भोज्जा

बुधवार, २९ सप्टेंबर, २०१०

रामभाऊचे हॉटेलिंग

अजून कोणी येतंय का?हा वेटरचा प्रश्न अपेक्षितच होता नि त्याला कारण हि तसेच होते कारण कोठल्याही  चांगल्या व्हेज हॉटेल मध्ये पहिल्या मजल्या वरील फॅमिली  रूम मध्ये फक्त २ तरुणच बसले असतील तर त्यांच्या बरोबरच्या लेडीज मागे आहेत नि हे त्यांची वाट पाहत आहेत असेच वाटते.नि पुढे येऊन ह्या दोघांनी जागा मिळवायची व्यवस्था केली आहे असेच वेटरचे हि मत झाले नाही तरच नवल.त्या मुळे आम्ही स्थानापन्न झाल्यावर सुमारे ५ मिनिटांनी वेटरने आम्हास हा प्रश्न केला.उत्तर "नाही" असेच होते ते द्यायची जबाबदारी मात्र रामभाऊनि  घेतली कारण त्यांनीच मला येथवर आणले होते.आमचे "नाही" उत्तर ऐकल्यावर वेटर ने आम्हास "हि फॅमिली रूम आहे ,त्या मुळे आपण खालच्या मजल्यावर बसा" अशी विनंती केली.त्या वर "हि फॅमिली रूम आहे ह्याची आम्हाला कल्पना आहे नि ते वाचूनच आम्ही येथे बसलो आहोत कारण आम्ही दोघे हि एकाच  घरातील असून भाऊ-भाऊच  आहोत" हे रामभाऊनि  अतिशय निरागस चेहऱ्याने त्या वेटरला उत्तर दिले.वेटरला ह्या वर काहीच न सुचल्याने त्याने "नाही तसं नाही पण येथे बरोबर लेडीज असतात त्यांच्या साठी हि रूम आहे" हे पुन्हा एकदा सांगितले.पण इथ ह्या बोर्डवर तसं कुठ लिहिलंय? ह्या रामभाऊंच्या  प्रश्नावर त्याच्या कडे उत्तर नसल्याने त्याने थेट मॅनेजर कडे धाव घेतली.


मॅनेजर वर आला. प्रश्नोत्तरे त्याला वेटर कडून आधीच समजली होती.त्याने दुरूनच रामभाऊंना कोपरा पासून नमस्कार केला नि खाली जाऊन बसायची विनंती केली.आम्ही अर्थातच  ती अमान्य करण्याचा प्रश्नच नव्हता कारण आमचा (?) हेतू साध्य झाला होता,कारण जिचे  लक्ष वेधले जावे अशी अपेक्षा होती ती पूर्ण झाली होती.


वरील किस्सा प्रत्यक्षात पुण्यातील लक्ष्मी रोड वरील "स्मिता" हॉटेल (म्हणजे आत्ताची रांका ज्वेलर्स ची शो रूम )मध्ये झाला होता.बरोबर आमचे मित्र रामभाऊ होते.आता गेले बिचारे पण एक अतिशय हजरजबाबी नि हुशार व्यक्तिमत्व .ह्या बद्दल शंकाच नाही.त्यांच्या दुःखद शेवटा बद्दल पुन्हा एकदा कधी तरी सवडीने सांगेन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा