भोज्जा

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

कै.सत्यदेव दुबे आणि अमिताभ बच्चनचा " दीवार "

अमिताभ बच्चनच्या "दीवार " मध्ये संपूर्ण सिनेमात मोजून जेमतेम पावणेदोन मिनिटांचे काम करून ही  ,स्वतःचा ठसा उमटवून ठेवणे ह्या खायच्या गोष्टी नाहीत आणि त्यामुळेच कालच स्वर्गवासी झालेले कै. सत्यदेव दुबे हे  अगदी चेहेऱ्याने जरी नाही तरी  त्यांच्या "त्या" कुलीच्या  भूमिकेमुळे अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांच्या सुद्धा नक्की स्मरणात आहेत आणि राहतील असे मी जर सांगितले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. "दीवार" चित्रपटाच्या ह्या व्हीडिओ क्लिप मध्ये पंचेचाळीसाव्या सेकंदाला आणि १ मी.४० व्या सेकंदाला त्यांची फक्त एक छोटीशी झलक आहे आणि ३ मिनिट ११ सेकंद ते साधारण ४ मिनिट ५५ सेकंदाला त्यांचा चित्रपटातील रोल संपला सुद्धा आहे.तथापि ह्या जेमतेम पावणेदोन मिनिटांच्या छोट्या रोल मध्ये सुद्धा,त्यांनी प्रेक्षकांना खुर्चीत   खिळवून ठेवले होते ह्यात शंका नाही.अशा ह्या अफलातून रंगकर्मीला त्या आठवणीतून ही   श्रद्धांजली..... अमिताभ सारख्या मोठ्या अभिनेत्याने  सुद्धा त्याच्या ब्लॉग वरून ह्याची आठवण सांगितली असून ह्या रंगकर्मीला आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

व्हीडिओ सौजन्य "यू ट्यूब" ,धन्यवाद....
 

1 टिप्पणी:

  1. मिस्टर इंडिया मधील "मोगॅम्बो" उर्फ कै.अमरीश पुरी ह्यांना अभिनेता म्हणून सिनेमात सर्वप्रथम ब्रेक कै.सत्यदेव दुबे ह्यांनीच दिला होता.कै.विजय तेंडुलकर ह्यांच्या "शांतता कोर्ट चालू आहे "ह्या गाजलेल्या नाटकावर आधारित त्याच नावाचा जो मराठी चित्रपट १९७१ साली आला होता त्या चित्रपटात रेल्वेच्या डब्यातील अंध पेटीवादकाच्या (हार्मोनियम)छोट्याशा भूमिकेत कै अमरीश पुरी ह्यांचे १९७१ साली रुपेरी पडद्या वर सर्वात प्रथम दर्शन झाले होते.दुबे हे त्याचे दिग्दर्शक होते.श्री अमोल पालेकर ह्यांचा सुद्धा ह्याच सिनेमातून चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला होता.

    उत्तर द्याहटवा