शू s s s कोणी बोलू नका, प्लीज... कुणी गड़बड़ करू नका
माझ्या आज्जीला कॉम्प्युटरने गिळून टाकलय.
हो शप्पथ,.....गायब केलय !
तिने "कंट्रोल" "एन्टर" दाबल नि स्क्रीन समोरून गायब झाली.
कॉम्प्युटरने तिला हावरटा सारख खाउन टाकल,
नुसता हा विचारच माझ्या अंगावर शहारे आणतोय.
कदाचित तिला एखाद्या व्हायरस ने किंवा worm ने संपवल तर नसेल.
मी आक्खी "रिसायकलबिन" पालथी घातली.
सगळ्या प्रकारच्या सगळ्या फायली तपासल्या;
अगदी इंटरनेट सुद्धा वापरून झाल,
पण काहीच उपयोग झाला नाही हो.
अगदी अगतिक होउन मी "Jeeves"ला सुद्धा एकदा परत बारकाईने शोधायला सांगितले.
पण प्रत्येक वेळी तीच नकारघंटा,
अगदी "ऑनलाइन" सुद्धा काही सापडल नाही हो !
म्हणून प्लीज, जर तुमच्या "इनबॉक्स" मध्ये,
तुम्हाला चुकून माझी आज्जी दिसली तर,
तिला "कॉपी" "Scan" आणि "पेस्ट" करून माझ्या मेल आय.डी.वर पाठवून द्या...प्लीज.
माझा त्या आज्ज्यांना सलाम,की ज्या बिनधास्त नि बेडर आहेत नि ज्या आजच्या काळात कॉम्प्युटरशी खेळून,शिकून त्याचा "नेट" सहित नेटाने वापर करतात. त्या ग्रेट आहेत !!!
......
आणि म्हणूनच माझी आज्जी मला काय म्हणते माहिती आहे का ? ती म्हणते पोरांनो खेळण सोडू नका,आम्ही खेळण सोडल म्हणून म्हातारे झालो.म्हातारे होण्यात तुमचा नंबर पाहिला नाही तर शेवटचा आला पाहिजे. कळल का ?
(सौ.सुजाथा आणि फोटोबकेट.कॉम, Angelintown,auntie_m7,TazzatHome
ह्यांच्या सौजन्याने खास करुन आमच्या बालमित्रांना पाडव्याची ही खास भेट. ) |
|
मित्रांनो,
उत्तर द्याहटवागुढी पाडव्याच्या,नववर्षाच्या सर्वांना माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा.
खरे तर आत्ता टाकलेल्या पोस्ट च्या ऐवजी एक वेगळीच पोस्ट मी टाकणार होतो. पण म्हटले पाडव्याच्या दिवशी उगीच विचार करायला लावणाऱ्या,नि सणाचा विनाकारण चो करणाऱ्या पोस्ट नको त्या मुळे टाळले.बघू पुन्हा कधी तरी.