"मी मराठी" वर "मराठमोळया गप्पांची काही अंशी पेट्रोल दरवाढ" झाली. माझ्या पेट्रोल दरवाढ...व्यंगचित्र रूपाने ह्या पोस्टचे काही अंशी संकलन करून "विचकट" ह्यांनी ते "मी मराठी" ह्या संकेत स्थळावर गप्पाटप्पा या सदरात प्रसिद्ध केले.
प्रिय मित्र विचकट ,
सप्रेम नमस्कार,
सप्रेम नमस्कार,
माझे पेट्रोल दरवाढ...व्यंगचित्र रूपाने हे पोस्ट आपण "मी मराठी"या संकेतस्थळावर प्रकाशित करून ते जास्तीत जास्त मराठी वाचकां पर्यंत पोहोचवल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार,फक्त सर्व व्यंगचित्रे एका ब्लॉगवर मिळाली होती, तेथे ही खालील प्रमाणे लिहलेले दिसले,ह्या ऐवजी जर माझ्या ब्लॉगचा पत्ता,अथवा ऋण निर्देश करता आला असता तर मला, निश्चित अजून आनंद झाला असता यात शंका नाही,कारण त्या योगे अशी अजून बरीच नेहमी पेक्षा कदाचित वेगवेगळ्या विषयावरील पोस्ट आपल्या संकेतस्थळाच्या मदतीने अजून जास्तीत जास्त लोकां पर्यंत, वाचकां पर्यंत ती पोहोचतील असा विश्वास आहे.
मी सुद्धा कोणी लेखक,कवी अथवा फार कोणी मोठा विचारवंत वगैरे नसल्याने, माझ्या स्वभाव धर्मानुसार माझ्या ब्लॉगवर जेथे जेथे मी एखादे पोस्ट कुणाच्या मदतीने प्रसिद्ध केले असेल त्या त्या पोस्टच्या सोबत त्या त्या साईटचा अथवा व्यक्तीचा ऋणनिर्देश आपणास निश्चितपणे आढळून येईल.तसेच माझ्या ब्लॉगच्या सुरुवातीलाच "मी एका सर्वसाधारण पुणेरी माणसाचे सर्वसाधारण बिनकामाचे निरीक्षण,संकलन,संपादन क्वचित प्रसंगी तिरकस,तिरसट.कोणीही न मागता व्यक्त केलेले,दिलेले मत,क्वचित (म्हणजे असं त्यास वाटतं )प्रसंगी दिलेलें अनाहूत सल्ले (हो अनेकवचनच)आणि बरेच काही नेहमी प्रमाणे बिनकामाचे.पण न जाणो,कदाचित महत्वाचे,"असे जरी नमूद केले आहे,तरीही हे पोस्ट प्रकाशित केल्या नंतर आपण मला जर एखादा नुसता मेल जरी केला असता तर बरे झाले असते असे वाटते.
तथापि,आपणास धन्यवाद.
तथापि,आपणास धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा