जिब्राल्टर रॉक, जिब्राल्टरची सामुद्रधुनी ह्या विषयी आपण कधीतरी वाचले-पहिले असते तथापि स्पेनच्या दक्षिणेस असलेल्या, ब्रिटिशांची स्वायत्त वसाहत म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या ह्या देशातील विमानतळाबाबत आपण त्या तुलनेत कमी वाचले किंवा बघितले असते.फक्त ६.८ चौ.कि.मी.एवढेच क्षेत्रफळ असणाऱ्या ह्या देशात जेथे लोकांना राहायला नीटशी जागा नाही, तेथे नागरी विमानतळा साठी जागा उपलब्ध करणे व त्यावर विमानतळ बांधणे म्हणजे दिव्यच होते. तथापि "गरज ही शोधाची जननी असते" किंवा whenever there is will , there is way ह्या उक्तीला जागत ब्रिटिशांनी स्पेन आणि जिब्राल्टरला जोडणाऱ्या विंस्टन चर्चिल या भर वाहतुकीच्या चौपदरी मुख्य रस्त्यावरचं,नव्हे त्या रस्त्यामध्येच, त्या रस्त्याला अगदी ९० अंशाच्या कोनात छेदणारा असा विमानतळ बांधलेला आहे.अर्थात हा विमानतळ फार मोठ्या वाहतुकीचा नाही.आठवड्याला येथून सुमारे ३० विमानेच जा-ये करतात व ते हि फक्त इंग्लंडला.ह्यातील गमतीचा भाग म्हणजे त्या विमानतळावर एखादे विमान येण्यापूर्वी किंवा तेथून जाण्यापूर्वी सदरहू महामार्गावरील सुरु असलेली वाहतूक सुद्धा अगदी इतर सर्वसाधारण रस्त्या प्रमाणे फक्त तांबड्या सिग्नलनेच बंद केली जाते व विमान गेल्यावर रस्ता नेहमी प्रमाणे वाहतुकीला मोकळा केला जातो.विश्वास बसत नाही ना ?चला तर मग त्याचे हे फोटोच पहा.
वरील पोस्ट सौ सुजाता,ते अनमिक मूळ छायाचित्रकार आणि साईटच्या सौजन्याने,धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा