भोज्जा

रविवार, १० एप्रिल, २०११

चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? तर येथे भेटा....

या नोकरीत "वाचण्या" सारखं काहीच नाही,आपल्यातल्या टॅलंटला इथे कितपत वाव आहे हे ज्याचे त्यांनी आपापलेच  ठरवायचे आहे. विश्वास बसत नसेल तर बघा...... आणि वाटलं... तरच फक्त अप्लाय करा.








                        
 नोकरी जरा अवघडच आहे !!!...  नाही का?
 सौजन्य सौ.सुजाथा

७ टिप्पण्या:

  1. मित्रांनो ,
    माझी वरील हीच पोस्ट जर तुम्हाला पुन्हा एकदा गम्मत म्हणून बघावयाची असल्यास या वेळी कृपया येथे न येता http://heera4ulove-mangeshjadhav.blogspot.com/ ह्या ब्लॉग वर जावे.
    श्री. जाधव साहेब अहो किमान " मला आवडलेले काही" ह्या टायटल खाली जरी तुम्ही आत्ता जशी हि पोस्ट तुमच्या ब्लॉग वर ....जशीच्या तशी टाकलीत तशी टाकली असती ना तरी हि निदान दिसायला छान दिसले असते. मी हे अस म्हणत असल्या मुळे कदाचित आपल्याला असे वाटेल कि मी रागावलो आहे,आतून चिडलो आहे वगैरे वगैरे. पण... अं ...हं.....मुळीच नाही. अहो मी सुद्धा इतका जीनियस,हुशार,स्कॉलर ह्या कॅटेगिरीतला बिलकुल नाहीए .मी सुद्धा मला अशाच माझ्या मित्र मैत्रिणी कडून आलेल्या मेलचा अनुवाद करून,त्याची त्यातल्या त्यात बऱ्यापैकी माडणी करून त्या वाचकां पुढे ठेवतो. प्रत्येक वेळी त्यांचा "ऋणनिर्देश" करून.तें हि केवळ नेहमीच्या पोस्ट पेक्षा काही तरी वेगळ म्हणून.... कारण मुळात मी स्वतः फार गंभीर-बिम्भिर प्रवृत्तीचा नाहीये नि लेखक बिखक तर नाहीच नाही.. खरे तर मी तें..... म्हणजे ऋणनिर्देश... वगैरे काही हि सोपस्कार अजिबात पाळले नाहीत नि आपल्या मराठीत बोलायचं तर त्यांना अगदी कोल्ल,तरी त्यांना काहीच तपास लागणार नाहीये कारण ही ब्लॉगिंग सामुग्री पुरविणाऱ्या पैकी कुणाला म्हणजे अगदी कुण्णालाही ही मराठीतलं ओ का ठो म्हणून कळत नाही.....पण...... नाही तें एथिक्सला धरून होत नाही.काही एथिक्स हे पाळायचेच असतात.
    एक उदाहरण देतो...... एखादी तरुण स्त्री/मुलगी तिच्या घरात तिला कुठेसे बाहेर जायचे आहे म्हणून स्वतःचे कपडे बदलत ,साज शृंगार करतेय.... तिला माहित नाहीये कि त्या रूमची खिडकी चुकून उघडी राहिलीये नि कोणी आपल्याला ह्या अवस्थे मध्ये बघू शकेल ,त्या मुळे ती गाफील आहे.नि आपल्या कामात मग्न आहे.तुमचे सुद्धा चुकूनच का होईना पण तिकडे लक्ष गेले.आता इथे तिची नाही तर तुमची कसोटी सुरु होते.कारण सुंदर तरुण स्त्री/मुलगी अशा अवस्थेत .....तुम्हाला मोह हा होणारच कि च्यायला तेवढ तर तेवढंच .घ्या बघून...हि झाली "प्रकृती",
    ..................नेमका हा सगळा तुम्हाला विदाउट तिकीट शो बघायला मिळत असतानाच मधेच वाऱ्याने तिच्या रूमची खिडकी काहीशी लागते नि तुमचा रसभंग होतो .... तुम्ही ...आता तुम्हाला काही दिसत नसताना सुद्धा वाकून,झोकून देऊन बघायचा प्रयत्न करता हि झाली "विकृती."
    नि तुम्ही तिला त्या अवस्थे मध्ये पाहु शकत असताना सुद्धा नि तें हि तिच्या न कळत,तुम्ही तिच्या कडे पाठ फिरविणे किंवा स्वतःची खिडकी बंद करून घेणे हि झाली संस्कृती............. आपण कोणत्या प्रवृत्तीचे आहोत हे ज्याचे त्याने स्वतःशीच तपासायचे असते.नि ठरवायचे असते.

    जाधव सर आपण व्यवसायाने शिक्षक आहात असे आपला प्रोफाईल सांगतो.त्या मुळे झाल तें झाल.किमान ह्या पुढे नको.वाहिली ती गंगा राहिले तें तीर्थ असे समजूयात.आपण "ब्लॉग" ह्या क्षेत्रात नवीन आहात हे लगेच समजून येते कारण त्या पोस्टच्या टायटल वर क्लिक केल्यावर माझ्या पोस्टची लिंक म्हणजेच माझा ब्लॉग येतो.ह्या वरून आपला अननुभव लक्षात येतो.ह्या पुढे माझ्या नव्हे तर दुसऱ्या कोणाच्या ब्लॉग वरील आपणास काही आवडल्यास त्यांच्या कानावर घालून ती गोष्ट करा असे आग्रहाचे सांगणे आहे.जर... पुन्हा माझ्या ब्लॉग वरीलच चुकून काही आवडले तर भले अगदी सांगू नका पण किमान ऋणनिर्देश मात्र करायला विसरू नका. 'जिंदगीमे अगर आपको बडा आदमी बनना हैं,तो छोटी हरकते छोड देनी चाहिये!हा दिलीपकुमारचा अमरीश पुरीला उद्देशून म्हणलेला "सुभाष घईच्या विधाता पिक्चर मधला डायलॉग माझा उगीचच आवडता नाहीये.कारण तो खरच खराय.अहो आपल्या तेंडुलकरलाच बघाना कुठे लांब जायची गरजच नाहीये.२२-२३ वर्षांत कुठ डाग म्हणून नाही.अगदी औषधाला दाखवायला सुद्धा.सुज्ञास अधिक सांगणे न लगे. कारण Some men are wise some otherwise
    आणि Give everyone his due अशा इंग्रजीत म्हणी उगीचच नाहीत.असो.आपणास आपल्या ब्लॉग साठी मना पासून शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. खरे तर वरील ही कॉमेंट ..कॉमेंट नसून एक पोस्टच आहे पण मला हेतू पुरस्सर हा विषय इथेच संपवायचा आहे ,कारण सदरहू गृहस्थ,त्यांच्या फोटो वरून तरुण दिसतात.त्यांचे पुढे भविष्यात अजून बरेच करावयाचे बाकी आहे.असे दिसते नि सर्वात महत्वाचे म्हणजे पेशाने शिक्षक आहेत त्या मुळे ह्या ना त्या कारणाने हा उचलेगिरीचा फार बोभाटा नि बभ्रा नको. खरे तर मी त्यांना ह्याचा निदान जाब नक्की विचारू शकत होतो पण तें ही मी टाळल.जाणीव पूर्वक.त्यांचे हे ब्लॉग चौर्य कर्म मला कळले आहे हे सुद्धा मी त्यांना अद्याप कळवलेले नाही.तें जेव्हा कधी त्यांची ती म्हणजेच माझी पोस्ट क्लिक करतील तेव्हा हे सगळे त्यांना कळेलच अशी आशा आहे.सर्व वाचक ही त्यांना मोठ्या मानाने माफ करतील अशी आशा आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. Hi Mynac

    I am yet to learn Marathi but enjoyed viewing the python hunt. :)

    Best regards.
    rm

    उत्तर द्याहटवा
  4. Dear r m,thanks a lot for your visit here.All together very different business(?) now a days :))strange No?I never thought or imagine that I will or would post so frequently on Marathi Blog but Basically Dear Sujatha,Jay Mam,Sanjay Jayaswaal & AAr VEE are forcing :)) me to post & share these unique posts.I can not prevent myself:))I am very thankful to them because without them it would be not possible & has no meaning too.
    Dont forget ::)) I still remember your "Deharadun Rain" video clip which I like the most & would like to share it here & I am sure Marathi viewers will definitely enjoy it here.... of course with your necessary permission.
    Again thanks a lot for your visit here.

    उत्तर द्याहटवा
  5. Dear mynac
    Glad to know that you are enjoying blogging to the hilt. Keep going!
    You are welcome to use the "Rain video" but don't you think Marathi Manus may have seen too much of rain. :)
    regards.
    rm

    उत्तर द्याहटवा
  6. Dear r m,
    though they have seen and enjoying rain here in every season "the flavor of that video is unique & I AM SURE WHEN "I" LIKE IT..... EVERY ONE WILL DEFINITELY LIKE IT & ENJOY IT BECAUSE IT IS A LIKING OF A COMMON MAN... i.e. MASS.:)) & WHEN THE MASSES ARE WITH YOU..... YOU ARE THE LEADER BECAUSE YOU ARE THE "CORRECT ONE" FOR THEM.

    Thanks a lot.

    उत्तर द्याहटवा
  7. On the contrary up to this moment,it would be possible that many readers,might have clicked your profile and would have enjoyed the rain,when I am commenting here:))Nevertheless enjoying the rain is our goal:)) Thanks and Bye.

    उत्तर द्याहटवा