एकदा एका राजाला अरेबिया मधून दोन अप्रतिम बहिरी ससाणे भेटी दाखल मिळाले.राजाने आजवर बघितलेल्या स्थलांतरित,प्रवासी बहिरी ससाण्यांच्या मधील "केवळ अप्रतीम " अशी ती जोडी होती.राजाने त्या जोडीला त्यांच्या पुढील प्रशिक्षणासाठी त्वरित त्याच्या दरबारातील बहिरी ससाण्याच्या प्रशिक्षकाच्या ताब्यात दिले.
काही महिन्यां नंतर एके दिवशी,त्या प्रमुख प्रशिक्षकाने राजाला येऊन सांगितले कि त्या जोडीतील एक ससाणा आकाशात उंचच उंच अशी जादुई भरारी अगदी लीलया घेतो पण... जोडीतील दुसरा ससाणा मात्र आकाशात उडणे तर दूर त्याला येथे आणल्या दिवसा पासून त्याच्या फांदी वरून हललेला सुद्धा नाही.
झाले..राजाने त्वरित फर्मान काढून,त्याच्या सूत्रांकडून त्या अतिशय उमद्या पण ढिम्म अशा बहिरी ससाण्याची काळजी घेण्यासाठी राज्यातून कोणी मिळतंय का हे पाहायला त्याचे दूत पिटाळले.पण कसचं काय नि कसचं काय सगळ्यांचे सगळे प्रयत्न थकले, तो बहिरी ससाणा त्याची जागा सोडेल तर शपथ.शेवटी राजाने हि कामगिरी त्याच्या दरबारातील लोकांवर सोपवून दिली.दुसऱ्या दिवशी सहजचपणे राजाचे लक्ष त्याच्या खिडकीतून बाहेर गेले असता,तो बहिरी ससाणा त्याच्या फांदी वरून तसूभर सुद्धा हलला नसल्याचे त्याने पुन्हा बघितले.त्या ससाण्याने त्याच्या जोडीदारा सोबत आकाशात विहार करावा ह्या साठी केलेले सगळे प्रयत्न आता संपले.आपल्या राज्यात एवढी साधी कामगिरी पार पाडायला आपल्याला एकही माणूस मिळत नाही, ह्या विचाराने अस्वस्थ होत हळूहळू राजाच्या रागाचा पारा चढला,नि तो जवळ जवळ ओरडलाच कि "कोण आहे रे तिकडे ? जा... नि त्वरित एखाद्या शेतकऱ्याला घेऊन या ..."
राजाने असा विचार केला कि निसर्गाच्या सान्निध्यात असलेला एखादा शेतकरी कदाचित ह्या वर काही उपाय काढू शकेल म्हंणून....
राजाने असा विचार केला कि निसर्गाच्या सान्निध्यात असलेला एखादा शेतकरी कदाचित ह्या वर काही उपाय काढू शकेल म्हंणून....
अन दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर राजा बघतो तर काय ? तो ढिम्म बहिरी ससाणा,आज,राजवाड्याच्या बागेवर आकाशात उंचच उंच मस्त पैकी भरारी घेत होता.आश्चर्यचकित होत राजाने त्वरित "केवळ एका दिवसात हि जादू करणाऱ्या "त्या व्यक्तीला" लगेच माझ्या समोर घेऊन या " असे फर्मान सोडले.
राजाच्या सेवकांनी त्या शेतकऱ्याला शोधून काढून त्वरित राजा समोर उभे केले.कुतुहूलमिश्रित नजरेने पहात,राजाने त्यास विचारले कि," तो बहिरी ससाणा आकाशात उडण्यासाठी तू नक्की काय केलेस ?
शेतकऱ्याने मान खाली घालत राजाला सांगितले कि ," काही केले नाही महाराज ,फार सोप्पं होत ते !फक्त तो बहिरी ससाणा ज्या फांदीवर बसला होता ती फांदी मी कापून टाकली."

मित्रांनो,
खरे तर,आपण सगळेजण सुद्धा,आपआपल्या आयुष्यात अशी उंच भरारी घ्यायची क्षमता बाळगून असतो,प्रत्येका मधेच काही ना काही गुण हे ठासून भरलेले असतात.कमतरता संधीची नसते पण आपण "फांदी" सोडायचे नाव घेत नाही.कारण ती आपल्या सोयीची असते.अन त्या मुळेच आपल्यातल्या कित्येकांचे कित्येक गुण हे जगा समोर येणे तर दूर,खुद्द त्यांना स्वतःला सुद्धा ते कधीच कळत नाहीत,आणि त्या मुळेच आपले आयुष्य किंवा त्यातील बराचसा भाग हा चैतन्याने,उत्साहाने भरलेला रहायच्या ऐवजी,एकसुरी नि कंटाळवाणा होतो.
तेव्हा.. आता फार विचार करत बसू नका..उठा नि "ती" फांदी तोडायला घ्या,आणि "त्या " आकाशाला गवसणी घालण्या साठी सज्ज व्हा.
सौजन्य :From the Book "Why walk when you can fly" by Isha Judd
वरील कथेचा स्वैरानुवाद व त्यातील छायाचित्रे ही आमच्या "जस्टनिफ्टी "ब्लॉगचे सर्वेसर्वा श्री.इलँगो ह्यांचे सौजन्याने.धन्यवाद इलँगो सर.
खरे तर,आपण सगळेजण सुद्धा,आपआपल्या आयुष्यात अशी उंच भरारी घ्यायची क्षमता बाळगून असतो,प्रत्येका मधेच काही ना काही गुण हे ठासून भरलेले असतात.कमतरता संधीची नसते पण आपण "फांदी" सोडायचे नाव घेत नाही.कारण ती आपल्या सोयीची असते.अन त्या मुळेच आपल्यातल्या कित्येकांचे कित्येक गुण हे जगा समोर येणे तर दूर,खुद्द त्यांना स्वतःला सुद्धा ते कधीच कळत नाहीत,आणि त्या मुळेच आपले आयुष्य किंवा त्यातील बराचसा भाग हा चैतन्याने,उत्साहाने भरलेला रहायच्या ऐवजी,एकसुरी नि कंटाळवाणा होतो.
तेव्हा.. आता फार विचार करत बसू नका..उठा नि "ती" फांदी तोडायला घ्या,आणि "त्या " आकाशाला गवसणी घालण्या साठी सज्ज व्हा.
सौजन्य :From the Book "Why walk when you can fly" by Isha Judd
Dear Ilango,
उत्तर द्याहटवा6 months ago you encouraged me to go ahead…Thanks for the guidance and support…. not only in market activity but also in day to day life.Your Saturday-Sunday posts are truly inspiring, Thanks for enriching us…
Hi..Mynac,
उत्तर द्याहटवाYou are doing a great service to "Marathi Community" by bringing home knowledge and wisdom which could be readily adopted.
I'm proud to have known you.
We have many more "branches of fear" to be broken for us to be free and feel the glory of life.
Best wishes.
ilango