भोज्जा

बुधवार, ४ मे, २०११

लादेन... किती खरा नि किती खोटा ?

ओसामा संपला पण नेहमी प्रमाणे बरेच प्रश्न अनुत्तरीत ठेवून.खरं तर मराठी नि हिंदी सिरीयलचे आम्ही हक्काचे प्रेक्षक ह्याला आता चांगलेच सरावलो आहोत  कि असे बिनडोक प्रश्न आम्हाला आता सहसा पडत नाही. पण इथे कसं डायरेक्ट लादेन आहे नि लादेन बाबत अगदी खुद्द अमरिकेने नव्हे खुद्द ओबामाने जरी  अगदी आमच्या वर त्याची किंवा त्याच्या देशाची हि कृती  लादेन असं जरी सांगितलं तरी आम्ही ती सहजा सहजी लादून घेणार नाहीये. काही बेसिक, भाबडे म्हणजेच बावळट असे प्रश्न हे पडतातच. मुळात तो खरच संपला का ? का संपला असे सांगून अमेरिकेने  नेहमी प्रमाणे स्वतःची एकदाची सुटका करून घेतली ? कारण कुणी म्हणत तो निःशस्त्र होता तर कुणी म्हणत कि त्याच्या कडून  प्रतिकार झाल्याने त्याला गोळ्या घातल्या. आता जर तो निःशस्त्र होता  नि अगदी नेम धरून त्याच्या डोक्यात गोळ्या घाले पर्यंत जर जवळ जाता येत होते तर त्याला जिवंत पकडता का नाही आले ?त्या सद्दाम हुसेन सारखा ? नि इतक्या घाई घाईने त्याला समुद्रात का फेकले ? का हि सुद्धा एक फेकच आहे का खरा लादेन कदाचित पूर्वीच मेला असेल वा नसेल पण केवळ या  विषयावर कायमचा पडदा टाकण्या साठी  हे अमेरिकेचे नेहमी प्रमाणे एक नवे पण नेहमी प्रमाणेच बेमालूम नाटक  आहे

अहो, आमच्या वाड्यात अगदी बोहारीण जरी भां S डी SS ...ये करत शिरली तरी ती कुणाच्या दारा समोर उभी राहून आवाज देतीये हे शेजारच्या काकू हातातलं काम सोडून बघतात नि इथे तर अनोळखी देशाची ४-४ हेलीकॉप्टर  रात्री बेरात्री विनापरवानगी एखाद्याच्या प्रदेशात उतरतायेत, ३०-४० मिनिट आमच्या हिंदी सिनेमातल्या प्रमाणे फुल फायटिंग करतायेत नि शत्रूचा खात्मा करून भुरकन पुन्हा उडून जाताहेत.अन ते सुद्धा म्हणे त्या आय.एस.आय च्या तळाच्या फक्त ७०० मीटर अंतरावर.सगळेच संशयास्पद.एक कुणी १०-१२ वर्षाचा मुलगा काही सांगतो नि आपण आपले तोंडाचा आ करून बघत राहायचे ? बरं, फोटो दाखवून टी.व्ही. न्युज चॅनल वाले ज्याला अलिशान- आलिशान हवेली म्हणून संबोधतायेत ते घर तरी कसले डोंबलाचे अलिशान ?कुठल्या तरी एन्गलने ते अलिशान वाटते का?अहो आमच्या कडच्या सरपंचाचे घर त्या पेक्षा अलिशान असते नि सर्वात महत्वाचे म्हणजे ते  दिसते.का लोक पहातेहेत नि ऐकताहेत म्हणून हुं म्हणून काहीही रेटत रहायचं ?  
मुळात एखाद्या गोष्टीचे उत्तम प्रेझेन्टेशन करण्याचे अमेरिकेचे कौशल्य वादातीत आहे.अगदी चंद्रावर माणूस उतरला पासून ते इराक मध्ये सद्दाम हुसेनने केमिकल वेपन्स ठेवली आहेत ते वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडण्या -पडण्या पर्यंत.मागे ७० च्या दशकात अमेरिका-रशियाच्या त्या कोल्डवॉरच्या काळात चंद्रावर तो आर्मस्ट्रोंग उतरला काय नि न उतरला काय त्याने इथे कुणालाच फरक पडणार नव्हता. आमचा भुगोलातला तो अवघ्या २ मार्कांचा प्रश्न.  पण अगदी बेंबीच्या देठापासून शंख केलेल्या सद्दाम बाबत ही सरते शेवटी हाती काहीच लागले नाही ना? ना केमिकल वेपन ना अजून काही.तो सद्दाम सुद्धा शेवटी एखाद्या अगदी हुतात्म्या सारखा फासावर गेला.अहो  तिथली बहुसंख्य जनता अजून ही बऱ्या पैकी   मागासलेलीच होती नि आहे.नाही तर हां सद्दाम  दशाकानुदशके तेथे सत्ता उपभोगु शकला असता का ? का अमेरिका नि ब्रिटन ला येनकेंन  प्रकारे संपत चाललेल्या जगातील तेलसाठ्याची जी चिंता भेडसावत होती त्या वर जगाची सहानुभूति मिळवून,बघा आम्ही होतो म्हणून तुम्ही वाचलात हे उपकार केल्याचे दाखवून त्या वर फ़क्त ताबा मिळवायचा होता? हे प्रश्न अनुत्तरितच आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर बाबत सुद्धा बरेच प्रश्न अनुत्तरितच आहेत.हेरम्ब ओकच्या ह्या पोस्ट  मुळे तर त्यास पुष्टीच मिळते.त्या मुळे अगदी जरी खरोखरचा लादेन मारला गेला असे जरी आपण मान्य केले गृहीत धरले तरी हे एनकौंटर  म्हणजे  नेहमी प्रमाणे दर ४-६ महिन्याने टी.व्ही. वर येणारया त्या लादेनच्या टेपला आता हे अमेरिके कडून कायमचे उत्तर देऊन त्याला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न आहे का ? ह्या नंतर सुद्धा अमेरिके कडून ह्या विषायावर बरेच उलट सुलट दावे बातम्या येतंच रहातील पण  आम्हां सामान्यांचा बुद्ध्यांक मुळातच कमी असल्याने असे प्रश्न मग ते कदाचित बिनबुडाचे सुद्धा असतील पण पडू शकतात नि मुळातच हुशार नसल्याने अगदी स्टॅटिस्टीकली ते मांडून त्याचा शहानिशा सुद्धा करू शकत नाही. कां लादेन संपला हे ही नेहमी प्रमाणेच उत्तर नसलेले कायमचे  कोडेच   राहणार आहे.       


१२ टिप्पण्या:

 1. mynac दादा, सहमत..

  लादेन खरंच मेलाय (म्हणजे आत्ता मेलाय की आधीच वगैरे) याबद्दल माझ्या मनात तेवढीच प्रश्नचिन्हं आहेत जेवढी '९/११' किंवा 'मॅन ऑन मून' बद्दल होती/आहेत.

  उत्तर द्याहटवा
 2. हेरंब,
  आम्हाला नुसतं एवढं बोलून चालणार नाहीये.उलट जेव्हा नि जर शक्य झाले तर ९/११ प्रमाणे भविष्यात जर काही ह्या विषयावर मस्त पोस्ट देता आले तर पहा हि मना पासून प्रेमाची नि आग्रहाची इथें आमची तुझ्या कडे आता पासूनच मागणी आहे.त्याचे एडव्हान्स बुकिंग करून ठेवत आहे:)
  आणि अगदी खरं सांगायचं तर, तुझे ह्या लेखात उल्लेख केलेले ९/११ चे पोस्ट वाचल्या नंतर नक्कीच भंजाळायला झाले नि "च्यायला हे असं पण असू शकते काय ? असेल काय ? हा विचार तेव्हा माझ्या मनात येऊन गेला नि त्या मुळेच ह्या घटने कडे पण पिवळ्या चष्म्यातूनच बघितले गेले. अन तेच ह्या लेखाचे "प्रेरणास्रोत" आहे. प्रेरणास्रोत -ब्रिरणास्रोत जरा उगीचच फार जड शब्द वाटतो नाही का ईथे ? पण असू दे... जरा माझ्या म्हणण्याला त्या मुळे फोर्स येतोय :)

  उत्तर द्याहटवा
 3. ह्या पोस्ट मध्ये मी गुगल वरून टाकलेला हा फोटो सुद्धा बहुदा फेकच दिसतो कारण म्हणे दुपारीच न्यूज चॅनलवाल्यांनी सांगितले कि अमेरिकेने म्हणे अजून लादेनचे ह्या विषयावर अजून कोणतेच अधिकृत फोटो प्रसिद्ध केले नाहीयेत असं सांगितलंय .म्हणजे घ्या ...तिकडून हि पोपटच,...तोही साधासुधा नाही तर अगदी पंचरंगी..

  उत्तर द्याहटवा
 4. अनामित१०:०७ AM IST

  प्रतिक्रिया देणे पी नैसर्गिक क्रिया आहे. ती स्वभावाशी सुसंगत असावी. भडक प्रतिक्रिया हे अनाठायी शौर्य आहे (दहशतवाद नव्हे) तर मवाळ प्रतिक्रिया हा भोंदूपणा आहे.

  उत्तर द्याहटवा
 5. अमेरिकेनेच (ओबामाने) लादेनला तिथेच कैद केले असणार आणि निवडणुकाजवळ आल्या की लगेच त्याला बाहेर काढुन मारायचे आणि निवडणुक जिंकायची.

  उत्तर द्याहटवा
 6. प्रती गौरव,
  कदाचित हे थोडे धाडसी विधान होऊ शकेल,कारण तूर्तास तसा कोणता पुरावा वा शंका अजून कोणी बोलून दाखविली नसल्याने.नि त्या उपर जर खरोखर असे झाले किंवा केले तर मात्र अमेरिका फारच तोंडघाशी पडेल नि आता बाण सुटलाय त्या मुळे तो आता माघारी नाही.
  आपले हार्दिक स्वागत.प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
  प्रती अनामित,
  मुद्दा लक्षात घेतला आहे.प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 7. मी काही साईट्स वर वाचलेल्या प्रतिक्रिया सांगते....प्रतिक्रिया देणारे विदेशीच आहेत........OSAMA = OBAMA!, OSAMA + OBAMA = FIB......

  मला तर सगळीच बातमी LOL STUFF झाली!

  Chill out and don't bother much, all this drama!!!! Lots of things can be shared off the record, not on the record.

  उत्तर द्याहटवा
 8. मोहिनी ताई,
  आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.खरे तर अगदी चुकीचे उत्तर सुद्धा ...हे फक्त हि बलाढ्य राष्ट्रेच सगळ्यांच्या बरोब्बर माथी मारू शकतात..... जसे...... आपण एखाद्या लहान..निरागस मुलाला/मुलीला गम्मत म्हणून नाही का म्हणत कि मला ११ बोटे आहेत.ते बिचारे भाबडेपणाने विचारते.... कशी ? कि आपण दाखवतो कि हे बघ १०-९-८-७-६- सहा नि अधिक ह्या हाताची ५ ... सहा नि पाच किती ? ११ हे उत्तर देण्या शिवाय त्याच्या कडे पर्यायाच नसतो. तसे...

  उत्तर द्याहटवा
 9. Mohinee नी आपल्‍या "लादेन... किती खरा नि किती खोटा ?" पोस्टवर नवीन टिप्पणी पाठवली आहे:

  मी काही साईट्स वर वाचलेल्या प्रतिक्रिया सांगते....प्रतिक्रिया देणारे विदेशीच आहेत........OSAMA = OBAMA!, OSAMA + OBAMA = FIB......

  मला तर सगळीच बातमी LOL STUFF झाली!

  Chill out and don't bother much, all this drama!!!! Lots of things can be shared off the record, not on the record.  १३ मे २०११ १२-५० am रोजी मराठमोळ्या गप्पा येथे Mohinee द्वारा पोस्ट केलेले

  उत्तर द्याहटवा
 10. मोहिनी ताई,
  आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.खरे तर अगदी चुकीचे उत्तर सुद्धा ...हे फक्त हि बलाढ्य राष्ट्रेच सगळ्यांच्या बरोब्बर माथी मारू शकतात..... जसे...... आपण एखाद्या लहान..निरागस मुलाला/मुलीला गम्मत म्हणून नाही का म्हणत कि मला ११ बोटे आहेत.ते बिचारे भाबडेपणाने विचारते.... कशी ? कि आपण दाखवतो कि हे बघ १०-९-८-७-६- सहा नि अधिक ह्या हाताची ५ ... सहा नि पाच किती ? ११ हे उत्तर देण्या शिवाय त्याच्या कडे पर्यायाच नसतो. तसे...  १३ मे २०११ १-३२ am रोजी मराठमोळ्या गप्पा येथे mynac द्वारा पोस्ट केलेले

  उत्तर द्याहटवा
 11. ब्लॉगर प्रॉब्लेम मुळे वरील दोन्ही मूळ कॉमेंट ह्या डिलीट झाल्या होत्या,त्या पुनःप्रकाशित केल्या आहेत.

  उत्तर द्याहटवा
 12. Hey, thanks for calling मोहीनीताई - so sweet of you.(आता ह्या संस्कृतीचा विसर च पडलाय :( )
  लादेनच्या विषयावर मी एक पोस्ट इच्छा नसताना लिहिली आहे, त्यातल्या काही ओळी इथे शेअर करते,

  "Boss is always right. Our boss says, this is humanity, we all will say," this is humanity. Boss says, this is justice, we say ya this is justice. Boss says, this is war on terrorism , we have to say. This is war on terrorism. After all boss is always right.
  So this time boss is saying, Osama dead, the Osama dead."

  मला मराठमोळ्या गप्पा आवडल्या! :) :)

  उत्तर द्याहटवा