अगदी शाहरुख खान सुद्धा त्याच्या लहानपणी,तुमच्या-आमच्या, चारचौघां सारखा अगदी सर्वसाधारणच होता किंवा दिसायचा,कारण मध्यंतरी एकदा सहज फिरत,फिरत बिन्स डॉट कॉम वर पोहोचलो.तेथे हिंदी चित्रपट सृष्टीतील, आटे गेलेल्या नि आटे असलेल्या काही नटांचे बालपणीचे दुर्मिळ फोटो दिसले.अजून आत-आत गेल्यावर पोळपाट म्हटल्यावर जसे लाटणे त्याच्या जोडीने आपसूक येते तशा नट्या पण सापडल्या.खरे तर ते फोटो,केवळ सहज गंमत म्हणून बघण्या पलीकडे आपल्याला त्याचा उपयोग असा काहीच नाही.कारण ती सुद्धा आपल्या सारखी केवळ हाडामासाची माणसेच,पण नंतर त्यांच्या-त्यांच्या कर्तृत्त्वाने नि नशिबाने ते आज जिथे पोहोचले आहेत,त्या मुळेच केवळ ह्या फोटोंचे थोडे कौतुक जास्त.चला तर त्या मुळे हे फोटो जरा नजरे खालून घालुयात तर.......
 |
कंगना राणावत ,तिच्या आई,वडील नि पणजी सोबत |
 |
कतरिना कैफ |
 |
इम्रान खान |
 |
हृतिक रोशन,बहिण नि वडिलां समवेत. |
 |
"यादों की बारात" मधला आमीर खान |
 |
आफताब शिवदासानी |
 |
अमिताभ बच्चन |
 |
असीन |
 |
दीपिका पदुकोन |
 |
इशा देओल हेमा मालिनी नि बहिणी समवेत. |
 |
जेनेलिया |
 |
हृतिक रोशन |
 |
पुन्हा एकदा हृतिक रोशन,या वेळी त्याच्या बहिण नि आई सोबत |
 |
जुही चावला |
 |
करिष्मा नि करीना,त्यांचे आई-वडील..बबिता नि रणधीर कपूर सोबत. |
 |
पुन्हा एकदा त्याच बहिणी - बहिणी. |
 |
प्रीती झिंटा |
 |
राणी मुखर्जी |
 |
राणी मुखर्जी |
 |
संजू बाबा ,आई नर्गिस सोबत |
 |
शाहीद कपूर नि आयेशा टाकिया |
 |
शशी कपूर |
 |
श्री देवी |
 |
सोनम |
 |
सोनम ..पित्या सोबत |
 |
शाहरुख खान |
| |
आणि शेवटी पुन्हा एकदा "बाळबोध शाहरुख " |
फोटो सौजन्य www.binscorner.com
धन्यवाद.
आज रविवार, २ ऑक्टोबर,म्हणजे गांधी जयंती.खरे तर ज्या माणसाने स्वातंत्र्य लढ्यात देशातील दीनदुबळ्या जनते साठी ,अर्ध वस्त्र राहून ,छातीवर गोळ्या झेलल्या नि जिवंतपणीच जो "महात्मा" या पदाला पोहोचला त्या माणसाची आज जयंती.म्हणजे फक्त राजकारणी नि सत्ताधारीच नव्हे तर आम जनतेने सुद्धा ह्या महात्म्याची खरे तर किती आठवण नि जाणीव ठेवली पाहिजे ? पण गेल्या काही वर्षात देशातील एकूणच राजकारण्यांनी ह्या दिवसाचे औचित्य राखणे म्हणजे गांधीजींच्या पुतळ्याला,फोटोला फक्त हार घालून,वंदन करीत कॅमेऱ्या समोर पोझ देणे,निवडणुकीचे औचित्य राखून ह्या दिवशी खाऊचे किंवा तत्सम गोष्टींचे काहीबाही वाटप करणे ह्या पलीकडे काही राहिले नाहीये.त्या मुळे "च्यायला, गांधी जयंती नेमकी रविवारीच आल्याने एक सुट्टी बुडाली" असे सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा वाटले नाही तरच नवल.आणि तसेही गांधीजींना नोटेत नेऊन बसवल्यानंतर ,राजकारण्यांच्या बरोबर जनतेने सुद्धा त्यांना,त्यांच्या विचारांसकट कधीच खिशात घातले आहे.अन त्या मुळेच हे आजचे बिनकामाचे पोस्ट.
उत्तर द्याहटवा