"तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून तुम्ही कसे असता किंवा असू शकता हे मी तुम्हाला सांगतो " असे आपल्याला जर कुणी सांगितले तर आपण त्याला नक्कीच वेड्यात काढू.पण आजच्या ह्या इंटरनेटच्या जगात कुणीही,कधीही,कशावरूनही आणि काहीही सांगू शकतं... आपला विश्वास बसत नाही ना ? तर मग चला ही चित्रेच पहाना ! आणि मग नंतर ठरावा कि त्यात तथ्य किती नि करमणूक किती ते !
एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले ... हिंदी मराठी सिनेमा,इंग्रजी लघुकथांचा स्वैरानुवाद हा त्यातल्या त्यात आवडीचा विषय त्या मुळे त्यावरच बऱ्याचदा स्वैर, परंतु साधार लेखन... इन्टरनेटच्या सहकार्याने...
मंगळवार, १३ डिसेंबर, २०११
रविवार, ४ डिसेंबर, २०११
शेयरबाजारात पैसे मिळवायचे?तर मग हे वाचाच...
उगाच पाल्हाळ लावण्या पेक्षा डायरेक्ट मुद्यालाच हात घालुयात.शेयरबाजारात आपण कुठल्याही कंपनीचा शेयर घेतला कि त्या शेयरची ती गुंतवणूक योग्यवेळ आहे नाही,आपण जर नफ्यात असू किंवा आलो तर तो कुठे विकावा किंवा जर त्या गुंतवणुकीत तोटा होत असेल तर तो अजून किती काळ होऊ शकतो ,ह्या सर्वसाधारण आपल्या सारख्या छोट्या गुंतवणूकदारांना पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर बंगलोर येथील श्री.इलँगो ह्यांच्या स्टॉकवेल्थ ह्या ब्लॉगवर मिळू शकेल.सदरहू लेखक ही माहिती गेल्या ३ वर्षा पासून विनामूल्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जवळपास दररोज नियमित प्रसिद्ध करतात.शेयर बाजारातील प्रमुख ५० मिड्कॅप आणि निफ्टी मधील ५० कंपन्यांच्या शेयरची "आजची स्थिती" अशा प्रकारची "विश्वासार्ह "माहिती देणारा माझ्या माहितीतील हा भारता मधील एकमेव ब्लॉग आहे.
शुक्रवार, २ डिसेंबर, २०११
"कोलावेरी डी"!अर्थात "समर्था घरचे श्वान'
एव्हाना कोलावेरी डी चे तोंड फाटे पर्यंत कौतुक करून झाले आहे,तरुण पिढीला त्याने घातलेली भुरळ पाहता तरुणांच्या ह्या आवडी पेक्षा त्यांची खरोखरच्या श्रवणीय संगीताच्या बाबतीत सध्या होत असलेली उपासमार प्रकर्षाने नजरे समोर येते.सध्याच्या संगीतकारांच्या सिनेमातील गाण्याला दिलेल्या अति सुमार चाली पहाता,सगळ्याच वाईट गाण्यात त्यातल्या त्यात बरे काय तर कोलावेरी डी ...आणि म्हणून तर खरे,ते जास्त उचलले गेले असावे अस उगीच राहून राहून वाटत.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)