रोज किमान एक अर्धा तास तरी फिरण्याचा व्यायाम हवाच..आणि हो असं हसता आल तर सोन्याहून पिवळ ! नाही का?
शांत वातावरणात किमान एक १० मिनिट तरी रोज घालविली पाहिजेत .... नाही का? सकाळी उठल्या उठल्या हे वाक्य पूर्ण करायला शिका कि "आज मी अमुक अमुक काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करणार आहे" आयुष्य हे उत्साह,जोम आणि सहिष्णुता ह्याने भरलेले असू द्यात नि तुमचे कुटुंब,मित्र नि विश्वासार्हता ह्यांना जीवनात नेहमी अग्रस्थान असू द्यात. सहा वर्षा खालील नि सत्तर वर्षा वरील आबालवृद्धांसाठी जास्तीत जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करा. जागेपणी सुद्धा तुमच्या स्वप्नांचा सतत पाठपुरावा करा. दिवसभरात किमान २-३ लोकांच्या चेहेऱ्यावर तरी हास्य फुलाविण्याचा प्रयत्न करा. जीवनाच्या शाळेतील तुम्ही एक विद्यार्थी आहात नि अडचणी,कटकटी हा जरी इथला नेमून दिलेला अभ्यासक्रम असला तरी तो बीज गणिताच्या कंटाळवाण्या तासा प्रमाणे संपणारच आहे, तुम्हाला इथल्या प्रत्येक परीक्षेत चांगल्या मार्कानेच पास व्हायचे आहे,नि सर्वात महत्वाचे म्हणजे इथला अनुभव हा कधीच वाया जाऊ शकत नाही. सदैव हसतमुख रहायचा प्रयत्न करा.ह्याने संकटे दूर पळून जातील. सगळ्या गोष्टी जरी अगदी तुमच्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत तरी नाउमेद होऊ नका. हेटाळणीचा सूर हा नकोच ,कारण आपल्यापाशी तेवढा वेळ नाहीये. माझंच खर! हा हेका जरा बाजूला ठेवा.जरा दुसरी बाजू हि समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुमच नशीब दुसऱ्याच्या नशिबा बरोबर घासून बघू नका कारण तुम्हाला त्याच्या आजवरच्या खडतर प्रवासाची अगदी सगळीच माहिती असते असे नाही. जीवनाचा आनंद मनमुराद लुटा,तो राखून ठेवू नका,कारण प्रत्येक दिवस हा "विशेषच" असतो. क्षमाशील व्हा…..रहा..... लोकांचे आपल्या बद्दल काय मत असेल? त्यांना काय वाटत असेल? ह्यांचा विनाकारण तर्कवितर्क करत बसू नका. "काळ" हे सगळ्या गोष्टी वरचे उत्तर आहे. चांगली असो वा वाईट ...परिस्तिथी मधील बदल हा अपरिहार्य नि नैसर्गिक असतो. चांगल्या मित्रांच्या संपर्कात रहा.तुमच्या अडीअडचणीत पहिल्यांदा धाऊन येणारे तेच असतात. खडतर परिस्तिथीमध्ये सुद्धा आपली वाटचाल नेटाने सुरु ठेवा. नाउमेद होऊ नका. तुमच्या कुटुंबाचा विसर पडू देऊ नका. आयुष्यावर स्वार होऊन, त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायला सज्ज रहा. |
मित्रांनो,हा एकूण ३० फोटोग्राफ्स असलेला ई मेल मला आमचे मित्र श्री.कुमार साहेब ह्यांनी पाठविला होता,तथापि आपल्या मराठी वाचकां साठी मी तो २२ फोटोग्राफ्स मध्ये परावर्तित(कन्व्हर्ट ) केला आहे.बघा तुम्हालाही तो आवडतोय का ते !
उत्तर द्याहटवाDear Kumar,
Thanks a lot for sharing such a wonderful email.And waiting for more from you:)
kupcha chan
उत्तर द्याहटवा