Bonnie and Jay Thiessens |
अवघ्या २०० डॉलरच्या गुंतवणुकीच्या मशीन शॉप पासून व्यवसायास सुरुवात करून
नंतरच्या काळात आपल्या उद्योगातून दरसाल ५
दशलक्ष डॉलरची उलाढाल करणाऱ्या जय थायसन याने तब्बल काही दशके त्याचे एक *सिक्रेट*
स्वतः पाशीच दडवून ठेवले होते पण त्या
मुळे , तो
मात्र प्रचंड अस्वस्थ होता. अमेरिकेतील एक
यशस्वी उद्योजक, त्यामुळे त्याच्या व्यवसायाचा वाढलेला पसारा आणि त्यातून होणारी प्रचंड उलाढाल याच्या नावाखाली त्याचे ते सिक्रेट अर्थातच आजवर
आपोआपच दडले जायचे हि सुद्धा त्या मागे पार्श्वभूमी होतीच.
दिवसभराच्या नवऱ्याच्या व्यस्त धावपळी
नंतर रोज संध्याकाळी मात्र त्याची बायको
त्याला त्याचा पत्रव्यवहार सांभाळायला तिला जसे जमेल तशी घरातील कामे करून लिव्हिंग रूम मध्ये किंवा जेवणाच्या टेबलवर किंवा वेळप्रसंगी अगदी
बेडवर सुद्धा मदत करायची...होता होईतो या दिनक्रमात थायसन सुद्धा न चुकता कधी खंड पडू द्यायचा नाही
... अगदी रोजच्या रोज तो सुद्धा तिच्या जणू
मागे लागून तो पत्रव्यवहार रोजच्या रोज पूर्णत्वाला न्यायचा.
पण बायकोच्या मदतीने पत्रव्यवहार पूर्ण करायच्या मागचे थायसनचे खरे कारण मात्र
असे होते कि, लौकिक अर्थाने
सुशिक्षित म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या
थायसन्सला कागदावर लिहिलेली कोणतीही गोष्ट वाचता येत नव्हती आणि त्याच्या
बाबतीत ती भयानक वास्तवता होती.
पण थायसन्सच्या कंपनीचा कारभार
प्रगतीपथावर आणि अतिशय समधानकारक होता त्या मुळे त्याच्या अगदी रोजच्या उठण्या बसण्यातल्या त्याच्या बी एंड जे
मशीन टूल्स कंपनीच्या अगदी आतल्या गोटातील त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा
आजवर त्यांच्या मालकाची हि वास्तवता कधी
समजली नव्हती कि, लक्षात सुद्धा आली नव्हती ,हे ही तितकेच खरे होते.
त्याच्या सोबत तब्बल सात वर्षे काम करणाऱ्या जॅक सला याला जेव्हा हि गोष्ट
समजली तेव्हा तर त्याच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.कारण कंपनीच्या कायदेशीर
बाबींच्या पत्र व्यवहारात तू माझ्या
पेक्षा हुशार आहेस असे त्याला थायसन्स नेहमी जे म्हणायचा ते का ? याचे उत्तर त्याला जेव्हा थायसन्सचे हे
सिक्रेट कळले तेव्हा समजले ... कारण त्या
वेळी त्या पत्र व्यवहारातील मजकुरात नेमके
काय लिहिले आहे हे त्या दोघांतील फक्त जॅकच वाचू शकायचा हि त्या मागची वास्तवता
आणि खरे कारण होते हे त्याला आता समजत होते.
थायसन्सच्या वयाच्या ५५ व्या वर्षांपर्यंत त्याच्या जवळच्या अगदी काही निवडक
लोकांच्या व्यतिरिक्त त्याची ही खाजगी बाब कधी जगाला समजली नाही,पण थायसन्सला मात्र प्रत्येक वेळी याची लाज
वाटल्या शिवाय राहिले नाही.एक आजोबा म्हणून नातवंडांना ते झोपतांना केवळ एखादी गोष्ट वाचून दाखवता यावी
अशी त्याची प्रबळ इच्छा होती जी त्याची ही
मंडळी जाणायची त्या मुळे वयाच्या ५६ व्या वर्षी त्याने हि बाब जगापुढे
मांडली ,आणि तो एका मोठ्या मानसिक द्वंद्वातून बाहेर पडला
.नंतर एक स्वतंत्र शिक्षक नेमून तो वयाच्या ५६व्या वर्षी वाचायला शिकला.
१९९९ साली अमेरिकेतील अत्यंत यशस्वी उद्योजक ,ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत छोट्या व्यवसायाचे रुपांतर
मोठ्या व्यवसायात केले अशा निवडक ६ उद्योजकांच्या समवेत वाशिंग्टन येथे थायसन्सने
अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स चे पारितोषिक स्वीकारले...
थायसन्सच्या भूतकाळात जाऊन पहाता असे लक्षात येते कि ,थायसन्स सेन्ट्रल नेवाडातील शाळेत
पहिलीत किंवा दुसरीत असतांना ,त्याला लिहिलेले
वाचतांना त्रास व्हायचा ,किंवा इतर मुलांच्या प्रमाणे पटकन वाचायला जमायचे नाही,त्या मुळे त्या वेळची त्याची वर्गशिक्षिका भर वर्गात प्रत्येकवेळी त्याचा “मूर्ख’ असे संबोधत पाणउतारा करायची. पण त्या
मुळे झाले असे कि, थायसन्स
वर्गात गप्प-गप्प रहात मागच्या बाकावर बसणे पसंत करायला लागला.
थायसन्सच्या मते केवळ अशा
विद्यार्थ्याचे तोंड नियमित बघायला लागू नये केवळ यासाठीच कदाचित मला सर्व शिक्षक
शाळेत वरच्या वर्गात ढकलत गेले.आणि इन्जीनियारीन्ग्ची पदवी मिळताना केवळ गणित या
विषयातील त्याची हुकुमत आणि विज्ञान या
ऑटो मेकॅनिकल इंजिनियरिंग साठी आवश्यक असणाऱ्या विषयात आकृत्या नीट लक्षात
ठेवण्याच्या त्याच्या बुद्धी कौशल्या मुळे तो इंजिनियर झाला असे त्याचे मत आहे.
मात्र शिक्षकांच्या मते आपल्याला वाचता येत नाही याचा त्या वेळी त्याच्या बालमनावर एक असा परिणाम झाला कि, उपजत
ग्रहण क्षमतेमुळे, तो एक उत्कृष्ठ श्रोता बनला व त्याचा
त्याला त्याच्या व्यवसायात भविष्यात खूप मोठा फायदा झाला.
ते काही असो पण सरते शेवटी त्याची बायको बोनी थायसन्स यांचे मत मात्र काहीसे
वेगळेच आहे... तिच्या मते तुम्हांला वाचता न येणे यात लाज वाटण्या सारखं फारसे
काहीच नाही पण तुम्ही त्या साठी कधी प्रयत्नच न करणे हे जास्त लाजिरवाणे
आहे....(जे थायसन्सने वयाच्या ५५ व्या वर्षां पर्यंत केले )
. ...
Grapplers Inc. Store Credits : https://www.grapplersinc.com/about-us/ and free translation of his one read story. Thanks... |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा