भोज्जा

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११

पांडुरंगांची व्यंगचित्रे

महाराष्ट्राचे  आराध्यदैवत असलेल्या पांडुरंगाचे पंढरपूर हे ज्यांचे जन्मस्थान होते त्या, खऱ्या तर खूप मोठ्या, पण वादग्रस्त चित्रकाराला, म्हणजेच पैगंबरवासी मकबूल फिदा हुसेन ह्यांना  सर्वांच्या  भावना दुखावणारी  लक्ष्मी,सरस्वती आणि  भारतमातेची  नग्नचित्रे  काढल्याने ह्या देशातून परागंदा होऊन, लंडनला जाऊन अल्लाला प्यारे व्हावे लागले होते,त्या मुळे पांडुरंगांची व्यंगचित्रे असे वाचल्यावर आपल्या भुवया वर जाणे स्वाभाविक आहे.पण केवळ नाव साधर्म्या व्यतरिक्त ह्या पांडुरंगाचा नि आपल्या त्या पांडुरंगाचा काही एक संबंध नाही.उलट ह्या जेष्ठ कन्नड व्यंगचित्रकाराची मराठी वाचकांना माझ्या तर्फे थोडीशी तोंडओळख करून देण्याचा आणि आपल्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत करून,ह्या महान व्यक्तिमत्वाला सलाम करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. 

हे आहेत कर्नाटकातील बंगलोरचे जेष्ठ व्यंगचित्रकार श्री.बी.व्ही.पांडुरंगा राव.मध्यप्रदेशातील भिलाई स्टील प्लांट मधून जेष्ठ व्यवस्थापक म्हणून २००१ साली निवृत्त झाल्या नंतर हे बंगलोरला स्थाईक झाले आणि स्वतंत्र व्यंगचित्रकार म्हणून  त्यांचा ह्या क्षेत्रातील प्रवास अधिकच जोमाने सुरु झाला. ह्यांनी १९६५ साली अमेरिकेतल्या Cleveland मधील रे बर्न्स  ह्या कार्टुनिंग स्कूल मधून डिप्लोमा घेतला आहे.आजपर्यंत ह्यांची असंख्य व्यंगचित्रे कन्नड,हिंदी आणि इंग्रजी दैनिकातून नियमितपणे आणि इतर प्रकाशनां मधून प्रसिद्ध झाली आहेत,तसेच असंख्य व्यंगचित्रे आजवर आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रांच्या उत्सवात,प्रदर्शनात प्रसिद्ध झाली असून २९ वेळा ती आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रांच्या अल्बम मध्ये प्रसिद्ध केली गेली आहेत.एवढेच काय तर  त्यांनी  देशभरात आजवर ३७ वेळा त्यांच्या व्यंगचित्रांचा एकपात्री कार्यक्रम सादर केला आहे.त्याची नोंद २०१०-११ साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून घेतली गेली आहे.सर्वात छोट्या आकाराच्या त्यांच्या फ्लिप बुक अँनिमेशनची, ह्या क्षेत्रातील "राष्ट्रीय विक्रम" म्हणून २०१०-११ साली नोंद सुद्धा आहे.ह्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुण,होतकरुंच्या साठी त्यांनी अनेक शिबिरांचे आजवर आयोजन केले आहे.  

त्यांनी कर्नाटक कार्टूनिस्ट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविण्या बरोबरच भिलाई स्टील प्लांट आणि मध्य प्रदेश विभागवार क्रिकेट सामन्यांमध्ये खेळाडू म्हणून  प्रतिनिधित्व केले आहे  आणि मध्य प्रदेश राज्यस्तरीय क्रिकेट मंडळाचे अधिकृत पंच (क्रिकेट अम्पायर) म्हणून देखील काम पहिले आहे.खेळातील त्यांचे प्राविण्य फक्त एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी मध्य प्रदेश विभागवार बॅङमिंटन स्पर्धेत सुद्धा भाग घेतला आहे.अशा ह्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची हि नुसती तोंड ओळख आहे कारण एखादी व्यक्ती किती ब्लॉग्ज सुरु ठेवू शकते,काढू शकते किंवा निदान त्याचा एक हिस्सा बनू शकते त्याचे हे गृहस्थ म्हणजे एक मासलेवाईक उदाहरण आहे.ह्यांचा प्रोफाईल बघितला असता हे गृहस्थ १-२ किंवा १०-२०नव्हे तब्बल ६२ ब्लॉग चालवतात/लिहितात /त्यांच्या व्यंगचित्रांनी रंगवतात हे बघितल्यावर आश्चर्य चकित होऊन आपोआपच तोंडात बोट जाते.

तर अशा ह्या अफलातून व्यंगचित्रकाराची काही व्यंगचित्रे मध्यंतरी माझ्या पाहण्यात आली नि त्या वरील "
पांडुरंगा" ह्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सहीने त्याचा मागोवा घेत गेलो असता ह्या अफलातून व्यक्तिमत्वाची ओळख झाली.खरेतर त्यांच्या व्यंगचित्रांना भाषेची गरजच नाही/नसते तरीही नेहमी प्रमाणे मी त्यातील काही व्यंगचित्रांचे माझ्या सवयीने  स्वैरानुवादाने मराठीकरण केले आहे.हि व्यंगचित्रे वाचकांचा या वेळच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत करतील ह्यात शंका नाही.चला तर मग ....... 
आणि हे श्री.बी.व्ही.पांडुरंगा राव. त्यांच्या राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद झालेल्या सर्वात छोट्या आकाराच्या फ्लिप बुक अँनिमेशन सोबत ..

हे पोस्ट म्हणजे दुसरे तिसरे काही नसून श्री.पांडुरंगा रावांच्या ६२ ब्लॉग पैकी काही ब्लॉगमधील, काही निवडक व्यंगचित्रांचे संकलन आहे.त्या मुळे मी श्री.बी.व्ही.पांडुरंगा रावांचे ह्या प्रसंगी आभार मानतो.ज्या कुणाला ह्या विषयात गती, रुची नि आवड असेल त्यांनी श्री.रावांच्या  http://www.paanducartoonist.blogspot.com/ ह्या ब्लॉगला एकवार अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.

  

३ टिप्पण्या:

 1. bvpanduranga rao to me

  show details 9:46 AM (2 hours ago)

  Dear mynac,

  Thanks for the message

  Best wishes for Diwali new year to you and your family.

  I am really happy to go thru your letter. I have gone thru your blog posted with my cartoons.

  And I am extremely thankful to you for posting my cartoons with a nice write up and also taking pain to translate the cartoon captions to Marathi.It's an honour for me and really It's a great feeling.

  Thanks for the compliments about my cartoons.

  Well, you know I am a Cartoonist by Hobby only. I have come a long way to improve myself in my passion and get recognised too. It's God's grace.

  It is good to read the comments of a great cartoonist Shri Raj Thakre about the cartoons and cartooning Yes he is right.The young talents must understand the importance and benifit of basic drawing. Computer is just an aid. Creativity comes with hard work.
  Recently, I was invited by Animation Studio to give lecture/ demo to their students on basics of Cartooning - and how it helps in Computeranimation.

  Well, I cannot fully follow the marathi languaze and as I am good in Hindi , I can understand the summary of the write up and the cartoon caption.

  Hope your tremedous effort will motivate the young talents and bring smiles to cartoon lovers.

  My word to beginners is that, the talented cartoonists who do not get opportunity to become a professional cartoonists and practice cartooning for fun and enjoyment, also can reach to great heights if one works with dedication.

  I shall be forwarding this link to many of my friends.

  With best wishes

  Panduranga Rao
  Bangalore
  9880124551

  उत्तर द्याहटवा
 2. Dear B.V.Panduranga Rao,

  Sir,
  Thanks for your visit and the most valuable guidance/words to beginners.It will definitely help them.
  We hope so,that in future the young talents will bring smiles to cartoon lovers.

  with regards,

  mynac

  उत्तर द्याहटवा
 3. Dear friends,
  Earlier the following mail was sent by me to Shri.B.V.Panduranga Rao

  Respected Sir,

  I am 53 yrs.middle aged Marathi Blogger from Pune,Maharashtra, who accidentally visited your cartoon Blog.

  I saw the most beautiful cartoons and I read your profile and found very much interesting and second moment decided to prepare one post about you and your selected cartoons.

  Sir, as you are very well recognized cartoonist world wide, by this post those Marathi readers who are not yet that much aware of the fact, will get one more opportunity to know about you and your cartoon is my selfless motivation.

  I have prepared the post with the help of your cartoons, occasionally with the help of some appropriate Marathi translation, without disturbing the beauty of your art.

  In the beginning of the post there is an introductionary note about you and your journey since 1965 to 2011, with the help of your Profile on your Blog.

  Sir,
  Today, one of Marathi T.V.news channel called IBN Lokmat, there was an interview, with Mr.Raj Thakare, founder of one state political Party called Maharashtra Nav Nirman Sena called MANASE, who has passed out from J J school of Arts,Mumbai and in his earlier days, who has also contributed some political back ground cartoons in Mr. Thakre’s popular Weekly Publication called Marmik .He is nephew of Mr. Bal Thakare,who was also one known Political Cartoonist of his time. The interview had no political discussions but was about Mr. Raj Thakre’s passion about Cartoon Art . It was very interesting. Because he also told that now a day’s most of the young talent does not aware of the fact i.e. paper work is the most needed part for animation or any cartoon . They are just very much dependent on computer software, Maya etc. They are forgetting that this is an art.

  So, it will be great honor for us if you will visit this post whenever time will permit you, and throw some light & guide on this subject a little bit. It will be definitely helpful for young generation, who wants to do something in this field.

  By this mail I again thanking you, for those wonderful cartoons and waiting in anticipation, for your blessings.The post link as follows :

  http://marathmolyagappa.blogspot.com/2011/10/blog-post_28.html

  Sincerely Yours,

  mynac

  उत्तर द्याहटवा