भोज्जा

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

बिग बॉसचा खेळ सुरु

काल पासून बिग बॉसचा खेळ पुन्हा सुरु झाला.ह्या वेळी फक्त टेस्ट व्हेन्यू बदलला म्हणजे सोनीच्या ऐवजी कलर.ह्या वेळचे खेळाडू पाहता खेळ रंगण्या साठी ज्या आवश्यक गोष्टी लागतात त्याची निदान आत्ता तरी खूपच कमतरता वाटते.सगळ्यात महत्वाचे म्हणजे खेळाडूंचे सरासरी वय.खरे तर टी आर पी वाढविण्यासाठी ते सरासरी २५ ते २७ -२८ असणे एवढेच गरजेचे आहे.ह्याचा फायदा म्हणजे एक तर आयुष्याचा त्या तुलनेत कमी असलेला अनुभव,सळाळते रक्त,तारुण्य सुलभ भावना,थोड्या सहवास नंतर सुध्धा एकमेका बद्दल वाटू शकणारे आकर्षण,बेडरपणा,तापटपणा क्वचित प्रसंगी अपरिपक्वपणा ह्या सगळ्या खरे तर हा खेळ रंगण्यास कारणी भूत ठरणाऱ्या गोष्टी आहे.


आत्ताचे खेळाडू पाहता ते जवळपास सर्व घोडनवरे नि जून आहेत.फक्त ३ महिने हा कालावधी त्यांच्या साठी तसे बघितले तर काहीच नाहीये.त्यांनी अगोदरच बाहेरचे जग,दुनिया इतकी बघितलेली आहे कि त्यांचा थंडपणा अगदी त्यांच्या प्रत्येकाच्या घरातील प्रवेशाचे वेळीच जाणवत होता.बिग बॉसला खेळ रंगतदार करण्या साठी स्वतःलाच खूप प्रयत्न करावा लागणार असे निदान आत्ताचे तरी चित्र आहे.त्यातून घराचे असलेले अवाढव्य आकारमान.खरेतर असे खेळ प्रेक्षकांचे दृष्टीने रंगतदार करण्या साठी घराचे आकारमान लहान ठेवणे गरजेचे आहे.एका माणसास कम्फरटेबल वाटण्या साठी साधारण ६ ते १० चौरस फूट जागा लागते असा संकेत आहे.त्या मुळे खेळाडू दिवसभरा नंतर रात्री झोपण्या पुरते (म्हणजे झोप लागे पर्यंत)जे काही थोडे फार अस्वस्थ होतील ते सुध्धा ह्या वेळच्या एकाच बेड रूम मुळे तेवढेच अन्यथा प्रत्येक खेळाडूस जास्तीचीच नव्हे तर अवाजवी जागा दिवसभरात बहाल करण्यात आली आहे.त्या मुळे त्यास एकांत मिळणे शक्य होणार आहे.आणि इथेच खेळाचा रंग बेरंग व्हायची शक्यता आहे.खरे तर खेळाडूंना प्रायव्हसी न मिळणे हा ह्या खेळाचा आत्मा आहे नि तोच हरवलेला दिसतो.प्रायव्हसी न मिळाल्याने जी स्वाभाविक चिडचिड होते नि त्या मुळे जे वातावरण तापते त्याने खेळात खरे तर गम्मत येते.

दुसरे महत्वाचे म्हणजे बरेचसे खेळाडू हे चेहऱ्या वरूनच कफल्लक असल्याचे लक्षात येते त्या मुळे पैशासाठी ते कोणतीही वेडी वाकडी चुळबुळ करतील असे आत्ताचे तरी चित्र नाही.हा सर्वा समक्ष मात्र "जीवनातील एक वेगळा अनुभव घेण्या साठी मी इथे आलेय/आलोय वगैरे वगैरे अस तोंडदेखल म्हणायचा प्रघात असतो तो त्यांनी पाळलाय.त्या मुळे खरे तर त्यांना किती हि माज असला तरी तो त्यांच्या आर्थिक परिस्तिथी मुळे इथे उतरणार नाही.

मागच्या वेळी सुध्धा पाहिले तर फक्त पायल रोहतगी,आणि फिरंगी वगळता सर्वा समक्ष इतर महिला खेळाडूंनी(खरे तर त्या चांगल्या बारा गावचे पाणी प्यालेल्या होत्या तरी सभ्यपणाचा,संस्कृती रक्षकाचा बुरखा पांघरून)बिग बॉसच्या घरातील पाणी हे फक्त पिण्यासाठी वापरले ह्या वापरा व्यतरिक्त स्विमिंग पूलच्या पाण्याचा वापर केल्याचे आढळले नाही.विशेष म्हणजे काहीजणी चोरून लपून बिड्या फुंकतांना मात्र पकडल्या गेल्या होत्या.ह्या वेळचा स्विमिंग पूल सुध्धा साक्षी प्रधान वगळता मुलीं(?)पैकी कोणी वापरायचे धाडस दाखवेल अशी शक्यता नाही.मुळात त्यांचे आकारमानच त्याला साथ देणार नाही त्या मुळे मनाची नाही पण निदान जनाची तरी त्यांना लाज बाळगावी लागेल.आणि त्यातून त्यांनी ते धाडस दाखविलेच तर टी.वी.चानल बदलायची सोय आपल्या हातात आहेच.त्या मुळे अगदी फार नसले तरी "त्या" प्रेक्षकांची "ति" भूक हि मारली जाणार असेच चित्र आहे.त्याची उणीव घरात भरलेल्या २-३ पहिलवानांना आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करून नि वेळ प्रसंगी भांडणे उकरून काढून शिवीगाळ करून भरून काढावी लागणार.

थोडक्यात काय कि सोनी वरच्या के बी सी ला फाईट देणे ह्या वेळी बिग बॉसला कडवे आव्हान आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा