भोज्जा

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

कॉपी-पेस्ट

एकदा एका वक्त्याने आपल्या भाषणात सांगितले कि,
"माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे हि ज्या बाईच्या बाहुपाशात गेली ती स्त्री माझी पत्नी नव्हती "
त्यांच्या ह्या वाक्याने श्रोते स्तब्ध झाले. सर्वत्र शांतता पसरली.

"तर ती माझी आई होती "

ह्या त्याच्या नंतरच्या खुलाशाने सर्व सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात आणि हास्य सागरात बुडून गेले.

एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने हा किस्सा संध्याकाळी त्याच्या घरी सांगण्याचे योजले.
३-४ पेग झाल्यावर ,रात्री त्याने स्वयंपाकघरात असलेल्या त्याच्या बायकोला हा किस्सा जरा मोठ्या आवाजातच सांगायला सुरुवात केली.कि,
"माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे हि जिच्या बाहुपाशात गेली आहेत ती स्त्री तू नाहीये, तर .... "
हे बोलून तो स्तब्ध झाला,
वातावरणात अचानक एक विचित्र शांतता पसरली.
उठून उभे राहायचा प्रयत्न करत,किश्श्याचा पुढील भाग आठवायचा त्याने खूप प्रयत्न केला,पण त्याच्या त्या वेळच्या अवस्थे मुळे,काही केल्या तो त्याला आठवेना शेवटी बरळत-बरळत  त्याने सांगितले कि, 
"त्या दुसऱ्या बाईचे नाव मला, आत्ता मात्र आठवत नाहीये "
जेव्हा तो शुद्धीवर  आला तेव्हा त्याने स्वतःला उकळत्या पाण्यामुळे भाजलेल्या जखमांमुळे हॉस्पिटल मधील कॉटवर बघितले.
  तात्पर्य:
 don't copy ,if you can't paste    
फोटो सौजन्य : Avery Carlton,www.flickr.com  



























ह्या पोस्टचे सौजन्य सौ.सुजाता ह्यांचे कडून मला आलेला एक मेल.

७ टिप्पण्या:

  1. सौ.सुजाता ह्यांचे कडून आजवर आलेल्या मेल मधील काही निवडक मेल हे मी आजवर येथे अगदी कॉपी पेस्ट जरी करत नसलो तरी त्याचा स्वैरानुवाद अथवा त्याचे मराठीकरण,हा जणू येथील बऱ्याचशा पोस्टचा अपरिहार्य घटक असतो. त्या मुळे ह्या मेलचे मराठी कॉपी पेस्ट मी येथे केले नाही तरच ते नवल.त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता,वाचकांचा/प्रेक्षकांचा मी अत्यंत आभारी आहे.
    तथापि ऋणनिर्देश न करता ती गोष्ट स्वतःच्या नावावर खपविणे हा काहींचा स्वाभाविक मनुष्यस्वभाव असतो.
    आपले काही राजकारणी लोक तर ह्या क्षेत्रात महावस्ताद.जोसेफ गोबेल्सच्या त्या प्रख्यात वचनातील फक्त पहिले नि शेवटचे ते वाक्यच ते इतक्या खुबीने आजवर कॉपी पेस्ट करत आले आहेत कि त्याला इतर तरी काय करणार?
    “If you tell a lie big enough and keep repeating it, people will eventually come to believe it. The lie can be maintained only for such time as the State can shield the people from the political, economic and/or military consequences of the lie. It thus becomes vitally important for the State to use all of its powers to repress dissent, for the truth is the mortal enemy of the lie, and thus by extension, the truth is the greatest enemy of the State.”
    वरचे हे जोसेफ गोबेल्सचे वचन आणि खालचे हे आपल्या बहुसंख्य राजकारणी लोकांचे वचन.
    “If you tell a lie big enough and keep repeating it, people will eventually come to believe it......and thus by extension, the truth is the greatest enemy of the State.” :)

    उत्तर द्याहटवा
  2. हर्षद ,
    तुझ्या आडनावा वरून मला डायरेक्ट सलीम-जावेद- जोडीचा "दीवार" आठवला आणि त्यातील अमिताभने "शामंत साब"म्हणत चुरगळून टाकलेला सिगार आठवला अन "त्या" तंत्राचा ह्या पोस्टशी हा एक बादरायणी संबंध.)
    ह्या "हा हा हाः" चे हकदार "सलीम-जावेद"चे कथानकात तो जे शेवटचे धक्का तंत्र वापरायचा "ते" आहे,किंवा त्या पेक्षा हि थोडे पूर्वीच्या काळात गेले तर खरे हे श्रेय हिचकॉकचे आहे.चित्रपटाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांसमोर सस्पेन्स उघड करून सुद्धा पुढचा तास सव्वा तास त्याला खुर्चीत खिळवून ठेवणे हे असामान्य आहे.जी हिचकॉक ची खासियत होती.
    खरे तर हा इंग्रजी मेल बऱ्याच जणांनी ह्या पूर्वी सुद्धा वाचला असायची शक्यता आहे आणि हे पोस्ट "कॉपी-पेस्ट" किंवा त्या विषयाशी संबंधित असणार हे त्याच्या शीर्षका वरून आपल्या आधीच लक्षात येते तथापि शेवटच्या वाक्या पर्यंत आपली उत्सुकता निदान काही प्रमाणात टिकून राहते,हे त्या मूळ किस्साकर्त्याचे संपूर्ण श्रेय आहे.अन त्या मुळेच माझ्या सुद्धा ह्या भिंतीला तुमड्या... :) धन्यवाद..

    उत्तर द्याहटवा
  3. हे बघा धडधडीत उदाहरण.मला सुद्धा धड PASTE करता आले नव्हते:)
    धन्यवाद अनामित.आपली सूचना त्वरित अमलात आणली.

    उत्तर द्याहटवा
  4. अगदी बरोबर आहे कॉपी केल्यावर पेस्ट करता आले पाहिजे.
    मला एक सांगा तुम्ही एवडे मराठीमध्ये कसे काय लिहू शकता.
    मला तर फारच अवघड जाते.

    उत्तर द्याहटवा