भोज्जा

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०११

अफलातून जादुगार डेव्हिड कॉपरफिल्ड

जादुगारी विश्वात "डेव्हिड कॉपरफिल्ड" हे नाव माहीत नाही असा माणूस शोधून सापडणे कठीण.११ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस नावावर असणारा आणि २१ एमी अवार्ड्स जिंकणाऱ्या ह्या अवलिया जादुगाराचे ,सहा देशांनी पोस्टाचे तिकीट काढून त्याच्या कौशल्याचा सन्मान केला आहे.असा मान मिळणारा आणि मिळविणारा तो जगातील एकमेव जादुगार आहे असे सांगितले जाते.ह्याच्या खेळाची आजवरची विकली गेलेली तिकिटे हि फ्रँक सिनात्रा,एल्व्हिस प्रिस्ले एवढेच काय पण अगदी मायकेल जॅक्सनच्या सर्व खेळांच्या पेक्षा हि जास्त आहेत असे त्याची साईट सांगते.थोडक्यात काय तर जिवंतपणीच  दंतकथा बनलेल्या ह्या जादुगाराला सलाम.आता एवढे वाचल्यावर आपल्याला त्याचा किमान एक तरी जादूचा खेळ बघणे हे ओघानेच आले.चला तर मग पाहूयातच... 
  

  
हे फोटोग्राफ्स मला पूर्वी www.nidokidos.com ह्या साईट वर मिळाले होते ते am alive ह्यांनी पोस्ट केले होते ,त्यांचे ह्या प्रसंगी आभार,आणि डेव्हिड कॉपरफिल्ड ह्यांची माहिती त्यांच्या http://www.davidcopperfield.com ह्या साईटवर मिळाली,त्यांचे हि आभार.

४ टिप्पण्या: