला आवाज दिला ."स्यू ! खरंच मी किती मूर्ख मुलगी आहे गं ? मला मरायचं होतं ,पण हे शेवटचं पान झाडावर अजून टिकलंय.ते मला खूप काही शिकवून गेलंय.आता मला सूप हवंय ! देतेस नां? प्लीज ?"
साधारण तासाभरा नंतर  जोन्सीने स्यू ला पुन्हा एकदा आवाज दिला " जोन्सी, आता मला खात्री पटलिये   कि मी एक दिवस नक्की बे ऑफ नेपल्सची चित्रे काढणार. माझ्या मनात आता काही शंका नाही.
दुपारी नेहमी प्रमाणे पुन्हा एकदा डॉक्टरांची व्हिजीट झाली.त्यांनी जोन्सीला पुन्हां एकदा व्यवस्थित तपासले.रूम बाहेर येत त्यांनी स्यू चा हात हातात घेत सांगीतले कि "मैत्रिणीची चांगली काळजी घे, होईल ती बरी.चला येतो मी कारण मला खालच्या मजल्यावर बेहमन कडे पण जायचंय.कारण तो हि न्यूमोनियाने आजारी पडलाय.पण त्याला मात्र मला हॉस्पिटलला पाठवावे लागणारे "
दुसरे दिवशी डॉक्टर स्यू शी तिच्या मैत्रिणीच्या प्रकृती बद्दल पुन्हा बोलले.ती लौकरच बरी होईल हा आशावाद त्यांनी पुन्हा एकदा जागवला नि जाताना हलक्या आवाजात स्यू च्या जणू कानात काही एक बातमी सांगितली.
दुपारी स्यू  जोन्सीच्या खोलीत आली.तिच्या शेजारी बसत तिने जोन्सीच्या  गळ्यात दोन्ही हात टाकत तिला सांगीतले कि " अगं, एक थोडी वाईट बातमीये ! मिस्टर बेहमन आज सकाळी गेले. हॉस्पिटल मध्येच वारले."
दोन दिवसां पूर्वी  त्यांच्या शेजाऱ्याला ते  अंथरुणातून सकाळी न उठल्याने शंका आली  नि ते आजारी असल्याचे त्याला कळले.त्यांचे बूट नि कपडे सुद्धा ओलेच होते.त्याने डॉक्टरांना निरोप दिला. नंतर त्या शेजाऱ्याला बाहेरच्या अंगणात  एक शिडी,एक दिवा,काही ब्रश नि हिरवे पिवळे रंग सापडले.
 

"जोन्सी !" स्यू ने शांतपणे तिला सांगीतले,"  त्या खिडकीतून जरा बाहेर बघ.त्या वाईन ट्री वरच ते शेवटचं पान अजून सुद्धा तिथेच आहे.एवढ्या वादळी पावसात,हिमवृष्टीत सुद्धा ते गळून पडल नाही, ह्याचं तुला कधी आश्चर्य नाही वाटलं ? अगं!तो बेहमनचा मास्टर पीस आहे. त्यां वादळी रात्री त्याने पेंट केलेला. 
हे पोस्ट "जस्ट निफ्टी"चे श्री. ईलँगो ह्यांचे सौजन्याने.
धन्यवाद . 
Dear Mynac,
Thank you for sharing the story. We do not know whether it makes a difference to anyone but we like sharing. And when the reader is ready, it will touch their lives.
I try & post as much as possible the ones that extracts few tear drops from my eyes. And sometimes few chokes me.
Please go ahead and translate them and post for your readers. Spread the good feelings... touching sentiments..lifting spirits...motivating words.
Best regards.
ilango




 

४ टिप्पण्या:

  1. mynac दादा,
    ही कथा पूर्वी वाचली होती... तेव्हाही प्रचंड आवडली होती. पुन्हा वाचायला दिल्याबद्दल खूप आभार.

    उत्तर द्याहटवा
  2. हेरंब,
    सर्व प्रथम मनः पूर्वक धन्यवाद.
    "तुझ्या" सारख्या मित्रांनी ती वाचलीच असणारे ह्याची मला खर तर खात्री आहे/होती,पण खर सांगू माझ्या सारख्या इकॉनॉमी क्लास मधल्या प्रवाशाला अगदी "प्रगती" मधलं "कटलेट" हि सुद्धा चैनच वाटते/असते रे :) असो. पण तरी पोस्ट फारच मोठे झाले हि वास्तवता नाकारता येत नाही.,त्या मुळे किती वाचक" ते " पेशन्स दाखवतील हि सुद्धा एक शंका आहेच.पण परीक्षेला बसलोच होतो त्या मुळे मना पासून पेपर द्यायचा प्रयत्न केला आहे,एवढेच.

    उत्तर द्याहटवा
  3. मस्त!!
    आणि हा अजिबातच अनुवाद वाटत नाही! शेवटचा पॅरा वाचल्यावर कळाले! सुंदर अनुवाद! हे जमणे देखिल खुप मोठे काम आहे! अभिनंदन!

    उत्तर द्याहटवा
  4. अद्वैतजी,
    ब्लॉग वर आपले स्वागत आहे,नि प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
    आपले पत्र मिळाले
    "१ मे" महाराष्ट्र दिनाच्या आजच्या दिवशी माझ्याही आपणास हार्दिक शुभेच्छा.
    नेमके ह्या पोस्टचे शीर्षक सुद्धा "शेवटचे पान" च आहे,नि आज १ मे,महाराष्ट्र दिन सुद्धा आहे.
    ह्या शुभेच्छा आपणास देत असताना सुद्धा मनात एक विचार चमकून जातो कि महाराष्ट्राचे देशातील स्वतःचे असे जे प्रगत राज्याचे स्थान होते ते आता इतर राज्यांच्या प्रगती मुळे नव्हे आपल्या नालायक राज्यकर्त्यामुळे नि राज्यातील नागरिकांच्या निष्क्रीयते मुळे फारच वेगाने घसरत चालले आहे काय? अगदी साधे पण अतिशय नेमके उदाहरण द्यायचे म्हणजे गेल्या काही वर्षात शेयर बाजाराला १ मे महाराष्ट्र दिनी जी पूर्वी सुट्टी असावयाची ती देणे आता बंद केले आहे.अगदी महाराष्ट्रीयन माणसांच्या नाकावर टिच्चून.विशेष म्हणजे बाजारातील रोजच्या साधारण १ लाख कोटी उलाढालीतील मधील अजून हि ७० टक्क्या पेक्षा जास्तीचा वाटा महाराष्ट्राचा असून हि.हळू हळू इतर त्या तुलनेत (खरे तर तुलना होऊच शकत नाही ) अप्रगत राज्यांचे आंडू पांडू तथाकथित नेते सुद्धा अगदी बिनधास्तपणे खडसावतात कि मुंबई,महाराष्ट्र हा मोठा आहे तो फक्त महाराष्ट्रा मुळे,मराठी माणसा मुळे नाहीये तर इतरां मुळे आहे. आणि आपले हे जातीयवादाच्या दलदलीच्या राजकारणात रुतलेले नेते,कि जे इथे सगळ्यांना वाघ वाटतात जे केंद्रात कागदी वाघ सुद्धा वाटत नाहीत ते हातात बांगड्या भरून मुग गिळून गप्प बसतात.त्या वर ब्र काढत नाही. आपण नक्की कुठं चाललोय? का चाललोच नाहीये? का मागे मागे? नक्की काही कळायला मार्गच नाहीये !

    उत्तर द्याहटवा