भोज्जा

शनिवार, १४ मे, २०११

बंगाली जादू

मुळात प.बंगाल मधील राजकारण हे फक्त आपल्यालाच नव्हे तर उभ्या भारताला न उलगडलेले कोडे आहे.वर्षा नु वर्षे  ....नव्हे दशकानुदशके  राज्यात कम्युनिझमच्या नावा खाली कोणतेही मोठे उद्योग उभारू द्यायला स्वतःच  विरोध करणारे असे जे कुप्रसिद्ध सरकार ते कम्युनिस्टांचे अशी ज्याची ओळख होती  ते सरकार मुळात इतके वर्ष  अमर्याद सत्ता उपभोगू शकले हा भारतीय लोकशाहीतील एक मोठ्ठा विनोद आहे.फार पूर्वी तेथे हल्दिया ग्रुपचे नि आत्ता लेटेस्ट टाटा ग्रुपचे  जे दिवाळे नि वाभाडे निघाले,ते कोणताही उद्योजक अगदी ठरविले तरी सहजा सहजी विसरू शकणार नाही.नॅनोला प.बंगाल मधून घालवितांना  ममता बाईंनी,अगदी नावात जरी ममता असली तरी वागण्यात नि बोलण्यात जो क्रूरपणाचा कळस गाठला होता,त्याला तोड नाही.मुळात वर्षानुवर्षे केंद्रातील कॉंग्रेसला तेथे असलेल्या अल्प जनाधारा ,प्रतिसादा मुळे तेथे त्यांचे सरकार नसल्याने कोणतीही समाज उपयोगी योजना राबविणे कधीच आवडत नव्हते नि साम्यवादाची घोंगडी पांघरलेले मा.क .प.चे सरकार सुद्धा निवांत झोपत होते.ह्या सगळ्या पार्श्व भूमीवर तेथील जनते पुढे हतबल होण्या शिवाय पर्यायाच नव्हता.राज्यातील बहुसंख्य गरीब, अशिक्षित नि निर्बुद्ध जनतेच्या जीवावर तीच ती लोकं वर्षानुवर्षे निवडून येत होती नि सत्तेचे लोणी चाखत होती.
ममतेचा हा विजय हा खरे तर तिचा विजय नसून तेथील जनता निदान काही प्रमाणात तरी थोडी सुज्ञ झाल्याचे केवळ प्रमाण पत्र आहे.बाकी फार काही नाही.लोकांनी फक्त नवीन दगडाला शेंदूर लाऊन आता हा तरी देव पावतो का हे बघायचा केलेला एक केविलवाणा प्रयत्न आहे.जनाधार,परिवर्तन वगैरे वगैरे सब झूट आहे,ह्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात.देशातील अग्रगण्य नि सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान असलेल्या टाटा ग्रुपला अपमानास्पदरित्या राज्यातून केवळ राजकीय स्वार्था पोटी  हाकलून लावणाऱ्या ह्या नुसत्या बडबड्या बाईला तिच्या पुढील ५ वर्षात राज्याच्या प्रगती साठी,ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मदत करायला कोणता उद्योजक पुढे येतो हे पहाणे आता कुतुहलाचे असेल,कारण आक्रस्ताळेपणाने निर्बुद्ध लोकांची मने नि मते कदाचित एकवेळ जिंकता येऊ शकतात पण राज्याच्या सर्वांगीण विकासा साठी  नि रोजगार निर्मिती साठी  तेथे भांडवलदार उद्योजकच लागतात.प.बंगाल मधील वेगवेगळ्या "धरणा आंदोलनात" क्वचित प्रसंगी स्वतःचे  भान राखू न शकणाऱ्या  ह्या बाईला,राज्य कारभार करताना मात्र ह्या सर्व गोष्टींचे भान ठेवावे लागणार हे मात्र कटू सत्य आहे.   

२ टिप्पण्या:

  1. हि आक्रस्ताळी बाई एक "राजकारणी" म्हणून कधीच भावली नाही अन नेमकं आता तर "भित्या पाठी ब्रह्मराक्षस" अशी गत होऊन बसलीये. इकडे हि नि तिकडे तामिळनाडूत ती जयललिता.... काही नाही दोन्ही कडची जनताच बिचारी दुर्दैवी आहे त्याला कोण काय करणार ? ज्याचे त्याचे नशीब.... जयललितेने तर तिच्या निवडणूक जाहीरनाम्यात तेथील "गरीब" जनतेला 'लॅपटॉप,२० किलो तांदूळ,केबल टी.व्ही चे फ्री कनेक्शन अन अजून काही बाही असे बरेच , जर तिला निवडून दिले तर "फुकाट" द्यायचे आश्वासन दिले आहे.......कळत नाही ना ? या वर नक्की हसावे का रडावे ते ?

    उत्तर द्याहटवा
  2. खरे तर बंगाली जादू ही, पश्चिम बंगालच्या नावा पासूनच सुरु होते. म्हणजे कसं कि,हे राज्य आहे भारताच्या पूर्वेला (तसे ईशान्य नि पूर्वेच्या मध्ये) पण वर्षानुवर्षे ह्याची ओळख मात्र पश्चिम बंगाल म्हणूनच आहे.भारताला स्वतंत्र मिळून (मला नेहमी ह्याच वाईट वाटतं कि,आपण बोलताना- लिहिताना "स्वातंत्र्य मिळून" असेच का लिहितो ? "भारताने स्वातंत्र्य मिळवून" असे का येत नाही?असो. उगीच विषयांतर नकोय ते पुन्हा कधी तरी पाहू ) ६३ वर्षे झाली,पूर्व पाकिस्तानचे बांगलादेश होऊन सुद्धा ४० वर्षे झाली पण एकसंध भारतातील पूर्व नि पश्चिम बंगाल मधील "पश्चिम बंगाल" मात्र तसेच राहिले.टागोरांचे,सत्यजित रे चे,मृणाल सेन चे बंगाल जाऊन सौरभ गांगुली नि रिया सेनचे म्हणून प.बंगालची नवी ओळख तरुण पिढीला होऊ लागली.खरे तर १९८० ते २००० च्यां दशकांमधील पिढी ही त्या ज्योती बसूंच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही,कारण प. बंगालचे मुख्यमंत्री .......टिंब टिंब आहेत ,हा १ किंवा २ मार्कांचा प्रश्न कोणत्या मुलाचा कधी चुकलाच नाही. वर्षानुवर्षे प.बंगालचे मुख्यमंत्री म्हणून ज्योती बसूच राहिले होते.त्यांच्या त्या खुर्चीने तर अगदी फेविकॉलला सुद्धा मागे टाकले होते.इतका त्यांचा "तो"जोड मजबूत होता.आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या बाई काय करताहेत ते बघायचे.

    उत्तर द्याहटवा