न्यूयॉर्कच्या विमानतळावरील एका अमेरिकन इमिग्रेशन ऑफिसरने मागे एकदा जेव्हा
“शोले” मधील “सांबा “ म्हणून मॅकमोहनला ,त्याचा पासपोर्ट न बघताच लगेच ओळखले होते तेव्हा त्याच्या बायकोचा म्हणजेच “मिनी”चा ऊर अभिमानाने नक्कीच भरून आला असणार
यात शंका नाही... पण त्या मागची खरी कहाणी काही वेगळीच होती...
पू S S रे
पचास हजार !!! या शोलेतल्या केवळ तीन शब्दांनी ज्याची “सांबा” म्हणून जगभर ओळख निर्माण झाली त्या शोलेच्या शूटिंगसाठी मॅकमोहनने मुंबई- बंगलोर च्या तब्बल २७ वार्या केल्या
होत्या ...त्या काळी एका मल्टी स्टारकास्ट फिल्म मध्ये मोठा रोल मिळाला म्हणून तो
बेहद्द खुश होता ... शोले मधल्या त्याच्या रोलवर त्याचे करियर खूप काही अवलंबून
असल्याची त्याला पूर्ण जाणीव होती ... पिक्चर रिलीज व्हायची तो सुद्धा वाटच बघत होता
, पण पिक्चर वाजवी पेक्षा खूपच मोठा झाल्याने सांबाच्या
रोलला ,रमेश सिप्पीला नाइलाजाने कात्री लावणे भाग पडले...पण हे
मॅकला तो पिक्चर बघितल्यावरच समजले आणि त्या मुळेच १९७५-७६ साली मिनर्व्हा मधून शोलेचा प्रिमियर
पाहून बाहेर पडतांना मॅकमोहन प्रचंड नाराज आणि निराश झाला होता...रमेश सिप्पी त्याची नाराजी जाणून होता
आणि त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता पण..... तो त्या वेळी कुणाचे ,काहीच ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नव्हता
.... पण त्या पू S S रे पचास हजार !!! या ३ शब्दांनी नंतर त्याचे उभे आयुष्य बदलून गेले... सांबा हीच त्याची पुढील आयुष्यात ओळख बनली.... व तो भारतीय प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिला
...
पूर्वी एकदा मॅकमोहन सहकुटुंब पुण्यात
आला असता ,कुठूनशी तो अमुक-अमुक
हॉटेलमध्ये उतरलाय अशी लोकांना खबर लागली... बघता-बघता हॉटेल बाहेर इतकी गर्दी जमली
की, सांबा-सांबा अशा आरोळ्यांनी परिसर दुमदुमून गेला... शेवटी
पोलिसांना बोलावून त्या गर्दीतून सांबाला व त्याच्या कुटुंबियांना बाहेर काढतांना नाकात
दम आले ... शोलेच्या रिलीज नंतर इतक्या वर्षांनी सुद्धा मॅक मोहनची त्या छोट्याश्या
रोल मधील इतकी प्रसिद्धी बघून त्याचे कुटुंबिय तेव्हा प्रचंड आश्चर्यचकीत झाली होते...
आज २४ एप्रिल हा मॅक मोहनचा जन्मदिवस .. तो आज जर असता तर त्याने ८१ व्या वर्षात
आज पदार्पण केले असते... पण २०१० साली फुफ्फुसच्या कॅन्सरने तो गेला.... १९३८ साली तेव्हाच्या अखंड भारतात तो
कराची मध्ये एका मिलिटरी ऑफिसरच्या घरात जन्माला आला.भारत स्वतंत्र झाल्यावर प्रथम
त्याचे कुटुंबीय लखनौला व नंतर मुंबईत येऊन स्थिरावले... मॅक मोहन सिनेमा क्षेत्रात
तसं म्हणल तर अपघाताने आला कारण बर्याच जणांना हे माहीत नाही की, मॅक हा एक उत्कृष्ट क्रिकेटियर होता व त्याला
क्रिकेट मध्ये करियर करण्यात रस होता.. पण मेव्हणा रवी टंडन चित्रपट
क्षेत्रात असल्याने त्याने सुद्धा ऍडिशनल नॉलेज अधिक थोडीफार आवड या नात्याने अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेतले व प्रथम अमिताभ-प्राण
सोबत मजबूर मध्ये “प्रकाश” ची व नंतर शोले
मधली सांबाची भूमिका केली आणि पुढे त्याचे क्रिकेट चे क्षेत्रच बदलून गेले. नव्वदी च्या दशकातील रविना
टंडनचा तो नात्याने मामा लागत होता...
मॅक मोहन हिन्दी सिनेमा क्षेत्रातील अशा अभिनेत्यात मोडायचा की ज्याचे इंग्रजी
भाषेवर अतिशय उत्तम प्रभुत्व होते... तो इंग्रजी अतिशय अस्खलित बोलू आणि लिहू शकत असे...
रीडर्स डायजेस्ट हे त्या काळातील बुद्धिजीवी वर्गाचे मासिक त्याचे सर्वात आवडते मासिक
होते... त्याच्या कुटुंबियांच्या मते म्हणे मॅकचा “ड्रेस सेन्स “ पुष्कळ चांगला होता
...तो त्याचे कपडे अमेरिकेतील लॉस एंजल्स किंवा मुंबईतील “कचीन्स” मधील “माधव”
या त्याच्या ठरलेल्या शिंप्या कडूनच शिवत असे ... त्याच्या खाजगी आयुष्या बद्दल सांगायचे तर त्याच्या
तरुणपणी त्याचे नाव बराच काळ गीता (सिद्धार्थ
काक) बरोबर जोडले जायचे ... ही गीता सिद्धार्थ
म्हणजे तीच जी शोले मध्ये ठाकुर झालेल्या संजीव कुमारची थोरली सून म्हणून दाखवली गेली
होती ती... पण त्यांचे लग्न झाले नाही... तिने नंतर “सुरभि” वाल्या सिद्धार्थ काक बरोबर
लग्न केले आणि मॅक मोहनची लग्न गाठ जुहू मधील आयुर्वेदिक आरोग्य निधी हॉस्पिटल मधील
आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या डॉ. मिनी सोबत
जमून गेली.... मॅकचे वडील त्यांच्या वार्धक्यात ती काम करत असलेल्या हॉस्पिटल मध्ये अॅडमिट असताना
योगायोगाने मॅकचे आणि तिचे सूर जमून आले होते...व त्याचे “निदान” लग्नात झाले...
एक यशस्वी संसार असे मॅकच्या संसाराचे थोडक्यात वर्णन करता येईल... त्याच्या दोन्ही
मुली व मुलगा आज हिन्दी सिनेमात वेगवेगळ्या क्षेत्रात आपापला ठसा उमटवुन कार्यरत आहेत....
तर असा हा मॅक मोहन .... सिनेमात वरवर रफ अँड टफ ... टपोरी .. दिसणारा ,भासणारा.... पण वास्तवते
मध्ये अतिशय बुद्धीमान आणि निराळा असणारा.... थोडक्यात काय तर दिसतं तसं नसतं हेच खरं....
वुई मिस यू मॅक ...
आजच्या लेखासाठी साठी संदर्भ.. Actor
Mac Mohan: Cricketer who became Sambha in Sholay आणि इंटरनेट ...
Read more at:
http://www.merinews.com/article/actor-mac-mohan-cricketer-who-became-sambha-in-sholay/15884493.shtml&cp
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा