भोज्जा

मंगळवार, २९ मार्च, २०११

फरक... ’तेव्हाच्या’ आणि ’आत्ताच्या’ मधील

            १९८३ चे खरोखरचे विजेते अष्टपैलू बोलर्स

वन डे मॅचला आवश्यक असणाऱ्या ईंग्लिश स्पोर्टी खेळपट्ट्या,घरच्या  प्रेक्षकांचा नसलेला दबाव,अपेक्षांचे नसलेले ओझे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खरोखरचे विकेट घेणारे बोलर्स,हे १९८३ च्या विजेत्या संघात विजेते होण्यासाठी असणारे आवश्यक गुण होते. अंतीम सामन्यातील गोलंदाजांचे पॄथक्करण ह्याची साक्ष देते.
११ ओव्हर्स ४ मेडन २१ धावा १ विकेट

१२ ओव्हर्स २ मेडन ३१ धावा ३ विकेट
                                                                 
१० ओव्हर्स १ मेडन २३ धावा १ विकेट

९ ओव्हर्स १ मेडन ३२ धावा २ विकेट

७ ओव्हर्स ० मेडन १२ धावा ३ विकेट

३ ओव्हर्स ० मेडन १२ धावा ० विकेट

खरोखरचे विकेट घेऊ शकणारे थोडेथोडके नव्हे तर ७ बोलर्स,हे कपिलचे "नशीब" होते.संदीप पाटीलच्या वर तर अंतीम सामन्यात बोलिंग करण्याची वेळ सुद्धा आली नाही.













आणि हे या वेळेचे,२०११ चे  
खेळपट्ट्यांनी सुरुवाती पासूनच बोलर्स बरोबर पुकारलेला असहकार,घरच्या प्रेक्षकांचा प्रचंड दबाव,नि त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्या खाली दबलेला संघ,प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट्स कोण काढणार हा सगळ्यांनाच भेडसवणारा यक्ष प्रश्न,हे विजया मधील प्रमुख अडथळे आहेत.

जहीरचा अपवाद वगळता,आत्ता पर्यंत डोळ्यात खुपणारे इतर "बोलर्स"चे अपयश,युवराजच्या बोलींग परफ़ॉर्मन्स मुळे लपले गेलेय.



बघुयात धोनिचे नशीब त्याला आणि भारताला येथुन पुढे कुठे घेऊन जाते ते...

२ टिप्पण्या:

  1. मस्त मांडणी केलीये..

    उत्तर द्याहटवा
  2. अमेय,येथे भेट दिल्या बद्दल आणि प्रतिसादा बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा