भोज्जा

सोमवार, २१ मार्च, २०११

ज्याच्या त्याच्या व्यवसायाचे गणित.


 
आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात खूप काही बघत असतो,अनुभवत असतो पण त्या कडे वेगळ्या नजरेने बघण्यास आपणा कडे न वेळ असतो ना सवड.

सकाळी बस स्टॉप वर बसची वाट पाहत होतो.बस यायला बराच वेळ होता कारण आधीची बस मी स्टॉप वर येता येता समोरून गेली होती त्या मुळे आता चिंता नव्हती. त्या मुळे गर्दी कडे पाहत बसण्या शिवाय पर्याय नव्हता. तेवढ्यात माझे लक्ष तेथे काम करीत असलेल्या कॉर्पोरेशनच्या झाडूवाल्या कडे अनाहूतपणे गेले.त्याला आज त्याच्या खात्या कडुन नवीन खराटा मिळालेला दिसत होता.
आता नवीन खराटा मिळाला ह्यात खरे तर काही विशेष नव्हते पण त्याच्या दॄष्टिने ती गोष्ट मोठी होती.कारण ती त्याच्या उपजीविकेच्या करिता महत्वाची होती,आणि नंतरची १५-२० मिनीटे माझी कशी गेली ते नंतर माझे मला सुद्धा कळले नाही.

प्रथम त्याने तो खराटा मोकळा केला म्हणजेच त्याच्या काड्या मोकळ्या केल्या, साधारण पणे त्या निम्म्या निम्म्या केल्या त्या पुन्हा नीट बांधल्या म्हणजेच एका खरट्याचे त्याने दोन खराटे तयार केले.नंतर गोळा केलेल्या कचऱ्यातुनच कागद आणि प्लास्टिक च्या पिशव्या काढल्या,खिशातून एक काडेपेटि (माचिस) काढली नि त्याने ते कागद नि प्लास्टिक जाळावयास सुरुवात केली.बांधलेला खराटा हाती घेऊन त्याने तो उलट्या बाजूने म्हणजेच होल्डिंग ग्रीप जवळ तो त्या पेट्लेल्या ज्वाळे वर धरला.त्याची टोकदार तुसे काढून टाकायची ही पद्धत मला नक्किच अभिनव वाट्ली.नंतर तो खराटा ज्वाळे वरुन बाजूला करुन,जमिनीवर ठोकुन ठाकून मागच्या बाजूने तो एक सारखा करुन घेतला.नंतर त्याच्या कडा एक सारख़्या फ़ुलवून घेत अनपेक्षित पणे त्यात माती भरली.त्या मुळे तो काम झाल्यावर सुद्धा फ़ुललेला रहाण्यास त्याला मदत होणार होती.
 

थोड्क्यात आपल्या दॄष्टिने किरकोळ बिन कामाची वाटणारी गोष्ट त्याच्या दॄष्टीने आज फ़ार फ़ार महत्वाची होती. थोड्क्यात काय तर प्रत्येकाच्या व्यवसायाचे गणित असते,नि ते फ़क्त तोच जाणू जाणे,जेव्हा तो त्या बोटीतला प्रवासी असतो,आणि सफ़ाई कामगार तो काय आणि त्याच्या कडे कोण नि किती से लक्ष देणार नि त्याच्या वर काही लिहिणे तर खूप लांबची गोष्ट झाली पण त्या कामगाराची तन्मयता,तल्लिनतेने मला त्याच्या कडे लक्ष देण्यास भाग पाडले नि म्हणुनच हा लेखन प्रपंच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा