भोज्जा

रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

सोनिया गांधींना ताप का आला ?

नुकताच  ९ नोव्हेंबरला  हृषीकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्गाच्या पायाभरणीचा समारंभ रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी आणि संरक्षण मंत्री ए.के.अँथनी यांच्या हस्ते पार पडला.आधीच्या प्रसिद्धीनुसार  सदरहू सोहळा हा रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत सोनिया गांधींच्या हस्ते करण्याचा काँग्रेस सरकारचा मानस होता.स्थानिक वृत्तपत्रात तशी जाहिरात सुद्धा करण्यात आली.मात्र उत्तराखंडचे मुख्यमंत्री मेजर जनरल (निवृत्त) बी सी.खंडुरी ह्यांच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवलेल्या एका फॅक्सने  सोनिया गांधीना "ताप" आला,नि त्या सोहोळ्यासच  उपस्थित राहू शकल्या नाहीत.

झाले असे कि,.....
मुख्यमंत्र्यांनी  शिष्टाचार संकेतांचा हवाला देत राष्ट्रपती व पंतप्रधानांना असे विचारले कि सदरहू प्रकल्पाचे उद्घाटन हे सोनिया गांधी ह्या कोणत्या अधिकाराने नि काय म्हणून करणार आहेत?कारण घटने नुसार त्या फक्त एका मतदार संघाच्या खासदार आहेत,आणि अशा उद्घाटन समारंभ प्रसंगी जर कुणी कॅबिनेट दर्जाचा मंत्री उपस्थित असेल तर घटने नुसार तो अधिकार त्या मंत्र्याचा असतो.आणि ह्या प्रसंगी,रेल्वे मंत्र्यांचे उपस्थितीत सोनिया गांधी ह्यांचे हस्ते जर उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला गेला तर उत्तराखंड सरकार भारतीय राज्यघटनेची  हि विटंबना खपवून घेणार नाही मग भले त्या साठी त्यांना पोलिसी बळाचा वापर करावा लागला तरी हरकत नाही.अन त्या मुळे म्हणे विमानतळा पर्यंत गेलेल्या सोनियाजी अचानक ताप येऊन माघारी फिरल्या. 
चला ..थोडक्यात काय तर अजून तरी, ह्या देशात नियमांच्या आधारे व्यक्तीमहात्म्याला आळा घालायचा प्रयत्न, कुणीतरी करत आहे.मग भले त्यात पक्षीय राजकारण का असेना...उत्तराखंड सरकारच्या प्रसिद्धीपत्रका मुळे सदरहू वास्तवता लोकांसमोर येण्यास मदत झाली हे हि नसे थोडके......खंडुरी ह्यांचे म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या सोहोळ्यास राजकीय रंग देणे हे पूर्णतया चुकीचे असून ह्या प्रकल्पा साठी ह्या पूर्वी सुद्धा, त्यांनी १९९० साली ते खासदार असताना ह्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता नि त्यांचे एक सहकारी माजी मुख्यमंत्री भगत सिंग कोशियारी ह्यांनी ह्या प्रकल्पाच्या  पहिल्या टप्प्यातील कामाचा खूप पाठपुरावा केला होता परंतु अशाच प्रकारच्या धमाकेदार उद्घाटन सोहोळ्या नंतर १९९७ साली ह्या प्रकल्पावर  हजारो कोटी खर्च झाल्यावर हा प्रकल्प डबाबंद केला गेला होता.त्या मुळे अशा प्रकल्पातून खरोखरची भरीव कामगिरी जेव्हा प्रत्यक्षात समोर येईल तेव्हाच अशा प्रकारचे समारंभ करण्यात यावेत..... बघुयात, भविष्यात तसं काही बघायला मिळेल कि नाही ते ?

 

४ टिप्पण्या:

  1. सदरहू मेल, मला आमचे मित्र श्री.कुमार ह्यांचे कडून आला होता तथापि त्यात त्यांनी रेल्वे मार्गाचे उदघाटन केल्याचे म्हटले होते.तथापि तो फक्त पायाभरणी समारंभ होता असे झी न्यूजच्या साईटवर गेल्यावर समजले.ह्या पोस्ट साठी सदरहू साईटचे व श्री.कुमार ह्यांचे आभार.फोटो सौजन्य नेहमी प्रमाणेच गुगल सर्चच्या इमेजेस वरून साभार....धन्यवाद....

    उत्तर द्याहटवा
  2. चला कुणीतरी आहे या देशात असे प्रश्न उपस्थित करणार .हे हि नसे थोडके?

    उत्तर द्याहटवा
  3. अनामिकाजी,
    खरंय ! निदान कुणी तरी .... चला... हे हि नसे थोडके.
    आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  4. खरे तर "काँग्रेस "चे असंख्य निस्सीम चाहते आहेत ,अन ते हि काँग्रेस न आवडता.
    राजकारण हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून गेली किमान सहा दशके ह्या देशावर राज्य करणे अन ते हि फार काही एक करामत/क्रांती न करता, हे येरा गबाळ्याचे काम नाही. पब्लिक मेमरी हि शॉर्ट लिव्ह्ड असते हे मर्म अतिशय अचूक जाणून,त्याचा वारंवार पण अतिशय खुबीने वापर तो हि योग्यवेळी करणे हे खरे तर विरोधी पक्षांनी त्यांचे कडून शिकावे. अगदी कालचेच उदाहरण घ्या ना... "उत्तरप्रदेशची सत्ता एकदा आमचे हातात देऊन बघा...नि नंतर आम्ही तेथे कसा कायाकल्प घडवून आणतो ते बघा " ह्या सदृश विधान हे फक्त काँग्रेसवालेच,बिनधास्त,बेधडक नि छातीठोकपणे करू शकतात कारण त्यांना हि खात्री असते कि गेल्या ६४ वर्षातील ५५ वर्षे तेथे "आपणच" सत्तेत होतो हे लोक एव्हाना ठार विसरले आहेत. आहे कि नाही गम्मत ?

    उत्तर द्याहटवा