भोज्जा

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

शेयर बाजार कसा चालतो ? तर असा :)

शेयर बाजार हा  समजायला,रुचायला नि पचायला तसा ही अवघड विषयच आहे,नि बाजारातील मराठी माणसाचा सहभाग पाहता शेयर बाजार नि मराठी माणसाचे विळ्या भोपळ्याचे सख्य आहे,असे म्हटले तर तितकेसे वावगे ठरणार नाही.बाजारातील होणाऱ्या व्यवहारांची व्यवस्थित माहिती नि स्व-अभ्यास  नसेल तर येथे तुमच्या चुकीला माफी नाही,कारण येथे रोजच्या रोज दुपारी साडे तीन वाजताच तुमच्या हुशारीचे मूल्यमापन  केले जाते,आणि ते ही अगदी रोख स्वरुपात.

अर्थव्यवस्थेचे अतिरंजित प्रतिबिंब वेळे अगोदरच वेळप्रसंगी बाजारात  दिसून येते असे म्हणतात कारण ती शेयर बाजाराची खासियतच आहे.बाजाराने दुरून जरी लवंग पहिली तरी ती त्यास उष्ण पडते नि वेलदोड्याच्या नुसत्या वासानेच बाजाराला हुडहुडी भरते,हे अनिवार्य कटू सत्य आहे.रावाचा रंक नि रंकाचा राव करण्याची क्षमता ज्या व्यवसायात ठासून भरली आहे,तेथे तुमच्या गरम खिशा सोबतच तुमच्या "खरोखरच्या कणखर मानसिकतेची,स्व-अभ्यासाची येथे पदोपदी परीक्षा घेतली जाते.

धर्मराजाच्या द्यूता मुळे महाभारत घडले हे माहित असूनही,माणसामधील उपजत जुगारी प्रवृत्तीला लगाम घालणे हे केवळ अशक्य आहे.त्या मुळे सर्वसामान्य सरळमार्गी लोकांनी त्या पासून चार.... नव्हे, चाळीस हात दूर राहणे हितावह असते असे म्हणतात ते खोटे नाही.ह्या पोस्ट सोबतच्या  व्यंगचित्रात शेयर बाजारातील सट्टेबाजांची मानसिकता व त्यांचे व्यवहार हा विषय व्यंगचित्रकाराने थोडा अतिरंजित पण अतिशय खुबीने मांडला आहे.चला तो  आधी पाहून घेऊयात नि मग हा विषय फक्त "आजच्या पुरताच" थोडा अजून पुढे नेऊयात...


काल बाजाराने गेल्या दोन वर्षातील नीचांकी पातळी दाखविल्याने शेयर बाजाराची दिशा प्रत्येक वेळी अचूक ओळखणे हे किती सोपे आहे हे खालील फोटो वरून आपल्या त्वरित लक्षात येते..:)
फोटो सौजन्य : आमचे शेयर बाजारातील अतिशय अभ्यासू मित्र श्री.दिनेश ऋषी, ह्यांचे.धन्यवाद  D R
आणि हे एवढे रामायण ऐकून ही शेवटी रामाची सीता कोण ? हा प्रश्न अनुत्तरीतच रहातोय,आणि त्या मुळेच  ज्यांना कुणाला ह्या विषयाची थोडीफार आवड,सवड,वेड किंवा उत्सुकता असेल त्यांनीच ह्या पुढील चार्टस पहावेत हे आग्रहाचे सांगणे...
 चार्ट सौजन्य : १) ADVFN .Com आणि २) ३) ४) च्या चार्ट साठी श्री.इलँगो ह्यांच्या जस्ट निफ्टी ब्लॉगचे सहकार्य घेतले आहेत.मनःपूर्वक धन्यवाद श्री.इलँगो सर  ......

टीप : अनायसे ह्या पोस्ट प्रसिद्धीचे वेळीच काल मार्केट पडल्याने,अभ्यासू वाचकांना थोडा दिलासा व थोडी अभ्यास पूर्ण माहिती देण्याचा हा मी प्रथमच प्रयत्न केला आहे.जर यदाकदाचित ४६४० हा कालचा लो निफ्टी ने तोलून धरला तर जिज्ञासू नि अभ्यासू वाचकांना महिन्याच्या (१ नं)चार्ट वरून नजीकच्या काळातील निफ्टीच्या अडथळ्याच्या अंदाजांचा पडताळा घेता येईल असे वाटते.मार्केट हे सदैव अनाकलनीय असते/असू शकते ह्याची आपल्या सर्वांना सदैव जाणीव आहे/असते हे येथे गृहीत धरले आहे. शुभेच्छा.             

८ टिप्पण्या:

 1. मित्रांनो,
  हे पोस्ट वाचल्या नंतर जर आजच्या निफ्टीच्या वाटचाली कडे सहज म्हणून बघितले तर लक्षात येईल कि निफ्टी आज हि कॉमेंट प्रसिद्ध होई पर्यंत पुन्हा ४६४० पर्यंतच स्पर्श करून पुन्हा ४७०० च्या वर ट्रेड करावयास लागली आहे.मुळात कालचा निफ्टीचा व्हॉल्यूम बघितला तर त्यात ४६८५ ते ४६४० ह्या क्षेत्रात जास्तीत जास्त मोठ्या सौद्यांचे ट्रेड झालेले होते.त्या मुळे ४६४० पर्यंत निफ्टीस निदान सध्या तरी सपोर्ट आहे अस आत्ताचे तरी चित्र आहे.
  आत्ता तूर्तास हे म्हणणे तसे थोडे धाडसी ठरेल तरी हि ह्या महिना अखेरी कालचे व आजचे निफ्टी मधील सौदे आणि निफ्टी ची ओव्हरसोल्ड कंडीशन व एक्सपायरी पाहता निफ्टी ४७७५चे जवळ किंवा वर बंद होईल असे तूर्तास दिसते/वाटते. बघुयात.
  निफ्टी सध्या डाऊन ट्रेंड मध्ये असल्याने लाँग टर्म ट्रेंड मध्ये मात्र इतक्यात कोणताही बदल संभवत नाही.

  उत्तर द्याहटवा
 2. Hi..Mynac,

  Even after viewing the above tow pictures many times over, we still get a "hearty laugh" reading and seeing them.

  It relieves all the tension of buys to byes and sell to sail... :)

  Your OI analysis at the start of the month was a "Bull's eye".

  It is being missed lately.

  Come whenever time permits.

  And good luck and best wishes.

  ilango

  उत्तर द्याहटवा
 3. Dear Ilango,
  Thanks for your visit and comment.Now,as the expiry battle is over,in the evening,I am going to see the O.I. data and shall definitely try to share my views..Thanks for your encouragement,guidance and above all.... your daily updated TT file..

  उत्तर द्याहटवा
 4. टिप्पणी पोस्ट करा

  Good Initiative Keep it up !!!!!!!

  उत्तर द्याहटवा
 5. Dear Dineshbhai,
  Thanks for your visit and comment thereafter.Thanks for your encouragement.

  Dear Friends,
  Dineshbhai alias DR is the most and only one disciplined trader I have ever seen in Indian market.As he is special his way of thinking is very special...He does not believe in shorting the market.He is the only real disciplined Bull from Indian Stock market I have ever seen.Just have a look at his profile...what he says about himself ?

  "I am a full time Professional Technical Analyst and trader in the Indian Stock & Commodity markets. Achieved Technical Analysis certificate from National Stock Exchange of India, Ltd., and Manipal Education . Successfully Analyzing market Trend with statistical and analytical skills since 2005. I Trade Like investor and have developed a Mechanical Swing Trading Strategy Known as DRSAR. My Friends know me for my Disciplined Trading. Discipline in each and every step of my life is my nature as I served for 20 years in Indian Air Force.
  I have the Best of Every Thing
  The interested fellows must visit his blog for learning purpose...Following is the link
  http://potsupdate.blogspot.com/

  उत्तर द्याहटवा
 6. संदीप साहेब,
  नमस्कार.
  आपल्या सारख्या शेयर बाजारातील अभ्यासू विश्लेषकाने येथे भेट देऊन,पाठीवर कौतुकाची थाप दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
  ह्या ब्लॉगच्या वाचकांना श्री.संदीप साठे साहेबांची नव्याने ओळख करून देण्याची अजिबात गरज नाही.कारण कामा निमित्त सौदी अरेबियात राहत असून सुद्धा सर्व सामान्य मराठी माणसाला शेयर बाजारातील धोके सांगण्या बरोबरच त्याच्या मनातील शेयर बाजार विषयीची भीती काढून टाकून त्याच्या जागी आत्मविश्वास जागविण्या साठी ते त्यांचा पूर्णपणे शेयर बाजार ह्या विषयाला वाहिलेला ब्लॉग लिहित आहेत.माझ्या माहितीत तो ह्या विषयाला वाहून घेतलेला एकमेव क्वालिटी ब्लॉग आहे. त्याची लिंक पुढील प्रमाणे. http://marathishare.blogspot.com/ शेयर बाजार ह्या विषयाची उत्सुकता,आवड नि जिज्ञासा असणाऱ्या वाचकांनी तेथे जरूर भेट द्यावी असे आग्रहाचे सांगणे.

  उत्तर द्याहटवा