भोज्जा

सोमवार, १६ मे, २०११

पेट्रोल दरवाढ...व्यंगचित्र रूपाने

आताशा पेट्रोलची दरवाढ हा विषय खरे तर अनपेक्षित किंवा धक्कादायक वगैरे बिल्कुल राहिलेला नाहीये.आंतर्राष्ट्रीय बाजारातील पेट्रोलची वाढती किंमत,देशांतर्गत पेट्रोकेमिकल कंपन्यांची वाढती वित्तीय तूट ह्या वास्तवाचा केवळ तत्कालीन सरकारने पुरेशी खबरदारी घेऊन जर योग्य वेळी सामना केला नाही तर ह्या गोष्टी अपरिहार्य असतात.खरे तर प्रत्येक पक्ष हा प्रथम सत्ता मिळविणे नि नंतर ती टिकविणे ह्यासच प्राधान्य देत असतो,त्या मुळे वित्तीय तुटीचा जेव्हा अगदी कडेलोट व्हायची वेळ येते तेव्हा हे कटू निर्णय हे घ्यावेच लागतात.आपण सर्व सामान्य जनता हि भाबडी(बावळट),निरागस (मूर्ख) असल्याने ह्या दरवाढीस सरकारच्या सांगण्या नुसार "फक्त" आंतर्राष्ट्रीय बाजारातील पेट्रोलच्या  वाढत्या किंमती वर अज्ञाना पोटी विश्वास ठेवून मोकळे होतो,नि सरकारी यंत्रणेच्या योग्य वेळी योग्य निर्णय क्षमतेच्या नाकर्तेपणा मुळेच होणारी वाढती वित्तीय तूट,त्या मुळेच वाढणारा महागाई दर वगैरे सोयीस्कररित्या  विसरून जातो. चला तर मग ह्या वेळी सुद्धा तेच करू... फक्त व्यंगचित्र रूपानेही सर्व व्यंगचित्रे गुगल वरून घेतलेली आहे.मी येथे फक्त त्याचे मराठीकरण (स्वैरानुवाद) करून संकलन नि संपादन करण्याचा एक प्रयत्न केला आहे. इतकी सुंदर व्यंगचित्रे नि ती सुद्धा "पेट्रोल दरवाढ " ह्या स्फोटक विषयावर हे फक्त "व्यंगचित्रकारच" काढू जाणे,त्या मुळेच ज्या-ज्या व्यंगचित्रकारांची ही चित्रे आहेत त्यांना मनापासून धन्यवाद.       

५ टिप्पण्या:

 1. व्यंगचित्रे हा मराठी माणसाचा आवडीचा नि जिव्हाळ्याचा विषय आहे.कोणत्याही विषयाकडे मिश्कील नजरेतून बघण्याचे नि प्रसंगी गहन विषय सुद्धा व्यंगचित्रांच्या माध्यमातून उपरोधिकपणे हाताळण्याचे व्यंगचित्रकाराचे कौशल्य वाखाणण्या सारखे असते.अशा प्रकारचे पोस्ट कदाचित सगळ्यांना आवडू शकेल असा एक कयास आहे.हळू हळू दर्जेदार व्यंगचित्रे मराठी मधून लुप्त होत चालल्याने ह्या पोस्टच्या निमित्ताने त्यास एक उजाळा देण्याचा हा फक्त एक प्रयत्न आहे.धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 2. व्यंगचित्रे छान आहेत. पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल लागले कि लगेच पेट्रोलची दरवाढ आमच्या मानगुटीवर. पण हि परिस्थिती बदलणार कशी ? आता जे सरकार आम्हाला निम्म्या किमतीत पेट्रोल देईल त्यांनाच सत्तेवर आणणाव. पेट्रोल दरवाढीला आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती पेक्षा आमच्या सरकारने लादलेले कराच अधिक कारणीभूत आहेत.

  उत्तर द्याहटवा
 3. शेंडगे साहेब,
  नमस्कार नि स्वागत."जे सरकार आम्हाला निम्म्या किमतीत .........." आवडले.कल्पना खरंच छान आहे.खरोखर जर,सत्तारूढ पक्षाने मग ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी जरी अगदी थोडी जरी लोकाभिमुख कामे करावयाचा प्रयत्न केला तर काय होऊ शकते हे आपण यु.पी.ए. सरकारच्या बाजपेई सरकारच्या काळात अनुभवले आहे.येथे त्या सरकारचे गोडवे गायचा तिळमात्र हेतू,उद्देश नसून त्या काळात मोठ्या उत्साहात त्यांनी केलेल्या राज्यकारभाराची आठवण आहे.फक्त त्या "लोकांच्या"सरकार मधील अति लोकशाही पद्धती मुळे संबंधित नेत्यांनी घेतलेले अति व्यक्तीस्वातंत्र्य त्यांच्या पतनास कारणी भूत ठरले.उठसुठ अगदी गल्लीतील छोटा मोठा तथाकथित स्वघोषित नेता सुद्धा मिडीया समोर मुक्ताफळे उधळतांना दिसायचा.खरे तर जमाना हा जाहिरातबाजीचा होता नि आहे पण त्यांना खरोखरची "कामे करून देखील तेव्हा त्याची व स्वतःची व्यवस्थित जाहिरात करता आली नाही.त्यांनी फाजील आत्मविश्वासात हातातील सत्ता गमावली. निवडणुकीत त्यांनी जनतेला गृहीत धरले.खरे तर काँग्रेस राजवटीला जे ५३ वर्षात जमले नव्हते ते त्यांनी फारसे चांगले बहुमत नसून सुद्धा ४ वर्षात केले होते.निदान शहरी भागा पासून त्यांनी सुरुवात तर केली होती पण लोकांना इतकी घाई झाली होती कि केवळ ग्रामीण भागा कडे त्यांना त्या वेळी तितकेसे लक्ष देता आले नव्हते ह्याचे काँग्रेसने भांडवल करून त्यांच्या हि ध्यानीमनी नसतांना ते सत्तेत आले होते.लॉटरी लागणे कशाला म्हणतात त्याचे हे भारतीय राजकारणातील ज्वलंत उदाहरण असेल.ज्योतिष ह्या विषयाचा मला व्यक्तिगत बिलकुल गंध नाही पण ,ज्योतिषांच्या मते भारतीय राजकारणात कॉंग्रेसची पत्रिका इतकी बलवान आहे कि इतर कोणी हि किती हि आपटली तरी ते स्वबळावर सत्ता स्थापन करू शकणार नाहीत असे इतरांचे ग्रहमान आहे असे एक मत आहे.
  पक्षांतर्गत शिस्त म्हणजेच "मुग गिळून गप्पं बसणे" ही कला अगदी छोट्या काँग्रेस कार्यकर्त्याला सुद्धा इतकी सुरेख अवगत आहे कि,अगदी त्यांच्या एखाद्या मोठ्या नेत्याच्या गडबडी,भानगडी,आर्थिक घोटाळया बाबत अगदी सर्व प्रकारच्या मिडीया मध्ये बोंबाबोंब होत असलेल्या बाबी बद्दल सुद्धा कोणालाही कोणताही प्रश्न विचारला तरी "ते माझ्या पहाण्यात,वाचण्यात,बघण्यात आले नाही,नि मी "त्या" दृष्टीने खूपच छोटा कार्यकर्ता असल्याने ह्या वर काहीच बोलू शकत नाही,किंवा ते त्यांचे व्यक्तिगत मत असू शकेल,किंवा आमचे पक्षश्रेष्ठी योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील"असे त्याचे ठराविक उत्तर असते.ह्याला म्हणतात राजकारण नि ह्याला म्हणतात "पक्ष शिस्त".त्या मुळे आपण जर बारकाईने बघितले तर ज्या ज्या पक्षात,ज्या ज्या वेळी नि ज्या ज्या राज्यात अशी पक्षांतर्गत "हुकुमशाही" अंमल होता किंवा आहे तेथे ते ते पक्ष सत्ता सहजगत्या राबवितांना दिसतात.त्या मुळे खरे तर आपल्या सारख्या अगदी सर्व सामान्य नागरिकाला सुद्धा समाजणाऱ्या"ह्या" साध्या साध्या गोष्टींचा जेव्हा विरोधी पक्षातील लहान थोर मंडळींच्या डोक्यात उजेड पडेल तेव्हाच काही फरक तो सुद्धा जर काही पडायचा असेल तर तो पडेल अन्यथा गाढवा पुढे वाचली गीता ,कालचा गोंधळ बरा होता असंच फक्त म्हणायचं नि काय?

  उत्तर द्याहटवा
 4. सौ.सुजाता ह्यांनी ह्या पोस्ट वर पाठविलेला मेल..
  "कृपा करके यहाँ धुम्रपान ना करे!
  आपके जिन्दगीकी कोई कीमत हो या ना हो, पेट्रोल की कीमत ६८.८३ रुपये प्रति लीटर है!इंधन बचाओ!

  उत्तर द्याहटवा
 5. आज २३ मे २०१२ म्हणजे हे पोस्ट,आज पासून बरोब्बर एक वर्ष नि एक आठवडा पूर्वीचे....आणि आज फक्त वर्षभरात पेट्रोल ८० वर जाऊन थडकले....
  ये हुई ना बात ?
  अन तरी ही वेडी जनता सरकारला,पंतप्रधानांना उठसूठ नावे ठेवते...ती ही उगाच. .....ते सांगताहेत ना ? कि यंदा चांगली प्रगती आहे... सगळ्या गोष्टीत वाढ आहे... मग पेट्रोल,डीझेल वगैरे किरकोळ,बिनकामाच्या गोष्टी कशा मागे राहतील ? त्यांना जरा समजून घ्या... त्यांना अजून संधी द्या... "देशाच्या विकासा साठी....प्रगती साठी..... महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करण्या साठी ... किमान पुढची ५ ...नव्हे.... १० वर्षे तरी.... नाही-नाही किमान १५-२०-२५ वर्षे तरी.... जाऊ द्या ना राव त्या निवडणुकाच कशाला घेता?

  उत्तर द्याहटवा