भोज्जा

शुक्रवार, २० मे, २०११

त्या "चपट्या" नाकवाल्याची गोष्ट

खरं तर हे चपट्या नाकाचं, लहानसं, एक अगदी सर्वसाधारण कुत्र्याचं पिल्लू होतं,म्हणजेच "पग".मात्र, लोक त्याला "हच डॉग" म्हणूनच  ओळखायचे. ते छोटंसं  पिल्लू असताना त्याचे आयुष्यं खूप मस्तं चालले होते.एकदम आनंदात.
 खायचं,प्यायचं, खेळायचं नि झोपायचं ...... 
थोडं मोठ्ठं झाल्यावर,एकेदिवशी अचानक त्याला एका कंपनीत एक मस्त जॉब मिळाला.
काही नाही,..... फक्त एका लहान मुला सोबत राहायचं.तो जेथे जाईल तेथे त्याची सोबत करायची.
ह्या अफलातून नोकरी मुळे अल्पावधीतच  तो इतका प्रसिद्धा झाला कि,अगदी वेबसाईटस  वर सुद्धा तो दिसायला लागला.
 हळू हळू त्याची मजल पार रोड साईड होर्डींग्ज नि कॉम्प्युटरच्या डेस्क टॉप पर्यंत पोहोचली.

आणि....... अचानक एके दिवशी त्याची कंपनी एका दुसऱ्या मोठ्या कंपनीने विकत घेतल्याची बातमी आली.
"पग" विचारात पडला पण नखे कुरतडत बसण्या पलीकडे त्याच्या हातात काहीच नव्हते.
 नवीन कंपनीने, शेवटी विचारा अंती, "पग" ला कामावरून काढून टाकायचे ठरविले.बिच्चारा "पग"..... बेकारीच्या खाईत लोटला गेला.अगदी "काळं कुत्रं" सुद्धा त्याला विचारेनासे झाले.

नवे लोक नव्या कल्पना अमलांत आणल्या गेल्या नि "पग" ची जागा आता "झू झू" ने घेतली.
तात्पर्य काय ??? तर तुम्ही काम करत असलेल्या कंपनी वर कधी प्रेम करू नका तर तेथे तुम्ही करत असलेल्या तुमच्या कामावर "त्या जॉब वर " प्रेम करा, कारण तुम्हाला हे कधीच ठाऊक नसतं कि  "तुमच्या "वरचं कंपनीचे प्रेम कधी आटेल ते.अहो ते एनी  टाईम तुम्हाला डच्चू देऊ शकतात.कंपनीला फक्त त्यांच्या नेमून दिलेल्या कामात व्यावसायिक दृष्टीकोन ठेवणारे लोकच हवे असतात.त्या मुळे व्यावसायिकता अंगी भिनविण्याचा प्रयत्न करा. ....नि जरा जंगलाचा राजा सिंहा कडे बघा...त्याचे काय म्हणणे आहे ते सुद्धा पहा.

जीवन अशा पद्धतीने जगां कि जसं काही तुमच्या आयुष्यातील येणारा प्रत्येक दिवस हा जणू शेवटचाच दिवस आहे,नि जीवनातील प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने शिका,आत्मसात करून घ्या कि जणू परमेश्वराने तुम्हाला अमरत्वाचा दांडपट्टा देऊन ह्या जगात जन्माला घातलंय......

वरील चित्र कथा हि मला आमचे मित्र श्री. संजय जयस्वाल ह्यांच्या कडून आलेल्या मेलचा स्वैरानुवाद आहे.धन्यवाद संजय भाई.  

२ टिप्पण्या: