भोज्जा

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

जे.आर.डी.टाटांचे दुर्मिळ पेंटिंग

मध्यंतरी सहजच सर्फिंग करत असता जे.आर.डी.टाटांचे  "एक दुर्मिळ पेंटिंग" पहाण्यात आले. हे चित्र म्हणे त्यांच्या रहात्या घरात ठेवले आहे.कुणा ऐक्या अनामित कलाकाराने हे पेंटिंग जे.आर.डी.टाटांना सप्रेम  भेट दिले होते.हे चित्र दिल्या वर ते नक्की कशाचे चित्र आहे हे कुणाला तसे काही उमगले नाही अशी काही ब्लॉग/साईट  वरील माहिती सांगते,आणि जे.आर.डी.ह्यांच्या निधना नंतर म्हणे त्याचे रहस्य उलगडले असे सांगतात.

तथापि ते बिलकुल पटत नाही.त्या चित्रकाराच्या ह्या अप्रतिम कलाकृतीचा पूर्ण मान राखून,असे अतिशय विश्वासाने सांगावेसे वाटते कि हि कला निश्चितच दुर्मिळ आहे तथापि अगदीच अनोखी वगैरे अशी बिलकुल नाही/नव्हती, कारण पुण्यातील "सकाळ" ऑफिस समोरील श्री आझाद मित्र मंडळाने ह्या चित्रकलेच्या पद्धतीच्या गणपतीच्या चित्राचा देखावा हा फार पूर्वी म्हणजे सुमारे १९७० ते ७५ ह्या काळात सादर केला होता.सदर मंडळाच्या विद्यमान अध्यक्षांची,श्री.अहिरे ह्यांची ह्या संदर्भात भेट होऊ शकली नाही,पण शक्य झाल्यास त्या वेळच्या त्या देखाव्याचा फोटो व त्या कलाकाराचे नाव त्या चित्रा सोबत नंतर नक्की देण्यात येईल.

सदरहू देखाव्यात त्या कलाकाराने,गणपतीचेच चित्र खाली मंचावर काढले होते आणि प्रेक्षक ते चित्र दुरून पाहणार असल्याने,आणि ह्या चित्राची मेख प्रेक्षकांच्या त्वरित लक्षात यावी ह्या हेतूने,त्या कलाकाराने स्टील रॉड ऐवजी,क्रोमियम प्लेटेड असा अर्ध गोलाकृती असा सुमारे सहा फूट उंचीचा पत्रा वापरला होता.ह्या अनोख्या देखाव्याची बातमी "सकाळ "च्या त्या वेळच्या गणेशोत्सवाच्या अंकात छापून आल्याने ,त्या काळी हा देखावा,पुणेकरांनी लांबून-लांबून येऊन बघितला असल्याचे स्मरते.

ते काहीहि  असो.सध्या आपण जे.आर.डी.टाटांचे ते दुर्मिळ पेंटिंग तर पाहूयात !


ह्या चित्रांचे सौजन्य http://kuttus-wallpapers.blogspot.com/ 
धन्यवाद
         

३ टिप्पण्या:

 1. हि घ्या आत्ताच आमच्या एका जेष्ठ सहकाऱ्या कडून समजलेली अजून एक गमतीदार माहिती.१९६८-७० च्या काळात एक फौंटन पेन मिळायचे.ते पेन त्या काळी विकत घेणे हा श्रीमंती थाट होता.त्या पेना सोबत वरील चित्राच्या प्रमाणेच एक चित्राचा कागद देखील मिळायचा,आणि त्या पेनाचे टोपण,सुचनेबरहुकुम त्या कागदावर देखील वरील चित्रा प्रमाणेच ठेवल्यास,ते मूळ चित्रं,त्या क्रोमियम प्लेटेड सदृश टोपणात दिसत असे.

  उत्तर द्याहटवा
 2. हे माहित नव्हते. छान कलेक्शन!

  उत्तर द्याहटवा
 3. सौ.गीतांजली ताई,
  आपल्या प्रतिक्रिये बद्दल नि भेटी बद्दल धन्यवाद.
  आपल्या "सांजवेळ" ह्या ब्लॉगला मी ह्या पूर्वी सुद्धा भेट दिली आहे.मराठी ब्लॉगविश्वात ज्या थोड्याफार गृहिणी,आपले संसारातील व्याप यशस्वीरित्या सांभाळून ब्लॉग लिहितात,त्यातील एक अग्रेसर महिला ब्लॉगर म्हणून आपली आम्हाला ओळख आहे.
  मुळात लेखन हा माझा पिंड नाही ..आणि ललित लेखन वगैरे-वगैरे तर मुळीचच नाही,तथापि पुणेकर असल्याने "शहाणे करुनी सोडावे, अवघे जन " हि पताका आगंतुकपणे खांद्यावर घेतली आहे.:)त्या मुळे,"कुठलीही चौकट आणि फारसे नाविन्य नसणारा",आणि यदाकदाचित जर झाले तर जाताजाता क्वचित थोडेफार प्रबोधन करणारा ब्लॉग असे ह्याचे स्वरूप,बनत गेले आहे.
  आपल्या सारख्या प्रेक्षकांच्या/वाचकांच्या प्रतिक्रिया ह्या हुरूप देणाऱ्या ठरतात यात शंका नाही .धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा