तामिळनाडू मध्ये हे अकौंट सध्या फारच चर्चेचा विषय होऊन बसले आहे,अगदी काल्पनिक असले तरी.खरं तर तमिळ भाषेत कनी म्हणजे गोड..किंवा मधुर... नि एकूण अर्थ बहुदा "मधुरा" असा काहीसा आहे . त्या वरून हिच्या नावांत गोडवा तर आहे, पण वास्तवात मात्र लोकांना तो सध्या फारच कडवट लागतोय.फार सिरीयस होऊ नका,पण करुणानिधींच्या मुलीचे म्हणजेच kanimozhi चे तिच्या वरच्या अति प्रेमा मुळे किंवा द्रमुक वरील अती निष्ठेमुळे बनविलेले हे काल्पनिक तसेच खोटे फेसबुक अकौंट आहे पण तामिळनाडू मधील जनता काय किंवा देशातील जनता काय सध्या काय विचार करते आहे त्याचा हा मासलेवाईक नमुना आहे.. आपण मराठी वाचक निदान एक करमणूक म्हणून तरी त्या कडे पाहूयात.चला तर मग...
हे पोस्ट आमच्या तमिळ स्नेही सौ.सुजाथा ह्यांच्या सौजन्याने..
कॉम्प्युटर मधील विनोद बुद्धी असलेले इंजिनिअर्स काय काय गमती जमती करू शकतात त्याचा हा एक मासलेवाईक नमुना आहे.ह्या पद्धतीचे अकौंट बनविणे त्यात सुद्धा चालू घडीला वादाच्या भोवर्यातील नावे बरोब्बर लपेटून घेउन ते काल्पनिक संवाद घालणे म्हणजे त्या इंजिनियरला त्याच्या इंजिनिअरिंग ज्ञाना सोबतच राजकीय घडामोडीचे नि पार्श्व भूमीचे नीटसे ज्ञान असणे खूपच गरजेचे असते नि आहे.त्या मुळेच त्या मूळ, प्रस्तुत मेल तयार करणार्याच्या उपरोधिक बुद्धीचे कौतुक वाटते.
उत्तर द्याहटवाओ... हि कधी नव्हे ती चुकून माकून गेल्या पाचातली चार पोस्ट एकदम ...अगदी काही नाही तरी थोडी (अ)राजकीय पार्श्वभूमीवरची झाली तर... पण होत असं कधी मधी ..चुकून माकून... त्या मुळे अर्थातच थोडं नेहमी प्रमाणे वेगळ्या विषयावरच लायटर साईड वरच पोस्ट आता ड्यू झालंय ..बघुयात ..कितपत साधतंय ते !
उत्तर द्याहटवा